मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७०६५ ते ७०६६

पंढरपूर - ७०६५ ते ७०६६

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७०६५॥
जया दोषां परिहार । नाहीं नाहीं धुंडतां शास्त्र ॥ ते हरती आपार । पंढरपूर देखिलियां ॥१॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मतीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥२॥
सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार ॥ होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥३॥
नाहीं उपमा द्यावया । समतुल्य आणिका ठाया ॥ धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥४॥
उपजोनी संसारीं । एक वेळ पाहें पंढरी ॥ महादोषां कैंची उरी । देवभक्त देखिलिया ॥५॥
ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी ॥ सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥६॥
तें सुख वर्णावया गति । एवढी कैंची मज मति ॥ जे पंढरपुरा जाती ॥ ते पावती वैकुंठ ॥७॥
तुका ह्मणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा ॥ अधम जन्मांतरींचा । तया पंढरी नावडे ॥८॥

॥७०७६॥
दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभाळिती देवरायें ॥१॥
तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजनां ॥२॥
पांडुरंगीं ज्याची निष्ठा परिपूर्ण । सर्वाभुतीं जाणें एक निष्ठा ॥३॥
मंगळवेढा असे वस्ति कुंटुबेंसी । व्यापारी सर्वासी मान्य सदा ॥४॥
कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥५॥
धान्याची भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रक्षिली दुष्काळांत ॥६॥
दुबळीं अनाथ तीं ही वांचविलीं । राष्ट्रांतते झाली कीर्ति मोठी ॥७॥
मुजुम करीत होता कानडा ब्राह्मण । फिर्याद लिहून पाठविली ॥८॥
अविंदाचें राज्य वेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥९॥
दामाजीपंतासी धरोनी चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥१०॥
माझिया भक्तांचें जे उणें पहाती । तया अध:पातीं वस्ती होय ॥११॥
भक्तांचें सांकडें सोसी अहर्निशी । अखंड त्यांपासी तिष्ठे हरी ॥१२॥
मंगळवेढयांतुनी पंढरीसी आला । जिवें ओंवाळिला दामाजीनें ॥१३॥
सवें दूत घेऊनी आला पंढरीसी । नमस्कार देवासी केला त्यानें ॥१४॥
हेचि भेटी देवा लोभ असो द्यावा । पुन: मी केशवा नये येथें ॥१५॥
अहो रुक्मिणी जीवींचें हें गुज । पूर्ण भक्तराज दामाजी हा ॥१६॥
फेडिला सोनसळा कास जैं घातली । वैजयंती काढिली कुंडलें तीं ॥१७॥
रुक्मिणी पुसते एक विज्ञापना । ऐका नारायणा करूणा माझी ॥१८॥
निढाळले नयन दिसताती आजी । अस्वस्था हे कांजी विपरीत ॥१९॥
वेदरासी रायें त्याला चालविलें । मज सांभाळिलें पाहिजे त्या ॥२०॥
विकते धारणे सवाईचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥२१॥
दामाजीपंत ज्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥२२॥
विठो पाडेवार भक्तां साह्य झाला । बेदरासी गेला रायापासीं ॥२३॥
जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो म्हणे स्थळ मंगळवेढें ॥२४॥
दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥२५॥
देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली ॥२६॥
काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो म्हणे बेगारी विठा कीं जी ॥२७॥
पावल्याचा जाब द्यावा मायबाप करोनि घेतों माप म्हणती ते ॥२८॥
पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥२९॥
छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनी ॥३०॥
वाटे चुकामुक झाली याची त्यांची । ते आले तैसेचि मंगळवेढा ॥३१॥
दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा म्हणे झालें कवतुक ॥३२॥
काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥३३॥
काय तुमचें काज सांगा जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा ॥३४॥
कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला ॥३५॥
पाहातांचि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥३६॥
सांवळें सकुमार रुप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥३७॥
दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो म्हणे आपलें कर्म नव्हे ॥३८॥
आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी ॥३९॥
निरोप घेऊनी आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता झाला ॥४०॥
दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृत्ति ॥४१॥
तुका म्हणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासा लागीं ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP