आसुर व राक्षस विवाहांचे भेदस्वरूप
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मनुस्मृतिकाळी नागरिक स्थिती असल्याने आता सांगितलेले चार विवाह होत असणे जसे शक्य होते, त्याप्रमाने बाकी राहिलेल्या आसुर व राक्षस विवाहांची शक्यता होती अगर कसे, याबद्दलचा विचार आता करावयाचा. हे दोन्ही विवाह वाईट मानिलेले आहेत हे त्यांस मिळालेल्या नावावरूनच स्पष्ट आहे. तथापि त्यातल्या त्यात पहिला विवाह दुसर्यापेक्षा कमी वाईट, अर्थात दुसर्या विवाहात पहिल्यापेक्षा वाईटपणाचा भाग जास्ती, ही गोष्ट विशेषत: ध्यानात ठेविण्यासारखी आहे. असुर म्हणजे दैत्य हे देवांचे काय ते प्रतिस्पर्धी, याच्यापलीकडे ते इतर कोनाचा मुद्दाम द्वेष करीत बसनारे नव्हत; परंतु राक्षस मात्र, कोणाशीही असो, नेहमी क्रूरपणाचे वर्तन करणारे असावयाचे या गोष्टी पुराणग्रंथाधारे सर्वत्र प्रसिद्धच आहेत.
देवांस यज्ञक्रियांची प्रीती, अर्थात केवळ त्यांच्याच विरोधास्तव दैत्य त्या क्रियंचा तिरस्कार करणारे, असा प्रकार असल्याने आसुरविवाहात धर्मश्रद्धेच्या गोष्टी कमी असावयाच्या, व त्याच्याचबरोबर जगातील व्यवहाराच्या दृष्टीने सुखप्राप्ती अथवा चैन करून घेण्याचा उद्देश साधण्याची खटपट व्हावयाची, हे निराळे सांगणे नकोच. राक्षसांचा स्वभाव सदा क्रूरतेचा, तेव्हा त्यांच्या नावास पात्र झालेल्या विवाहातदेखील त्या क्रूरतेचे प्रतिबिंब उतरलेले असणे हे साहजिक आहे.
अर्थात समाज रानटी असेल, अगर रानटी स्थितीतून चांगलासा बाहेर पडला नसेल, तर त्यामध्ये समाजास प्राप्त झाली असेल, तर राक्षसविवाहाची शक्यता अधिक; व रानटी स्थितीतून निघून सुधारणेची अवस्था समाजास प्राप्त झाली असेल, तर राक्षसविवाहापेक्षा आसुरविवाहाचीच प्रवृत्ती विशेष, असा सिद्धान्त मानण्यास अडचण नाही; - म्हणजेच ज्या समाजात आसुरविवाहापेक्षा राक्षसविवाहास अधिक मान देण्यात येत असेल, त्या समाजास ‘ सुधारलेला ’ हे विशेषण न लाविता ‘ रानटी ’ म्हणजे हेच विशेष योग्य म्हणावे लागेल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP