मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
अहित दलनासाठी प्रार्थना

सप्ताह अनुष्ठान - अहित दलनासाठी प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


माझीया शत्रूंचा पूर्ण व्हावा नाश । मागत करुणेश तुम्हांपाशी ॥१॥
माझे चित्त स्वस्थ व्हावया कारण । शत्रू निर्दाळण करावे की ॥२॥
वैरियांचा मज किती आहे त्रास । किती अभिचारास केले असे ॥३॥
अभिचार योगे मजसी पीडिले । वैरियानी भले दत्तात्रेया ॥४॥
आम्ही केला आहे तुमचा आश्रय । सेवितसो पाय विनयाने ॥५॥
तरी अभिचार पूर्ण शमवावा । वैरीयांचा व्हावा पूर्ण घात ॥६॥
तुमचे हे कार्य सिद्ध की व्हावया । ऐसे गुरुराया करावेच ॥७॥
उपासना कार्यासाठी हे मागतो । बहु विनवितो तुम्हांलागी ॥८॥
धर्मसंरक्षणा अधर्मतक्षणा । अहित दलना करा माझ्या ॥९॥
तुमच्या स्थानाचा व्हावया विजय । वैरियांचा क्षय करावा की ॥१०॥
तुमचीया दासां विजयी कराया । सकळ वैरियां मारावे की ॥११॥
जे का तुझे भक्त तयांचा उत्कर्ष । श्रीगुरु विशेष करावा की ॥१२॥
विनायक प्रार्थी लडिवाळपणे । विजयी करणे मजलागी ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP