मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ७१४७ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ येकाखडी अभंग - ७१४७ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत येकाखडी अभंग - ७१४७ Translation - भाषांतर ॥७१४७॥करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनियां भाव ॥२॥खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥३॥गजर नामाचा । करा लवलाहें वाचा ॥४॥घरटी चक्रफेरा । जन्ममृत्यूचा भोंवरा ॥५॥नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥६॥चरणीं ठेवा चित्त । ह्मणवा देवाचे अंकित ॥७॥छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥८॥जगाचा जनिता । भुक्तिमुक्तीचाही दाता ॥९॥झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥१०॥यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥११॥टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥१२॥ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१३॥डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१४॥ढळों नये जरी । लाभ घरींचिया घरीं ॥१५॥नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१६॥तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१७॥थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१८॥दया तिचें नांव । अहंकार जाय जंव ॥१९॥धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥२०॥नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२१॥परउपकारा । वेचा शक्ति निंदा वारा ॥२२॥फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२३॥बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२४॥भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२५॥माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२६॥यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२७॥रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२८॥लकार लाविला । असतांनसतांचि उगला ॥२९॥वासनेची धाडी । बंद खोडया नाडया बेडी ॥३०॥सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३१॥खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३२॥सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३३॥हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥३४॥अळंकार लेणें । ल्यारे तुळसीमुद्राभूषणें ॥३५॥ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : June 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP