भक्तिगीते - वारी
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
राऊळ हे माझेपाशीं, हृदय मंदीर ।
भक्तिभावाचा गजर, घुमत गाभार ।
कशापाई उठाउठी, पंढरीसीं जायां ।
विठूरायानें दिधली, तुला मला काया ।
शिरभाराचे शिखर, उगम नामाचा ।
टाळ हातीं नादावले, साद पावलांचा ।
नेत्रीं, चंद्रभागा वाहे, काया हो पुनीत ।
वारकरी, मीच तूझा, वारि ही घरांत ।
तूच माजा, माझ्यापाशीं, जवळीक झाली ।
विठ्ठलाच्या दर्शनानें, प्रचीती लाभली ।
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP