मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान| चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना सप्ताह-अनुष्ठान विषय जिव्हाळ्याचा देव भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात" सप्ताहसिध्यर्थ याचना भक्तकीर्तिसाठी याचना भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार देव मज करा अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना देव मज करा संकटाचे नाशासाठी प्रार्थना विनायकाठायी दत्तसंचार धर्मग्लानि धर्मविस्तारार्थ प्रार्थना व्हावे रामराज्य भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना निराशेचे बोल दत्ताधीनता कृतज्ञतावचन प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना क्षमायाचना पूर्वचरितकथन व क्षमायाचना अहंताविष अहित दलनासाठी प्रार्थना अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना देवावीण गति । नाही आम्हां प्रति ईश्वराच्या अर्तक्य लीला सुदामकथा भ्याडपणे भरे अज्ञानाने अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’ नाममंत्र व त्याचा प्रभाव वाल्मीकि चरित चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति सप्ताह अनुष्ठान - चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना Translation - भाषांतर शुक्रवार ता. १७-१०-१९३०चित्त-निरोधासी साधणे कठीण । म्हणोन चरण धरीय़ेले ॥१॥भजनपूजनी होवोनी सादर । स्थिर हे अंतर करु इच्छी ॥२॥जितुके होईल तितुके मी स्थैर्य । आणाया गुरुराय झटतसे ॥३॥साह्य करणार तुम्हीच मजला । बनाव माझा भला करणार ॥४॥काम्य माझे नाथ त्वरित पुरवावे । निश्चल करावे मजलागी ॥५॥विनायक म्हणे माझी भयभीति । घालवा श्रीपति त्वरितची ॥६॥==धांवामाझे कर्तव्य मी आचरित आहे । तुज भजता हे प्रेमभरे ॥१॥धरोनी विश्वास तुजला सेवितो । गुह्य हे सांगतो तुजपाशी ॥२॥जैसे ह्र्दय तैसे तुज निवेदितो । ताप शमवितो तुजपाशी ॥३॥धरोनी कामना तुज मी सेवितो । अभय मागतो तुझ्यापाशी ॥४॥भयभीत नाथा लपाया पाठीसी । मागे आश्रयासी तुझ्यापाशी ॥५॥कठिण प्रसंग, संकट दुर्धर । ब बाधत साचार मजलागी ॥६॥तरि आतां मज पाठीसी घालावे । संकटांत पावे मजलागी ॥७॥उपाय मजसी दुजा नसे कांही । म्हणोनिया पाहि शरणागत ॥८॥दुर्धर प्रसंगा तोंड द्यावयासी । दुजा न सजसी कोणी त्राता ॥९॥तूंच प्रतिभट शोभसी संकटा । योद्धा तूं गोमटा अग्नितुल्य ॥१०॥विनायक म्हणे मज रक्षायासी । घालावे पाठीसी दत्तानाथा ॥११॥==धांवामाझ्या संकटांचा करावा विनाश । मुळी अवकाश देऊं नका ॥१॥सत्वर प्रगटा वांचवाया दीना । कारण मन्मना धीर नाही ॥२॥नाही कोणी माझा लाज राखणारा । श्रीगुरु उदारा तुजवीण ॥३॥नको पाहूं माझे कांहीच तूं आतां । कुलशील ताता जगन्नाथा ॥४॥पूर्वीचे आताचे नको पाहूं कर्म । पावोत विराम संकटेही ॥५॥चुकलोच आहे आजवरी नाथा । मुकलोसें अर्था बहूतची ॥६॥परि ते कांही आतां नको मनी आणूं । भक्तीचे प्रमाणू मोजुं नका ॥७॥भक्त की अभक्त मी न कांही असे । उभय होतसे भक्ताभक्त ॥८॥परी त्याचा आतां न करि विचार । सद्गुरु उदार कृपाघन ॥९॥विनायक म्हणे करावे धाबणे । अनमान करणे युक्त नसे ॥१०॥==धांवाकांही झाले तरी शरण असे झालो । तुजपाशी आलो असे आतां ॥१॥ढोंग सोंग किंवा कोणत्याही मिषे । तुज स्तवीतसे कृपावंता ॥२॥पापाचीया योगे संकटी पडलो । परम असे भ्यालो अंतरांत ॥३॥पडलो अग्नित पडलो जलांत । पडत खोलांत तैसे झाले ॥४॥झडकरी धांव घेई रे सखया । माझी या ह्र्दया धीर द्याया ॥५॥विनायक म्हणे अगा जगदाधारा । करा साक्षात्कारा सत्वरची ॥६॥==धांवापळ पळ पळ जैसा काळ जातो । गळ्यासी पडतो फ़ांस माझ्या ॥१॥नको करुं आतां माझे तूं निर्वाण । कासावीस प्राण माझे आतां ॥२॥मज मूर्खालागी देवा कैचे ज्ञान । सकळ अज्ञान माझे ठायी ॥३॥तेणे भयभीत शरण चरणी । मज चक्रपाणी वांचवावे ॥४॥विनायक म्हणे उडी घाली त्वरे । यालागी सत्वरे तारी आतां ॥५॥==धांवापदर पसरीला नाथा तुझे पुढे । मज आतां गाढे वांचवावे ॥१॥निराशेचे मना झटकेच येती । ऐशी परिस्थिती झाली आहे ॥२॥डचमळोनियां रडे येत मज । माझी आतां लाज राखीराखी ॥३॥स्फ़ुंदोनीस्फ़ुंदोनी देवा मी रडतो । तुजसी पाहतो केविलवाणा ॥४॥साहायार्थ नाथा मुखाअवलोकितो । भाव मी कथितो माझा स्पष्ट ॥५॥माझे दैन्य हरा दोषां क्षमा करा । करा साक्षात्कारा लवलाहे ॥६॥ दीन गरीब हा विनायकदास । याजला प्रीतीस करावे की ॥७॥==धांवाजे जे कांही मनी ते ते मी बोलिलो । शरण जाहलो तूझे पायी ॥१॥नाही धीर मज झालो उतावळा । मज आतां स्नेहाळा संवधावे ॥२॥संकटांचा व्हावा पूर्णचि निरास । शुभचि विशेष घडुनी यावे ॥३॥विनायक म्हणे बोलायाचे जे का सद्गुरु तारका कळविले ॥४॥==धांवामाझे बोलण्याचा हेतु समजोनी । उडी त्वां घेऊनी प्रगटावे ॥१॥करावा दु:खाचा सकल परिहार । श्रीगुरु उदार कृपासिंधू ॥२॥साक्षात्कार करा येथे जगन्नाथा । पुरवावे अर्था मनीचिया ॥३॥विनायक म्हणे कष्ट निवारण । करा नारायण सत्वरेसी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP