भक्तिगीते - नाते
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
वरी निळे अंतराळ । खालीं धरतीचा माळ ।
नाते जोडिले दोघांनी । जळधारा बरसोनी ॥
घनदाट पर्णवल्ली । पक्षी उडती आकाशीं ।
बांधियेले घरटयासीं । वृक्ष-माथा, पर्णराशीं ।
सांजसकाळचा वारा । कानमंत्र हे सागरां ।
भरतीचा हो कल्लोळ । ओहोटीला कोठें बळ ?
वरीं पाहीं चंद्रबिंब । चंद्रमणी होत चिंब ।
नाते कैसें जोडियेले ? सगे - सोयरे कोठले ?
आगा पंढरीच्या नाथा । विनवितों, पदीं माथा ।
नाते जोडायां, भक्ताचे । नाम तुझे, घेतो वाचे ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP