मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
नाममंत्र व त्याचा प्रभाव

सप्ताह अनुष्ठान - नाममंत्र व त्याचा प्रभाव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


नाममंत्र व त्याचा प्रभाव
नाना रोग जगी विख्यात असती । देहासी पीडिती परोपरी ॥१॥
देह मन बुद्धि तिघांसी विकार । करिती साचार रोग बहु ॥२॥
नाना रुपधारी एकचि हा रोग । देत असे भोग जीवालागी ॥३॥
त्याचिया शमना नाममंत्र जपा । मग सर्व तापा परिहरा ॥४॥
नाममंत्र जरी सुखाने जपाल । आरोग्य होईल तुम्हांलागी ॥५॥
मृत्युभय नाही नामधारकांसी । तरी निश्चयेसी जप करा ॥६॥
अमर होवोनी विचाराल जगी । भोग तुम्हांलागी स्पर्शिनाच ॥७॥
विनायक म्हणे सर्व रोग भोग । नाममंत्रे भंग पावतील ॥८॥
==
नाममंत्र  व त्याचा प्रभाव
नाना रोग जगी विख्यात असती । देहासी पीडिती परोपरी ॥१॥
देह मन बुद्धि तिघांसी विकार । करिती साचार रोग बहु ॥२॥
नाना रुपधारी एकचि हा रोग । देत असे भोग जीवालागी ॥३॥
त्याचिया शमना नाममंत्र जपा । मग सर्व तापा परिहरा ॥४॥
नाममंत्र जरी सुखाने जपाल । आरोग्य होईल तुम्हालागी ॥५॥
मृत्युभय नाही नामधारकांसी । तरी निश्चयेसी जप करा ॥६॥
अमर होवोनी विचाराल जगी । भोग तुम्हांलागी स्पर्शिनाच ॥७॥
विनायक म्हणे सर्व रोग भोग । नाममंत्रे भंग पावतील ॥८॥
==
स्वभावास औषध नाममंत्र
स्वभावासी नाही औषध म्हणती । पंडित सांगती अनुभब ॥१॥
आजवरी ऐसा प्रवाद चालत । सत्यचि मानित जनलोक ॥२॥
परि नाममंत्रधारक जो नर । अनुभव साचार त्या उलटा ॥३॥
नाममंत्राची हे दिव्य मात्रा घेता । स्वभाव शुद्धता होत असे ॥४॥
शोधन करीत मात्रा स्वभावाचे । पालटत साचे रुप त्याचे ॥५॥
म्हणोनियां नाममंत्र हा सेवावा । देह न कष्टवावा इतरत्र ॥६॥
विनायक म्हणे दिव्य हे औषधि । सेवोनिया साधी निजहित ॥७॥
==
स्वभावास औषध नाममंत्र
गूढ जरी आहे अंतर आपुले । दुष्टि न दिसे भले जरी जाणा ॥१॥
तया रोग होतां असाध्य वाटत । प्रत्यया न येत रोग त्याचा ॥२॥
लक्षणावरोनी मति न चालत । आरोग्य भासत जैसे कांही ॥३॥
मोठे मोठे वैद्य येथे फ़सताती । निदान करिती भलतेच ॥४॥
याही रोगावरी औषध हा मंत्र । प्रभाव विचित्र याचा आहे ॥५॥
रोगाचा प्रकाश करित सेवितां । दावि प्रत्यक्षता विशदत्वे ॥६॥
विशद करोनी रोग तो दावी । किरण प्रकाशवी स्वतेजाचा ॥७॥
भ्रांति भूल सारी टाकी दवडोनी । प्रत्ययास आणी रोग मंत्र ॥८॥
मग प्रभावाते आपुल्या दावित । रोगासी नाशित एकसरे ॥९॥
युद्ध करी मग अंतर प्रभावे । ऐसे हे जाणावे महिमान ॥१०॥
विनायक म्हणे असाध्य कांही नाही । नामालागी पाही जगत्रयी ॥११॥
==
जपतां नाममंत्र देह मन बुद्धि । पावताती शुद्धि परमचि ॥१॥
माया भ्रम जो का जडलासे रोग । भोगवीतो भोग दारुण जो ॥२॥
तयाचा निरास नाममंत्र करी । औषधि हे तरी दिव्य जाणा ॥३॥
म्हणोनियां घ्यावे सदा हरिनाम । तेणे सर्वकाम पूर्ण होती ॥४॥
विनायक म्हणे ऐसा हा निष्कर्ष । नामाचा उत्कर्ष जाणावा हा ॥५॥


N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP