मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
विषयानुक्रमणिका

आदिपर्व - विषयानुक्रमणिका

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


१. आदिपर्व.  ( पदसंख्या २४७९ )

अध्याय १ ला :-
नमन; विषयोपन्यास; सौतीचा भारतकथनारंभ; भारताचें पूर्ववृत्त.

अध्याय २ रा :-
जनमेजयास सरमेचा शाप; सोमश्रव्याचा पौरोहित्यस्वीकार; आरुणिपरीक्षा; उपमन्युपरीक्षा; वेदपरीक्षा; उत्तंकचरित :- पौषराजकथा - ताटंकहरण व सर्पसत्र.

अध्याय ३ रा :-
भृगुवंशकथन; च्यवनोत्पत्तिकथा :- पुलोमाहरण - अग्नीस शाप व तत्क्रोधसांतवन; रुरुचरित.

अध्याय ४ था :-
जरत्कारुकथा; सर्पोत्पत्ति, अरुणोत्पत्ति, अमृतमंथन, विनतादास्य, गरुडचरित.

अध्याय ५ वा :-
शापनिवारणार्थ शेषाचें तप व विधि त्यास प्रसन्न होऊन धराभार देतो; शापनिवारणार्थ नागांची उपायचर्चा; एलापत्राचें भाषण, विधिभाषणकथन, धार्मिकास अभयदान व तदर्थ जरत्कारूस वायुकिकन्येच्या दानाची अवश्यकता; ब्रह्मदेवाचा वासुकीस दुहितादानार्थ उपदेश; परीक्षिन्मृगानुगमन व प्रत्युत्तराप्राप्तीमुळें शमीकविडंबन; शृंगीचा परीक्षितीस शाप; शमीक परीक्षितीस शाप कळवितो; परीक्षिति एकस्तंभप्रासादांत सहा दिवस घालवतो; काश्यपतक्षकसंवाद व परस्परप्रभावप्रकटन; फलकीटकरूप तक्षकद्वारा सप्रासादपरीक्षिन्नाश; जनमेजयाभिषेक; जरत्कारुविवाह; निद्राभंगरूप अप्रिय निमित्तामुळें पत्नीत्याग; सर्वांचें सांत्वन - आस्तीकजन्म.

अध्याय ६ वा :-
परीक्षिन्मृत्युकथा - जनमेजयाचा सर्पसत्रनिश्चय - सूतकृत ‘ विप्रनिमित्तें यज्ञासिद्धि ’ असें भविष्य - सर्पसत्रारंभ.

अध्याय ७ वा :-
जनमेजयाच्या सर्पसत्राचा आरंभ; आस्तीककृत वासुकिभयानिवारण; आस्तीकसर्पसत्रागमन व राजस्तुति; तक्षकहवन; आस्तीकप्रार्थनेमुळें सत्रसमाप्ति; आस्तीकगौरव व त्यास वासुकीचा वर - सर्पसत्रसमाप्ति.

अध्याय ८ वा :-
शौनकसूतप्रश्नोत्तरें; उपरिचरवसुचरित व सत्यवतीजन्म; व्यासजन्म; कृष्णरामभीष्मादींची उत्पत्ति.

अध्याय ९ वा :-
सूर्यचंद्रवंशोत्पत्ति; कचदेवयानीआख्या.

अध्याय १० वा :-
कचकृतदेवयानीपरित्याग व स्वर्गगमन; शर्मिष्ठा व देवयानी यांच्यांत इंद्र कलह लावितो, देवयानीक्रोध व सांत्वन; ययातिदेवयानीविवाह; यदुजन्म.

अध्याय ११ वा:-
शर्मिष्ठागांधर्वविवाह व द्रुह्युजन्म; शर्मिष्ठादेवयानीसंवाद; शर्मिष्ठापुत्र आणि देवयानीची यांची भेट; देवयानीकोपप्रश्न व शर्मिष्ठोत्तर; देवयानीचा पतिगृहत्याग व शुक्राचा ययातीस शाप व उःशाप; पूरुकृत ययातिजरास्वीकार; पूरूस राज्यप्राप्ति व ययातीचें वनगमन; ययातीचें स्वर्गारोहर्ण, आत्मस्तुतीमुळें पतन व सत्समागमद्वारा उद्धार.

अध्याय १२ वा :-
दुष्यंतशकुंतलाख्यान :- शकुंतलाकथितस्वजन्मवृत्तांतर्गत विश्वामित्रमेनकाख्यान; दुष्यंतशकुंतलासमागम - भरतजन्म - दुष्यंतकृत शकुंतलेचा अस्वीकार - आकाशवाणीनंतर स्वीकार - भरतराज्यपदलाभ - भरतवंशविस्तार.

अध्याय १३ वा :-
महाभिषराजोपाख्यान; वसूपाख्यान; प्रतीपगंगासंवाद्ल शांतनुराज्यपदप्राप्ति; शांतनुगंगाविवा; गंगाक्रोध व भीष्मासह अंतर्धान; भीष्मपुनरागमन व राजपदप्राप्ति; भीष्म शांतनुसत्यवतीविवाह घडवून आणितो.

अध्याय १४ वा :-
चित्रांगदविचित्रवीर्यचरित्र.

अध्याय १५ वा :-
वंशवृद्ध्यर्थ भीष्मास सत्यवतीचा उपदेश व त्याचें उत्तर; भीष्माची सूचना; सत्यवतीचें अनुमोदन व व्यासप्रार्थना; धृतराष्ट्र, पांडु व विदुर यांचें जन्म; मांडव्यऋषिकथा.

अध्याय १६ वा :-
पांडूस राज्यप्राप्ति, भीष्मविदुरविचार व धृतराष्ट्रगांधारीविवाह.

अध्याय १७ वा :-
कुंतिदत्तविधान; कुंतीस दुर्वासाचें वरदान; कर्णोत्पत्ति; कर्ण ‘ राधेय ’ होतो; पांडुकुंतीविवाह; माद्रीपांडुविवाह; पांडुदिग्विजय; पांडुहिमाद्रिगमन; विदुरविवाह.

अध्याय १८ वा :-
गांधारीस ‘ शतपुत्र होतील ’ असें व्यासवरदान व शतपुत्रोत्पत्ति; दुर्योधनजन्मवर्णन; युयुत्सुजन्म.

अध्याय १९ वा :-
हरिणरूप किंदमऋषीचा पांडुकृत वध व पांडूस शाप; पांडूची सस्त्रीक तपश्चर्या; मुनिभाषष्णोत्पन्न अनपत्यत्वदुःख व कुंतीशीं भाषण; व्युषिताश्वकथा; उद्दालककृत धर्ममर्यादा; पुत्रोत्पत्त्यर्थ पांडूची कुंतीस प्रार्थना; धर्मजन्म; भीमजन्म; अर्जुनजन्म; माद्रीशोक - मांद्रीस मंत्रशिक्षा व नकुळसहदेवोत्पत्ति.

अध्याय २० वा :-
कामातुर पांडूचा माद्रीसह विहार व मरण; कुंतीमाद्रीविलाप व माद्रीचें सहगमन; कुंतीचें सपुत्र हस्तिनापुरागमन व पांडूची उत्तरक्रिया; व्यास सत्यवतीस भावी अनर्थ सांगतात व उभय सुनांसह सत्यवती उत्तमलोकास जाते.

अध्याय २१ वा :-
भीमाचा पराक्रम; जलक्रीडासमयीं कौरव भीमास विषान्न चारून गंगेंत बुडवितात; भीमाचें नागलोकीं गमन, सत्कार व शक्तिप्राप्ति; कुंतीचा शोक व विदुरबोध; धर्माचा बंधूंस सावध राहण्याबद्दल इषारा.

अध्याय २२ वा :-
शरद्वानकथा - तपोविघ्नार्थ इंद्र अप्सरा पाठवितो; ‘ कृप ’ व ‘ कृपी ’ यांचें जन्म व शंतनुकृत त्यांचें परिपालन; शरद्वान कृपास धनुर्वेद पढवितो; कृप कौरवपांडवांस धनुर्विद्या शिकवितात.

अध्याय २३ वा :-
भरद्वाजघृताचीकथा व द्रोणजन्म; द्रोणचरित :- द्रोणद्रुपदस्नेह; द्रुपदराज्यप्राप्ति; द्रोणकृपीविवा व अश्वत्थामाजन्म; परशुरामप्रार्थाना व त्याजपासून धनुर्वेदप्राप्ति.

अध्याय २४ वा :-
द्रुपदकृत द्रोणापमान; द्रोण हस्तिनापुरीं येऊन अर्जुनास गुप्त रीतीनें अस्त्रविद्या शिकवितो; कौरवपांडवांची विहिरींत पडलेली विटी द्रोण गवताच्या काडीनें काढितो; भीष्मकृत द्रोणसन्मान; भीष्माप्रत द्रुपदकृतावमान व स्वागमनहेतु यांचें कथन; द्रोणाला कौरवपांडवगुरूपदप्राप्ति; द्रोणेच्छा तृप्त करण्याची अर्जुनप्रतिज्ञा.

अध्याय २५ वा :-
अर्जुनादींचें द्रोणाजवळ विद्यासाधन, अर्जुनपरीक्षा व प्राविण्य; एकलव्यकथा; द्रोण एकलव्यास शिकविण्याचें नाकारितात - त्याचें मृन्मय गुरूजवळ विद्यासाधन, अद्वितीय प्राविण्यदर्शन; अर्जुनविषाद - एकलव्यापाशीं द्रोण दक्षिणहस्तांगुष्ठ गुरुदक्षिणा म्हणून मागतात - तो ते देतो; द्रोणकृत शिष्यपरीक्षा व अर्जुनास ब्रह्मास्त्रदान.

अध्याय २६ वा :-
रंगयुद्ध; भीमदुर्योधनगदायुद्ध; अर्जुनयुद्धकौशल्य; कर्णकौशल्य; कर्णाची द्वंद्वयुद्धसूचना, अर्जुन व अक्र्ण यांचें भाषण; युद्धाची सिद्धता; कृपाचें कर्णाशीं मर्मभेदक भाषण; कर्णास अंगदेशराज्यदान; भीमाचें कर्णाशीं कटुभाषण व दुर्योधनाचें कर्णमंडनपर उत्तर; सूर्यास्तामुळें युद्ध टळतें.

अध्याय २७ वा :-
द्रोण ‘ द्रुपदपराभव ’ ही च गुरुदक्षिणा मागतात; कौरव पुढें जातात व द्रोण मागें राहतात; अर्जुनाचें द्रोणाशीं भाषण; कौरवपराभव; पार्थकृत द्रुपदपराभव; द्रोणद्रुपदसंवाद; द्रुपदास अर्ध्यराज्यदान, त्याचा अंतःसंताप व द्रोणनाशार्थ प्रयत्न.

अध्याय २८ वा :-
युधिष्ठिरास यौवनराज्याभिषेक व पांडवदिग्विजय; धृतराष्ट्रचिंता, कणिकनीति व तदंतर्गत जंबुककथा.

अध्याय २९ वा :-
धर्मगुणवर्णन; तन्निमित्त कौरवविषाद व दुर्योधनादीचा धृतराष्ट्राशीं कुमंत्र; पांडव यात्रेनिमित्त वारणावतास जातात; पौरजनशोक; विवरसिद्धि व पलायनविचार; पांडवांचा लाक्षागृहवास; विवरसिद्धि व पलायनविचार; कुंतीव्रतनिमित्त विप्रभोजन, निषादागमन, लाक्षागृहदाह, पांडवांची सुटका व वनप्रवेश.

अध्याय ३० वा :-
पांडवदहनामुळें पौरविलाप; कुंतीतृषा व भीमेतर पांडवांची निद्रा; भीमक्रोधोद्गार; हिडिंबागमन व तिचें मोहित होऊन भीमाशीं भाषन; भीमाचें उत्तर; हिडिंबासुरागमन व भीमाशीं युद्ध; कुंतीहिडिंबासंवाद; हिडिंबवध; हिडींबास्वीकार व घटोत्कचजन्म.

अध्याय ३१ वा :-
व्यासोपदेशानुसार पांडव एकचक्रानगरींत विप्रगृहीं रहातात; विप्रसंकटनाशार्थ भीमाशीं कुंतीचें भाषण; विप्र व तत्स्त्रीसंवाद; विप्रकन्या व पुत्र यांचीं भाषणें; कुंतीविप्रसंवाद; युधिष्ठिरकुंतीसंवाद; भीमबकयुद्ध व बकवध; पौरानंद व ते विप्रापासून वृत्त समजावून घेतात.

अध्याय ३२ वा : -
विप्र पांडवांस द्रोपदीविवाहवार्ता सांगतो; धृष्टद्युम्नद्रौपदीजन्मकथा; द्रोण धृष्टद्युम्नास विद्या शिकवितो.

अध्याय ३३ वा :-
व्यास पांडवांस द्रौपदीचें पूर्ववृत्त सांगून तत्प्राप्त्यर्थ द्रुपदपुरीं जाण्यास सांगतात; वाटेंत अंगारपूर्ण गंधर्व व पार्थ यांचें युद्ध, गंधर्वपराभव व अर्जुनास चाक्षुषीविद्यादान; अर्जुनगंधर्वप्रश्नोत्तरें; पांडवांस ‘ तापत्य ’ म्हणण्याचें कारण व कुरुपिता संवरण व तपती यांची विवाहकथा गंधर्व सांगतो.

अध्याय ३४ वा :-
गंधर्व पार्थास वसिष्ठकथा सांगतो - विश्वामित्रकृत धेनुहरणप्रयत्न; विश्वामित्राचा उद्वेग व ब्राह्मण होणें; कल्माषपादद्वारा वसिष्ठशतसुतनाश; वसिष्ठप्राणत्यागप्रयत्न; गर्भस्थ ‘ पराशर ’ ( वसिष्ठाचा नातु ) याची कथा व वसिष्ठमरणेच्छानिवृत्ति; कल्माषावर वसिष्ठकृपा; पराशरमातासंवाद; वसिष्ठ परशरास शांति उपदेशितो; पराशराचें सत्र; पुलस्त्याचें सत्रोपशमार्थ पराशराशीं भाषण; गंधर्वानुमतें पांडव धौम्यास पुरोहित करितात.

अध्याय ३५ वा :-
पांडव द्रुपदपुरींत कुलालशाळेंत रहातात; अनेकविप्रनृपागमन - द्रुपदाचा अर्जुनाकडे ओढा व घोर पण; धृष्टद्युम्न बहिणीस सभेंत आणितो, सर्वांस पण जाहीर करितो व तीस सर्व राजे दाखवितो; कृष्ण बळरामास पांडव दाखवितो; कर्णशिशुपालजरासंधशल्यादिकांचे लक्ष्यभेदप्रयत्न व अपयश; पार्थकृत लक्ष्यभेद, सभ्यमतें व द्रौपदीप्राप्ति; कर्णादींचा कोप व भीमार्जुनाचें कर्णशल्यप्रमुखांशीं युद्ध व कर्णाचा पराभव; सभ्यनृपजिज्ञासा; पांडव द्रौपदीला कुलालशाळेंत आणितात व कुंतीवचनावरून द्रौपदी पांच पांडवांची स्त्री होते.

अध्याय ३६ वा :-
रामकृष्णपांडवांची भेट व भाषण; धृष्टद्रुम्न कुलालशाळेंत येऊन वेषधारी पांडवांची परीक्षा करितो; द्रुपद संतुष्ट होऊन पांडवांस भोजनास बोलावितो. पांडवांच्या कुळादिकांबद्द्ल द्रुपद आग्रहानें पृच्छा करितो व धर्म त्यास ओळख देतो; कन्यापाणीग्रहणाविषयीं द्रुपदप्रार्थना व पांचांस कशी द्यावी ही शंका; व्यासकृत शंकानिरसन; द्रौपदीविवाह, पांडवसत्कार; दुर्योधनादिक वृत्तश्रवणानें मनांत संतप्त होऊन परत जातात.

अध्याय ३७ वा :-
पांडवोदयाबद्दल विदुरधृतराष्ट्रसंवाद व धृतराष्ट्रसंतोष; दुरोधन व कर्ण पांडवनाशाविषयीं धृतराष्ट्रास युक्त्या सांगतात; भीष्म विरोध न करण्याबद्दल सांगतात; द्रोण पांडवास अर्धें राज्य देण्याबद्दल सुचवितो; कर्णद्रोणांचा कोपसंवाद; विदुर गुरूक्त ऐकण्याविषयीं बोध करितो; द्रोणाची युक्ति मान्य करून धृतराष्ट्र पांडवांस आणण्याकरितां विदुरास पाठवितो; विदुर द्रुपदास तोषवितो; कृष्णादिकांच्या अनुमतें पांडवांचें हस्तिनापुरीं आगमन व पौरसंतोष; पांडव अर्धराज्य घेऊन इंद्रप्रस्थास रहातात; कृष्ण तेथें एक उत्तम नगर वसवून त्यांत पांडवांची स्थापना करितो.

अध्याय ३८ वा :-
इंद्रपस्थीं नारदागमन व द्रौपदीसमागमसमयविभागार्थ पांडवांस उपदेश - संदोपसुंदाख्यान; पांडवांची प्रतिज्ञा; विप्रधेनुहरण व तद्योगें अर्जुनप्रतिज्ञाभंग; अर्जुनाचा वनवास; उलूपीचित्रांगदासमागम; द्वारकागमन, कृष्णदर्शन व सुभद्राहरण; कृष्णबलरामसंवाद; पार्थसुभद्राविवाह, द्रौपदीकोप व पार्थकृत तन्निवारण; कृष्णादींचें इंद्रप्रस्थागमन; अभिमन्युजन्म. प्रतिविंध्यादि पांच पुत्र द्रौपदीस होतात; अग्नि भक्षणार्थ खांडववन मागतो व अर्जुनास अक्षप्य भाता व गांडीव देतो; खांडवदहन व मयरक्षण; उपसंहार.

N/A

References : N/A
Last Updated : December 10, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP