मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ७२२१ ते ७२३४ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ नाटाचे अभंग - ७२२१ ते ७२३४ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत नाटाचे अभंग - ७२२१ ते ७२३४ Translation - भाषांतर ॥७२२१॥शरीर दु:खाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार ॥शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचें घोंसुलें ॥शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥२॥शरीर विटाळाचें आळें । मायामोहपाशजाळें ॥पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥३॥शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध ॥शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥४॥शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा ॥शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥५॥शरीरा सुख नेदावा भोग । न द्यावें दु:ख न करीं त्याग ॥नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग करीं हरि भजनीं ॥५॥॥७२२२॥इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्ते वेव्हारी सुखरुप ॥१॥न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस ॥जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ॥संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसीं बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥धरुनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार ।तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥५॥॥७२२३॥संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार ॥बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥किती जन्म झाला फेरा । गणित नाहीं जी दातारा ॥पडिलों आवर्ती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥२॥वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धि ॥मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनियां ॥३॥अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा ॥बाळत्व तारुण्य जरा । प्रधानपुरा भोग तेथें ॥४॥ऐसीं उलंघुनि आलों स्थळें । बहुभोवंडिलों काळें ॥आतां हे उगवावें जाळें । उजेडाअ बळें दिवसाच्या ॥५॥सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट ॥दावी सत्या ऐसें नष्ट । तुका ह्मणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥६॥॥७२२४॥विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरी निवासी ॥विठ्ठल पुंडलिकापाशीं । कृपादानविसीं उदार ॥१॥विठ्ठल स्मरणा कोंवळा । विठ्ठल गौरवीं आगळा ॥आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥२॥उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न ॥समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥३॥रुचीचे प्रकार । आणिताति आदरें ॥कोठेंही न पडे अंतर । थोरां थोर धाकुटयां धाकुटा ॥४॥करितां बळ धरितां नये । झोंबता डोळे मनें च होय ॥आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥५॥पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें ।करितों सेवन आइतें । तुका ह्मणे चित्तें चित्त मेळवूनी ॥६॥॥७२२५॥ताप हे हरण श्रीमुख । हरीं भवरोगा ऐसें दु:ख ॥अवलोकितां उपजे सुख । उभे सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी ॥स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥२॥राम कृष्णध्यान वामन नारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं ॥सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥३॥गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण ॥व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥५॥ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार ॥अनंत आणि अपार । तो हा कठीं कर धरिताहे ॥५॥जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा ॥अनंतां अंगीं अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक ॥६॥॥७२२६॥अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ॥ जगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ॥अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥२॥अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ॥अगा निर्गुणा निराकारा । अगा आधार दिनाचिया ॥३॥अगा उपमन्यसहाकारा । अगा शयनाफणिवरा ॥अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥४॥अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापती राजहंसा ॥अगा ये पंढरीनिवासा । अगा सर्वेशा सहजरुपा ॥५॥अगा परमात्मा परमपुरुषा । अगा अव्यया जगदीशा ॥अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडी भवपाशा तुका ह्मणे ॥६॥॥७२२७॥कैसी करुं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ॥कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशा परी ॥१॥कर्म भ्रष्ट माझें मन । नेणें जपतप अनुष्ठान ॥नाहीं इंद्रियांसी दमन । नव्हे मन एक विध ॥२॥नेणें यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ॥मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥३॥न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ॥ न जिंकवती सकळ । काम क्रोध शरीरीं ॥४॥आतां राख कैसें तरी । मज नुपेक्षावें हरी ॥तुझीं ब्रिंदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका ह्मणे ॥५॥॥७२२८॥हरी नारायणा केशवा । गोविंदा गोपाळा माधवा ॥कृष्णा विष्णु श्रीरामा यादवा । मधुसूदना सर्वेशा ॥१॥वामना विराटा त्रिविक्रमा । श्रीधरा वैकुंठधामा ॥भक्तमनोरथपूर्णकामा । परशरामा कृपाळा ॥२॥पद्मनाभा हृषीकेशा । दामोदरा पूर्ण परेशा ॥संकर्षणा आदि सर्वेशा । परमपुरुषा परमात्मा ॥३॥प्रद्युम्ना जगदीशा । माझी आजी पुरवावी आशा ॥तुज प्रार्थितो पुराणपुरुषा । विबुधईशा पाळका ॥४॥अनिरुद्धा पुरुषोत्तमा । रमारमणा मेघ:श्यामा ॥ अधोक्षजा गोकुळ धामा । अच्युता अनंता नरहरी ॥५॥गोपीव्रजजनसुखकरा । कंसमर्दना वीरयावीरा ॥कुब्जारत यदुवीरा । दीनोद्धारा दीनबंधु ॥६॥तुका ह्मणे विश्वंभरिता । तुज ऐसा नाहीं दाता ॥कोठें न दिसे धुंडितां । माझी चिंता करावी ॥७॥॥७२२९॥विठ्ठल जिवाचा सांगाती । विठ्ठल वसे सर्वाभूतीं ॥विठ्ठल दिसतसे सुषुप्ती । स्वप्न जागृती विठ्ठल ॥१॥विठ्ठल सर्वांचा आधार । विठ्ठल मुक्तीचें माहेर ॥विठ्ठल साराचें ही सार । विश्वाधार विठ्ठल ॥२॥विठ्ठल साधन परब्रह्म । विठ्ठल कैवल्याचें धाम ॥विठ्ठल नाम परम ॥ हरती श्रम जन्माचे ॥३॥विठ्ठल सर्वस्वें उदार । उभारिला अभयकर ॥रुक्मादेवीस्वामीवर । करुणाकर विठ्ठल ॥४॥विठ्ठल सकळांचा दाता । विठ्ठल सर्वा आधीष्ठाता ॥विठ्ठल भर्ता आणि भोक्ता । विठ्ठल दाता दिनाचा ॥५॥विठ्ठल गुणांचा गुणनिधी । विठ्ठल करुणेचा उदधि ॥विठ्ठल माझी सर्व सिद्धी । विठ्ठल विधी विधान ॥६॥विठ्ठल जिवाचा हा जीव । विठ्ठल भावाचाही भाव ॥तुका ह्मणे गुणार्णव । देवादेव विठ्ठल ॥७॥॥७२३०॥षड्गुण ऐश्वर्य संपत्ति । धीर उदार तूं श्रीपति ॥परम कृपाळ परंज्योति । चरित्र कीर्ति काय वाणूं ॥१॥जन्मोजन्मीं सुकृत राशी । गाई चारी संरक्षणेसी ।मयुरपिच्छ मोरविशी । गोपाळांसी दाखवी ॥२॥वत्सें गोप ब्रह्मयानें । सत्य लोका नेले चोरुन ॥भक्तवत्सल भगवान । झाला आपण दो ठायीं ॥३॥वत्सें वत्सप गाई होऊन । आपुलें दाविलें महिमान ॥ब्रह्मादिकां न कळे खूण । परीपूर्ण पांडुरंगा ॥४॥शेवटीं नीच काम करिसी । पांडवांचा पक्षपाती होसी ॥गिळोनी अघासुरासी । बकासुरासी चिरोनी ॥५॥वत्सासुरासी रगडीलें । तट्टू खेटुनी मारिलें ॥गाडा दृष्टीनें भंगिलें । विमळार्जुन रांगतां ॥६॥खाऊनी तांतडी भाजीपान । तृप्त केले ऋषीजन ॥तुका ह्मणे आतां मी दीन । कांहीं वचन बोलावें ॥७॥॥७२३१॥विठ्ठल सुखाची मूर्ती । विठ्ठल धाम परंज्योति ॥विठ्ठलाची अपार कीर्ती । त्रिजगती विस्तार ॥१॥विठ्ठल अनाथाचा बंधु । विठ्ठल हा करुणासिंधु ॥विठ्ठल विठ्ठल छंदु । तोडी हा बाधु जन्माचा ॥२॥विठ्ठल मोक्षसिंधुदाता । विठ्ठल जग उद्धारिता ॥विठ्ठल सर्वस्व जाणता । विठ्ठल कर्ता सर्वही ॥३॥विठ्ठल कृपेचा सागर । विठ्ठल अमृताअगर ॥विठ्ठल निर्गुण निर्विकार । नकळें पार शेषासी ॥४॥विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेम जीवनकळा ॥विठ्ठल अनादि सोंवळा । माया विटाळा न लिंपे ॥५॥विठ्ठल रक्षी निज भक्तां । विठ्ठल कीर्तनासी भोक्ता ॥तुका ह्मणे श्रोता वक्ता । करिता कथा लुब्धक ॥६॥॥७२३२॥वेद उद्भवे त्रिकांड । कंबुकंठ शोभादंड ॥आपाद प्रचंड । वैजयंती साजिरी ॥१॥आयुधमंडित चारी भुजा । दशांगुळें उदार हस्त वोजा ॥भक्तपाळण गरुडध्वजा । भक्तराजा हें नाम ॥नाना भूषणें मणगटीं । दंड सरळ चंदन उटी ॥बाहु सरळ मय़ूर वेटी । केयूरांगद मिरविती ॥३॥रम्य हनुवटी साजिरी । दंतपंक्ती विराजे अधरीं ॥नासीक ओतींव कुसरीं । शुकाचिये परी शोभलें ॥४॥ नेत्र आकर्ण कमळाकार । भोंवया व्यंकटा भाळविस्तार ॥ उटी पिवळी टिळक कस्तुर । शोभा अपार मुगुटाची ॥५॥माथां धरिला किरीट । मयूरपिच्छ लाविले दाट ॥हिरे घन एकवट । नीळकंठ मस्तकीं ॥६॥अनेक भ्रमर सुवास । सेविताती आमोदरस ॥तुका ह्मणे त्या भाग्यास । पार नाहीं पाहा त्या ॥७॥॥७२३३॥आतां मी पतीत पतीत । नाहीं पातकासी नीत ॥परी तुझा शरणागत । झालों अंत न पाही ॥१॥नाहीं स्वस्थीर पायीं बुद्धि नाहीं हे ॥२॥कोटी घडले अपराध । नाहीं भाव एकविध ॥याचे गाईलें नाहीं शुद्ध । परमानंद कृपाळा ॥३॥दास ह्मणवी एक चित्तें । सेविलें नाहीं नामामृत ॥जाणितसें नसे अनाथें । पर कायेतें विस्मृती ॥४॥जो होतो सकळ विचार । पायीं निवेदिला विस्तार ॥आतां कळेल तो विचार । करी साचार स्वामिया ॥५॥तुह्मां सांगणें प्रकार । हें तो वागजाल साचार ॥केला करी अंगिकार । बहुत फार न बोलें ॥६॥तुका आला लोटांगणीं । माझी परिसावी विनवणी ॥द्यावी प्रेमसुख धणी । चक्रपाणी दीनानाथा ॥७॥॥७२३४॥अगा ये विठोबा अनामा । अगा ये अरुपा नारायणा ॥अगा गोपी मनरंजना । मुरमर्दना मुरारी ॥१॥अगा ये अलक्षा अपारा अगा ये मत्स्यकत्स्यधरा ॥अगा ये नृसिंहा शूकरा । अदितीपुत्रा वामना ॥२॥अगा ये रेणुकानंदना । अगा ये रघुपती लक्षुमणा ॥यादवदळीं बळी कृष्णा । खगवाहना गोविंदा ॥३॥बौध्य कलंकीं क्षेत्रकरा । अगा ये असुर संहारा ॥अगा अपारविश्वाधरा । अगा श्रीधरा विठोबा ॥४॥अगा सर्वेशा संकर्षणा । असुरमर्दना जनार्दना ॥ अगा कपी मनरंजना । आनंदघना अपारा ॥५॥अगा ये राम कोदंडपाणी । सिंधुसुदन आनंदशयनी ॥अगा अभ्यंतरतरणी। सहस्त्र किरणीं प्रकाशा ॥६॥अगा ये पांडवपाळका । अगा ये ह्मणतसे तुका ॥अगा अर्जुनपणरक्षका । रमानायका पांडुरंगा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : June 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP