श्रावण शुद्ध १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सुभाषचंद्र बोस यांचें निधन !
शके १८६७ च्या श्रावण शु. १० या दिवशीं भारताचे तेजस्वी क्रांतिवीर सुभासचंद्र बोस विमानाच्या अपघातांत जखमी होऊन जपानी इस्पितळांत निधन पावले.
सुभाषचंद्र बोस अस्सल क्रांतिवीर होते. २६ जानेवारी १९४१ रोजीं सुभाषबाबू अकल्पितपणें आपल्या घरांतून अदृश्य झाले. सुभाषचंद्र कोठें गेले ? सर्व भारताला आश्चर्याचा धक्का बसला. परदेशांत जाऊन सशस्त्र क्रांति करावी आणि भारताला दास्यमुक्त करावें हा त्यांचा हेतु होता. सन १९४२ मध्यें बर्लिन रेडिओवरुन त्यांनीं ‘भारता’ला उद्देशून एक भाषण केलें ! सुभाषचंद्र जर्मनींत आहेत म्हणजे शत्रुराष्ट्राला मिळून युध्दास आव्हान देण्याचा त्यांचा विचार आहे, असें समजून हिंदुस्थान सरकारनें त्यांना देशद्रोही ठरविलें. कित्येकांनीं ‘किस्लिग’ हें हलकें विशेषण त्यांना लाविलें.
“सशस्त्र क्रांति करुन ब्रिटिशांना भारतांतून हांकलून दिल्याशिवाय ते जाणार नाहींत असा सुभाषबाबूंचा विश्वास असल्यामुळें त्यांनीं ‘आझाद हिद सेना’ स्थापन केलीं. ‘स्वतंत्र हिंदुस्थानचे अध्यक्ष हिज् एक्स् लन्सी सुभाष’ असा गौरव त्यांचा त्या वेळीं हिटलरने केला. पुरेसें लष्करी शिक्षण घेतल्यानंतर सुभाषबाबूंनीं जपानकडे प्रयाण केलें. सिंगापूरच्या भारतीय सैन्याची नवीन संघटना तयार करुन ‘चलो दिल्ली’ ची गर्जना केली. दरम्यान दुसरें महायुध्द समाप्त झालें. ‘आझाद हिंद सेना’ व ‘सुभाषचंद्र’ यांचें काय होणार, हा प्रश्न सर्वाच्या पुढें उभा असतां विधिघटना निराळीच घडली -
जपानी सरकारशीं कांहीं बोलणी करण्यासाठीं सुभाषबाबू टोकियोला निघाले होते. ताईहोकु विमानतळावर अपघात झाला. पेट्रोल टांकीनें पेट घेऊन एकदम भडका उडाला. नेताजींचा पेहराव सुती असल्यामुळें तो चटकन् पेटला. लागलीच इस्पितळांत नेऊन औषधोपचार सुरु झाले, परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. श्रावण शु. १० रोजीं रात्रीं नऊ वाजतां भारताचा ‘चंद्र’ माव्ळला !
- १८ आँगस्ट १९४५
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP