भक्तिगीते - वीट
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
झाले मातीचे गे सोने । विठ्ठलाच्या पायांखाली
वीट घडली मातीची । भूमी-माता धन्य झाली ॥
युगे अठ्ठावीस उभा । पदस्पर्श अंगावरी ।
ऐसे वागविले ओझे । तीन्ही लोकांचा हो हरी ।
महिमा विठ्ठल नामाचा । चिंता क्लेश दूर करी ।
त्याच विठ्ठलाचे ओझे । युगे युगे हृदयांतरी ।
टेकी मस्तक पायाशी । वारकरी विठ्ठलाच्या ।
स्पर्श वीटेला होतसे । देवपण ये मातीला ।
भोवताली गाभार्यात । पाहोनिया ही पुण्याई ।
मिळे पत्थराची साथ । वीटेवरी नवलाई ।
N/A
References : N/A
Last Updated : February 09, 2023
TOP