भक्तिगीते - सांज
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
दुपार ढळली, सांज, साऊली, अता येऊ लागली ।
हात गुंतले छंदामध्ये, कानीं स्वरांजली ॥
किती जोडीली स्नेहबंधने, धागे हळुवार ।
अमृतमय-गोडबोल मिळते, प्रेमाची पाखर ॥
अथांग सागर, तुफान वादळ, नावाडी विव्हळे ।
बंधु-भगिनिची हाक, ऐकतां, घेइ उभारि बळें ॥
उत्साहाचे, वात्सल्याचे, शब्द कानि येत ।
छंदामध्ये आज गर्क मी, ना कसली खंत ॥
जोवरि बंधुत्वाचा येतो, झोत-प्रेमबंध ।
चालवीन अव्याहत तोवरि, काव्य, कला छंद ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP