मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना

सप्ताह अनुष्ठान - अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


भजनाचा दावी माझे ठायी प्रभाव । धरुनियां भाव प्रगटतेचा ॥१॥
माझे ठायी होई प्रगट दत्तनाथा । श्रीगुरुसमर्था पूर्णत्वाने ॥२॥
माझे ठायी होवो संचार आपुला । प्रगटी चैतन्याला माझे ठायी ॥३॥
माझे ठाय़ी प्रेम वाढो अलौकिक । जेणे जनलोक विश्वासती ॥४॥
तूझीया नामाचा प्रताप दिसावा । माझा देह व्हावा तेजोमय ॥५॥
लोकांचीये दृष्टी दत्त मी दिसावे । अनुभवा यावे दत्ता परि ॥६॥
माझी वाणी व्हावी सत्य वासुदेवा । भजन वैभव वाढवाया ॥७॥
अतुल्य सामर्थ्य मज प्राप्त व्हावे । योगारुढ दिसावे सकळांसी ॥८॥
जैसा त्यागि योगी भोगी दत्त देव । तैसेच वैभव दिसो माझे ॥९॥
माझ्या ठायी नाथा तूझा साक्षात्कार । दाखवी उदार जनलोकी ॥१०॥
भक्ती भावनेने धरिले भजन । तरी दयाघन घडवी ऐसे ॥११॥
विनायक म्हणे माझीया बोलांसी । आणि सत्यत्वासी कार्यास्तव ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP