भक्तिगीते - सहेली (वेणू)

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


कटीं कालिंदी गोपाळ । वेणुनादें भारावले ।
सात जन्माचीं पुण्याई । फळा आली, वेणुबोले ।
कटिं, खोविलेली मला । दोन्ही करांत, वागवी ।
पुलकित झाले अंग । स्पर्श सुखाचा, लाघवी ।
अर्धे, मिटोनी लोचन । उभा, कटि मोडूनीयां ।
सये, कैशीं सांगू पुढें ? चूर झाले, लाजुनिया ।
बालपणीं मुखांमाजीं । दावियेले विश्वरुप ।
तेच मुख जवळीं येतां । ब्रह्मीं जाहले, तद्रूप ।
धून, तरंगावरणीं । विश्व घुमले, सुरांत ।
असुरांना, ठाव कोठें । जग सारे आनंदांत ।
वाहिलेला, देवकीनें । यशोदेनें वाढविला ।
माझी, सहेलीची साथ । घननीळ, नादावला ।

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP