भक्तिगीते - जीवन

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


संकल्पांचे कल्पवृक्ष, आजवरी जोजावले ।
एका दोनाची झुडुपे, बाकी सकल वठले ।
शिशुपणांत देखता, आम्रवृक्ष-फलभार ।
पडे खाली एखादेच, दहा फेकिता पत्थर ।
स्वानुभवाच्या झोळीत, गाथा जीवनाची मिळे ।
वाटे, मुखांत वसावी, ओठीं एखादीच घोळे ।
खंत कासया उरांत ? खेद मुळीना जाहला ।
युगा-युगाचे तपाला, कल्पवृक्ष, मोहरला ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP