मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
सप्ताहसिध्यर्थ याचना

सप्ताह अनुष्ठान - सप्ताहसिध्यर्थ याचना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सप्ताह परायण तूझे आरंभिले । चरित्राचे भले तूझीया मी ॥१॥
तरी मज होई साह्य कृपाळू वा । आपुल्या वैभवा प्रगटवी ॥२॥
साक्षात्कार दावी दावी चमत्कार । येथे श्री गुरुवर कृपाळूत्वे ॥३॥
याहुनि मी काय तूज सांगणार । काय बोलणार सांग नाथा ॥४॥
आरंभिले कार्य नाथ सिद्ध करी । करोनियां दूरी विघ्नांलागी ॥५॥
आनंदचि करी आपुल्या भक्तांचा । निरंतर साचा गुरुराया ॥६॥
जरि न तूं आम्हां आपुले म्हणणार । भजन करणार कशासाठी ॥७॥
जरी तूं न आमुचा करिसी अंगिकार । काय बडिवार भजनाचा ॥८॥
विश्वासोनि आम्ही तूजला सेवितो । प्रसाद इच्छितो घडो ऐसे ॥९॥
तरी वाली होई कैवारि आमुचा । हाच प्रार्थनेचा हेतु दत्ता ॥१०॥
आम्हांसी तूं घाली आपुल्या पाठीसी । श्रीगुरुदयाराशि कृपामूर्ति ॥११॥
विनायक म्हणे प्रगटावे आतां । श्रीगुरुसमर्था साक्षात्कारे ॥१२॥
==
धांवा
शनिवार ता. १०-५-१९३०

धांव घेई आतां मजसाठी दत्ता । प्रगटवी सत्ता येथे नित्य ॥१॥
होई प्रगट तूं निजकार्यासाठी । स्वामी जगजेठी अधोक्षज ॥२॥
तूजवरि आहे सकल नाथा भार । आम्हांसी आधार तूंच एक ॥३॥
धरोनियां श्रद्धा कार्य आरंभिले । प्रिय व्हावे भले तूजलागी ॥४॥
करि आतां चीज आमुच्या श्रद्धेचे । गुरुराया साचे दत्तनाथा ॥५॥
माझ्या ह्रदयांत दृढ हा विश्वास । पुरवावी आस माझी प्रेमे ॥६॥
प्रियपण तुझे मज आहे ठावे । सांगेन अनुभवे निर्भय मि ॥७॥
अनुभव त्याचा मज असे आला । भय सांगण्याला मज कैचे ॥८॥
तुझा प्रियपणा नाथ अनेकवार । अनुभविला थोर किती सांगूं ॥९॥
तोच आतां पुढे येवो अनुभवा । हेच दत्तदेवा मागतो मी ॥१०॥
मजसाठी आतां घालोनिय़ां उडी । येई तूं तांतडी जगन्नाथा ॥११॥
मज नको आतां लटिका तूं पाहूं । निज नको सांडूं स्वभावाला ॥१२॥
तूझा प्रियपणा येथे उभारावा । कार्यभाग व्हावा आम्हां दासांचा ॥१३॥
विनायक म्हणे अत्रिच्या नन्दना । त्रैलोक्यवंदना धांव घेई ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP