मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान| देवावीण गति । नाही आम्हां प्रति सप्ताह-अनुष्ठान विषय जिव्हाळ्याचा देव भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात" सप्ताहसिध्यर्थ याचना भक्तकीर्तिसाठी याचना भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार देव मज करा अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना देव मज करा संकटाचे नाशासाठी प्रार्थना विनायकाठायी दत्तसंचार धर्मग्लानि धर्मविस्तारार्थ प्रार्थना व्हावे रामराज्य भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना निराशेचे बोल दत्ताधीनता कृतज्ञतावचन प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना क्षमायाचना पूर्वचरितकथन व क्षमायाचना अहंताविष अहित दलनासाठी प्रार्थना अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना देवावीण गति । नाही आम्हां प्रति ईश्वराच्या अर्तक्य लीला सुदामकथा भ्याडपणे भरे अज्ञानाने अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’ नाममंत्र व त्याचा प्रभाव वाल्मीकि चरित चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति सप्ताह अनुष्ठान - देवावीण गति । नाही आम्हां प्रति श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन देवावीण गति । नाही आम्हां प्रति Translation - भाषांतर देवावीण गति । नाही आम्हां प्रतिसोमवार ता. १३-१०-१९३०कांही झाले तरी देवावीणगति । नाही आम्हांप्रति अणुमात्र ॥१॥किती जरी झाली मनाची निराशा । तरी जगदीशा शरण जाणे ॥२॥म्हणोनियां जावे शरण पुरुषोत्तमा । गति अनुपमा हेचि एक ॥३॥सर्व कार्य त्याचेवरी सोपवावे । आपण असावे श्रद्धायुक्त ॥४॥श्रद्धा कधी ढळो मुळी नच द्यावी । निश्चिती धरावी तोचि त्राता ॥५॥हाच मार्ग आहे साधुसज्जनांचा । अवलंबावा साचा साधकाने ॥६॥विनायक म्हणे धरि दृढ भाव । घट्ट गुरुदेव आश्रयावा ॥७॥==)कधी न सोडावे देवालागीआम्हां पामरांची शक्ति असे किती । धरोनियां चित्ती विचार हा ॥१॥धैर्यवंत व्हावे देवा चिकटावे । कधी न सोडावे देवालागी ॥२॥किति भय उपजो आपण भ्यावे । कधी न दूर व्हावे देवापासोनी ॥३॥मनाच्या यातना शरीर यातना । सोसाव्या त्या नाना धैर्यवंते ॥४॥परि नच त्याते कधीही सोडावे । कांही झाल्या व्हावे सक्त घट्ट ॥५॥जरि आला मृत्यु होवो देवापाशी । कधी न तयासी सोडावे त्वां ॥६॥विनायक म्हणे मनाचा निर्धार । कधी न साचार ढळवा तो ॥७॥==कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे’अल्प पुण्य पाहे प्रभु देवराणा । परीक्षा अंत:करणा साधकाच्या ॥१॥दयावंता आहे नित्यचि तो देव । त्याचा कृपाभाव अनुपम ॥२॥जरी शरण जासी तयासि पामरा । दु:खमुक्त खरा होसील की ॥३॥कल्याण की तुझे देवचि जाणतो । तैसेच करितो सर्व पाही ॥४॥अज्ञानासी न कळे हा विचार । भयभीत फ़ार होत नर ॥५॥कासावीस होतो जीव घाबरतो । मध्येच सोडितो देवपंथा ॥६॥त्यासी नाही गति कोठे मग उरे । हेच तत्व खरे विवेचि तूं ॥७॥विवेचन ऐसे करोनी मनांत । सेव अवधूत सर्वकाळ ॥८॥निश्वयाने तुज करिल दु:खमुक्त । तोच सर्व शक्त जगत्प्रभु ॥९॥विनायक म्हणे न हो दीनवाणा । गुरुच्या चरणां सोडूं नको ॥१०॥==कधी न सोडावे देवालागीकाळापासोनियां जेणे मार्कडेया । सोडविले तया शरण जा ॥१॥जये प्रल्हादासी रक्षिले परोपरी । तोच तूं श्रीहरी सेवित जा ॥२॥ज्याचिया कृपेने शस्त्रे न रुतली । अग्निज्वाला झाली शीतल की ॥३॥पर्वते झेलिले जळाने तारिले । ऐसे जेणे केले महिमान ॥४॥नको सोडूं देव ऐसा जो कृपाळू । करी प्रतिपाळू अहर्निश ॥५॥जननीगर्भात जेणे संरक्षिले । तुज सोडविले गर्भातूनी ॥६॥आजवरी जेणे तुज बा राखिले । अन्नपाणि दिले जेणे तुज ॥७॥नको सोडूं देव, ऐसे ब्रीद्र ज्याचे । कोण वर्णी वाचे अनुपम ॥८॥विनायक म्हणे देवासी सोयरा । करी रे पामरा भक्तीबळे ॥९॥==भोळ्या भावाचा भुकेलासोंगे ढोंगे जरी भजसील त्यासी । तरि तो तुजसी मुक्त करी ॥१॥जिव्हाळ्याची भक्ती जरी तूं योजिसी । तरी नाचविसी परंधाम ॥२॥भोळ्या भावाचा भुकेला श्रीदत्त । भक्ती हेच वित्त अर्पी त्यासी ॥३॥तया योगे तुष्ट होईल तुजसी । मग सर्वस्वासी ओपील तो ॥४॥म्हणोनियां सेव तया अवधूता । धरी तत्परता त्याच्याठायी ॥५॥नाम घेई नित्य नाचूनी प्रेमाने । भुलेल आनंदाने दत्तात्रेय ॥६॥चरित्र त्याचे गाई गुण त्याचे वर्णी । तुझ्या अंत:करणी संचरेल ॥७॥जैसे जैसे बोल बोलसी प्रेमाचे । गहिवर साचे येतील त्या ॥८॥गहिवरोनियां तुज तो भेटेल । तुजला घेईल निजस्कंधी ॥९॥सकळ दु:ख तुझे हरोनी जाईल । सुखाचा होशिल निधि मग ॥१०॥म्हणोनियां भज भज त्या दत्ताला । मग बा तुजला उणे नाही ॥११॥विनायक म्हणे सार हे जाणोनी । द्त्ताचे भजनी सादर हो ॥१२॥==कधी न सोडावे देवालागीअशक्य ते शक्य करोनी दाविल । तुज वांचविल निर्धार हा ॥१॥अनुभव ऐसा कथिला पुराणी । तोच अंत:करणी विचारी तूं ॥२॥आजवरी तुज आला अनुभव । त्याची घे जाणीव आनंदाची ॥३॥तैशी साधुवाक्य़े संतांची वचने । विवेचि चित्ताने आपुल्या तूं ॥४॥सहाय करोनियां मनी सुविचार । पाववी निर्धार मनालागी ॥५॥मनाच्या निर्धारे होई सक्त पदी । मग तूं विपदीं पडसी ना ॥६॥तयालागी आहे सर्व तूझी चिंता । होय सोडविता तूज तोच ॥७॥विनायक म्हणे घ्यावे तुंवा नाम । कधी न पूर्ण काम सोडावा तो ॥८॥==कधी न सोडावे देवालागीसोडोनियां कोठे जाशील त्या सांग । पावशील भंग सोडितां त्या ॥१॥त्याचे वीण गति अन्य तुज नाही । फ़सूं नको पाही मोहबळे ॥२॥त्यासी आहे लाज आपुल्या भक्ताची । दृढता हे साची मनी धरी ॥३॥राखील तो लाज अभिमानी देव । दयाळू स्वभाव त्याचा सदा ॥४॥अभिमानी आहे आपुल्या दासांचा । निकट वसे साचा दयोदित ॥५॥राखील भक्तांसी भीड न धरील । उडी तो घालिल संकटांत ॥६॥म्हणोनियां मज भजरे त्या देवा । जयाच्या वैभवा तोड नाही ॥७॥विनायक म्हणे वळे कृपाघन । करितां भजन निश्चय हा ॥८॥==कधी न सोडावे देवालागीनिर्वाणीचा सदा एक दत्तात्रेय । धरी त्याचे पाय जीवे भावे ॥१॥कोणी भेडसावी कोणी मोह दावो । कोणी तुज खावो कांही होवो ॥२॥सोडूं नको पाय साधन निर्वाणीचे । करुं नको काचे मन निज ॥३॥धैर्याचा तूं मेरुं होवोनियां राही । भय मनी कांही आणूं नको ॥४॥नको मनीं कांही भलते तूं चिंतूं । नको तुज परंतु पण कांही ॥५॥सकळ निश्चयांत एकचि तूं धरी । अवघा मुरारी सर्व कांही ॥६॥गतिची हे गति प्राणाचा हा प्राण । येथे नाही वाण कसलीच ॥७॥परिपूर्ण ऐसे स्वरुप दत्ताचे । निर्धारावे साचे मनामधी ॥८॥धांवेल तो देव सोडवील तुज । तुझी तरी लाज राखील तो ॥९॥विनायक म्हणे निश्चयाचा भाव । धरितां दत्तदेव तारील की ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP