मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
देव मज करा

सप्ताह अनुष्ठान - देव मज करा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मज बनवावे देव । गुरुराय वासुदेव ॥१॥
भजनाचा थोर महिमा । प्रगटवावा अनुपमा ॥२॥
स्वीयरुप मज द्यावे । सामर्थ्यवन्त मज करावे ॥३॥
मज देव सिद्ध करावे । तेजस्वी मज बनवावे ॥४॥
नर-काया पालटावी । देवकळा मज यावी ॥५॥
ऐसा दावी निजप्रभाव । लोकां कळवाया भव ॥६॥
जेथे भजन सतत । तेथे वास मी करित ॥७॥
कधी न जाई तेथोनियां । भजनरंग टाकोनियां ॥८॥
आत्मभाव तेथे असे । भजन जेथे घडतसे ॥९॥
भजकांचा बंदा दास । आहे निश्चये मी खास ॥१०॥
ऐशी ग्वाही देवा व्हावी । भजनाची तूझ्य़ा बरवी ॥११॥
म्हणोनी देवकळा द्यावी । करोनियां मज तेजस्वी ॥१२॥
दावा दावा चमत्कार । संपन्न करा हा पामर ॥१३॥
थोरपण पामरासी । येतां ऐसे अनुभवासी ॥१४॥
जनसारे विश्वासती । उपासना मार्ग धरिती ॥१५॥
विनायक दत्त व्हावा । तुमच्या कृपे दत्तदेवा ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP