भक्तिगीते - माझा सवाल विठ्ठला

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


माझा सवाल विठ्ठला । क्षमा कराल भक्ताला ? ।
माया पाश हा संसारी । चिंता, मोह केला दूरी ।
आलो, तुझ्या दर्शनासीं । विसरायां सर्वस्वासी ।
आम्हासारिखे स्वच्छंदी । झालां तुम्ही, छंदीफंदी ॥
नवा पोषाख केशरीं । घाली कैसां अंगावरी ? ।
कंठी, सुवर्णाची माला । कंकण - भूषण हातांला
खटाटोप हा कासया ? तुझ्या भक्तां, भूलवायां ? ।
ऐसा, तूच जरी होसी । काय भक्तां, शिकवीसी ?

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP