मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ६४२८ ते ६४७८ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ अभंग - ६४२८ ते ६४७८ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत सखीभाव किंवा विरहिणीचे अभंग Translation - भाषांतर ॥६४२८॥वाळॊ जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडुनि लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे झालों तुका हरिरता ॥३॥॥६४२९॥आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस पाहिजे जवळी । क्षण त्या निराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातिलें अनंता तुका म्हणे ॥३॥॥६४३०॥झालिया नि:शंक फिटला कांसोटा । आतां मणगटा लावा चुना ॥१॥हाचि नेम आतां न फिरे माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाच्या ॥२॥घर रिघी झालें पट्टराणी बळें । वारलें सांवळें परब्रह्म ॥३॥बळियाचा अंगसंग झाला आतां । रतलें अनंताचिये पायीं ॥४॥तुका म्हणे आम्हा नाहीं लाज आतां । भय धाक चिंता तुका म्हणे ॥५॥॥६४३१॥नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सरती लोकांमाजी झालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । झालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥॥६४३२॥विसरलें कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी झालें ॥३॥॥६४३३॥न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥॥६४३४॥दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनियां ॥१॥बळियाच्या आह्मी झालों बळिवंता । करुं सर्व सत्ता सर्वावरी ॥२॥तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा । झालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥॥६४३५॥क्षणभरी आह्मीं सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दु:खाचिया ॥२॥तुका ह्मणे येथें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥॥६४३६॥आह्मां आह्मी आतां वडिल धाकुटीं । नाहीं पाटी पोटीं कोणी दुजें ॥१॥फावला एकांत एकविध भाव । हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥२॥तुका ह्मणे अंगसंग एके ठायीं । असो जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥॥६४३७॥सर्व सुख आम्ही भोगूं सर्वकाळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥तुका म्हणे आतां गर्भ नये धरुं । औषध जें करुं फळ नव्हे ॥३॥॥६४३८॥एका जीवें आतां जिणें झालें दोहीं । वेगळिक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळिक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे झालें सायासाचे फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥॥६४३९॥हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥सेवा सुखें करुं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥तुका म्हणे आम्ही झालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥॥६४४०॥मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिने बाइयानों ॥१॥न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥तुका म्हणे झालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥॥६४४१॥शिकविलें तुम्ही तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥॥६४४२॥सांगतों तें तुम्हीं आइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूम नका ॥१॥जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥॥६४४३॥आजिवरी तुम्हां आम्हां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥आतां अनावर झालें अगुणाची । करुं नये तें चि करीं सुखें ॥२॥तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्हीं । कुळें एक मनीं नारायण ॥३॥॥६४४४॥सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चिं ॥१॥सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥न व्हावी ते झाली आमची भंडाई । तुका म्हणे कायी लाजों आतां ॥३॥॥६४४५॥मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी संग सरी तुम्हां आम्हां ॥३॥॥६४४६॥परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें शीर ॥१॥संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥॥६४४७॥आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥१॥नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥॥६४४८॥आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरुनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥॥६४४९॥बहुतांच्या आम्ही न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥॥६४५०॥त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥मागिलांचें दु:ख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥॥६४५१॥न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥मानेल त्या तुम्ही आइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥तुका म्हणे तुम्ही फिरावें बहुतीं । माझी तों हे गती झाली आतां ॥३॥॥६४५२॥न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥आतां तुम्हां पुढें जोडितसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥॥६४५३॥एकली राणा गोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें ॥१॥मज न ह्मणा न ह्मणा शिंदळी । नाहीं विषम जवळी आतळलें ॥२॥नव्हती देखिली म्यां वाट । ह्मणोनि हा धीट संग केला ॥३॥भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥४॥सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥५॥आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥६॥तुका ह्मणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥७॥॥६४५४॥होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ॥व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥स्थिर स्थिर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ॥येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपात आलें तें दुसरें वारा वो ॥२॥मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी ॥ नाहीं लौकिक स्मरला आवडीं । आतां येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥३॥उदयीं उदय साधिला आवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश ॥धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता नये दिवस वो ॥४॥॥६४५५॥स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ॥अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्व साक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥आपाआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न सांडिती बोल ॥एका मेघ:शामें जलधर बोल । रसी उताविळ हृदय सखोल वो ॥२॥एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरी ॥अंध बहिर हे प्रेत लोकाचारी । त्याची कीर्ती गाईली पुराणांतरीं वो ॥३॥स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर ॥ परस्परें हें सादरासादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥४॥भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ॥दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरी वो ॥५॥तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून ॥पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥६॥॥६३५६॥याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासुनि ॥२॥झालें तरीं काय तंट । आतां घट न संडे ॥३॥तुका म्हणे चक्र चाळे । वेड बळें लाविलें ॥४॥॥६४५७॥याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥नेदी मग फिरों मागें । अंगा अंगे संचरे ॥२॥कां गा याची नेणां खोडी जीभा जोडी करितसा ॥३॥पावरे तें बहु काळें । घोंगडे ही ठायींचें ॥३॥अंगीं वसेचिना लाज । न ह्मणे भाज कोणाची ॥४॥सर्वासाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥तुका ह्मणे धरिला हातीं । मग निश्चिती हरीनें ॥६॥॥६४५८॥कोंडिलागे माज । निरोधुनि द्वार ॥ राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी ॥ घाला गांठीं धरी । जीवें माय त्रासाया ॥२॥तेंचि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड ॥ लावुनी चरफड । हात गोउनी पळावें ॥३॥संशयाचें बिरडें । याचे निरसले भेटी ॥ घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥४॥तुका येतो काकुलती । वाउगिया सोड ॥ यासीच निवाड । आह्मी भार वाहिका ॥५॥॥६४५९॥तन मन माझे गोविंदाचे पायीं । वेधियलें बाई न सुटे चि ॥१॥गोत वित्त चित्त नाठवेसें झालें । मन विसरलें मनपणा ॥२॥लज्जा भय चिंता द्वेष मोह दु:ख । तहान ही भूक विसरलें ॥३॥विसरलें कूळ यातीचा स्वभाव । मिराशीचा गांव एक झाला ॥४॥लागली समाधी नाठवे दुसरें । झालें एकसरेम तद्रूपचि ॥५॥चिदानंदीं वृत्ती झालीसे निमग्न लावियले लग्न स्वरुपेंसी ॥६॥अखंड समाधी गोविंद नामाची । असे माझें मींचि तदाकार ॥७॥तदाकार वृत्ती गोविंदाचे पायीं । तुका ह्मणे नाहीं दुजें आतां ॥८॥॥६४६०॥वेधियेलें मन विसरलें देह । पती सुत गेह धन वित्त ॥१॥नाठवेचि भोग नाना उपचार । पडला विसर वासनेचा ॥२॥चिंता भय लज्जा निमालें हें दु:ख । वोसंडलें सुख ब्रह्मानंद ॥३॥विसरली मान पीदा करीजन । दिसे नारायण विश्वामाजी ॥४॥तुका ह्मणे देह दिला पंढरीशा । तेव्हां ऐशी दशा आंगा आली ॥५॥॥६४६१॥हसूं रुसूं आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥सेवा सुखें करुं आनंदवचन । आह्मी नारायण एका एकीं ॥२॥तुका ह्मणे आतां झालें उदासीन । आपुल्या आधीन केला पती ॥३॥॥६४६२॥आलियें धांवति धांवति भेट होइल म्हूण । तंव ते टळली वे वो माझा उरला सीण ॥१॥आतां काय करुं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥२॥लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दु:ख पावल्यें पीडा ॥३॥जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥४॥॥६४६३॥हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥२॥पारखियासी सांगतां गोष्टी । घरची कुटी खातील ॥३॥तुका ह्मणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं धणीवरि ॥४॥॥६४६४॥धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥चोरुनियां तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥२॥दोन्हीं ठायीं समाधान । सम कठिण बहुतचि ॥३॥तुका ह्मणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥४॥॥६४६५॥उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥१॥वेटाळिला भोंवता हरी । मयुर फेरी नाचती ॥२॥मना आलें करिती चार । त्या फार हा एकला ॥३॥तुका ह्मणे नारायणीं । निरंजनीं मीनलिया ॥४॥॥६४६६॥आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥२॥वचनासी वचन मिळे । रिघती डोळे डोळियांत ॥३॥तुका ह्मणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥॥६४६७॥कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥अवघियांची जगनिंद । झाली धिंद सारखी ॥२॥अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥३॥तुका ह्मणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥४॥॥६४६८॥येथील जे एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥२॥अवघे दिवस गेले कामा । नाहीं जन्मा खंडण ॥३॥तुका ह्मणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥४॥॥६४६९॥जैशा तुह्मी दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥नका येऊं देऊ आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥२॥अवघा हाचि राखा काळ । विक्राळचि भोंवता ॥३॥तुका ह्मणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥४॥॥६४७०॥बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥१॥बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥२॥नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगऋणी ॥३॥ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥४॥॥६४७१॥काय करावें तें आतां । झालें नयेसें बोलतां ॥१॥नाहीं दोघाचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥२॥होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥३॥तुका ह्मणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥४॥॥६४७२॥हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥केला ऋणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥२॥घालोनियां भार माथां । अवघी चिंता वारली ॥३॥तुका ह्मणे वचनासाठीं । नाम कंठीं धरोनि ॥४॥॥६४७३॥अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥याची झाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥२॥बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥३॥तुका ह्मणे मुळें । खंड झाला एका वेळे ॥४॥॥६४७४॥न गमे न गमे न गमे हरिविण । न गमे न गमे न गमे । मेळवा शाम कोणी गे ॥१॥तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥२॥नाठवे भूक तान विकळ झालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥३॥जरी तुह्मी नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥४॥॥६४७५॥एक वेळे तरी जाईन माहेरा । बहूजन्म फेरा झाल्यावरी ॥१॥चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥२॥करावें तें करी कारण शरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥३॥तुका म्हणे तरी होईल विलंब । परी माझा लाभ खरा झाला ॥४॥॥६४७६॥उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥जिव्हाळ्याच्या काठी उबाळ्याच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥२॥तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥३॥तुका ह्मणे ऐसी नोवर्याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥४॥॥६४७७॥एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी ॥१॥कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥२॥जाउनि पडे दुर्धटवनीं । श्वापदानीं वेढिली ॥३॥मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें ॥४॥मागील मागे अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥४॥तुका ह्मणे चिंतीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥५॥॥६४७८॥पडली घोर रजनी । संगीं कोणी नसे चि ॥१॥पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥२॥कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥३॥मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥४॥तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरी नाडिलें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP