मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६३५१ ते ६३५३

अभंग - ६३५१ ते ६३५३

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६३५१॥
परिसे वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भागीरथी महादोष निवारणी । सकळा स्वामिणी तीर्थाचिये ॥२॥
जीतां मुक्ति मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्रीं सुखरुप ॥३॥
तुका विष्णुदास संतांचें पोसणें । वाक्पुष्प तेणें पाठविलें ॥४॥

॥६३५२॥
तुह्मी विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥२॥
काय उणें तुम्हांपाशीं । मी तों अल्पें चि संतोषी ॥३॥
तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥४॥

॥६३५३॥
तीर्था तीर्थी राज वर्णिली पुराणीं । प्रयाग त्रिवेणी क्षेम देती ॥१॥
देवांसी दुर्लभ तीरीं तुझा वास । आल्याच्या कामास इच्छा पुरे ॥२॥
मुख्य भागिरथी दोष निवारिणी । यमुना निर्विघ्नी महादोष ॥३॥
अक्षयी वट तो संगमीं विराजे । दर्शनें सहज पाप जाय ॥४॥
माघ स्नान घडे संगमीम प्राणिया । दिव्य होय काया पुण्य बहू ॥५॥
संगमीं मरण घडे थोर पुण्य़ । इच्छितार्थ देणें याचकासी ॥६॥
ऐसी कीर्ति जगीं विराजे त्रिलोकीं । भुक्ति मुक्ति सुखी सर्व प्राणी ॥७॥
ऋषी मुनी सिद्ध वास तुझा तिरीं । ब्रम्हदेवें तरी याग केले ॥८॥
तुका म्हणे येथें जोडुनियां हात । केला प्रणिपात नाम घेतां ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP