भक्तिगीते - साथ
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
कारे चालीशी एकला । निसर्गाची साथ तुला ।
भाई-बंध मागेपुढे । का न येणार साथीला ?
तुझ्या ईवल्या अंगणी । लावियेली तू रोपटी ।
तू चि त्यांचा फूलमाळी गंध -आनंद खोपटी ।
वरी पाहीलेस नभीं ? नील, घुमट, डोलारा ।
मुखी गोड शब्द येता, ध्वनी धुमत बाहेरा ।
कुंभ पवित्र जलाचा, होई जरासा कलता ।
भूक-तहान भाववी, मेघ:श्याम, धरतीचा ।
तुझ्यासाठी, नाती-गोती, अंतरांत, रुजे प्रीती ।
म्हणू नको रे एकला, हीच विश्वातील नाती ।
तूचि आनंदाचा कंद, मूख मंडल हांसरे ।
तेची देखता सामोरे, मोद-भांडार हो खुले ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 09, 2023
TOP