दैवविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कन्येच्या पित्याच्या घरी कोणता तरी एखादा यज्ञ करावयाचा अशा हेतूने ऋत्विज ब्राह्मण बोलाविले असतात; व विधीप्रमाणे यज्ञक्रिया चालू असते. अशा वेळी ऋत्विजाचे काम उत्तम प्रकरे करणार्या ब्राह्मणास कन्यादान करण्याचा हेतू यजमानाच्या मनात उत्पन्न होऊन तो त्या ब्राह्मणास अलंकार इत्यादी घालून त्याची पूजा करितो व त्यास आपली कन्या अर्पण करितो. या विवाहास ‘ दैवविवाह ’ म्हणतात, व त्याचा होत असलेल्या गर होऊन गेलेल्या यज्ञक्रियेशी काही संबंध असत नाही. यज्ञासंबंधाने गाय, घोडा, खेचर इत्यादी प्रकारचे जे काही दान द्यावयाचे असेल, ते निराळेच देण्यात येते. यजमानाच्या घरी देवपूजा करणारा ब्राह्मण, किंवा दुसर्या कोणत्या तरी देवतेच्या उद्देशाने बोलाविलेला ब्राह्मण यास कन्या अर्पण केली जाते, हे या विवाहास ‘ दैवविवाह ’ नाव देण्याचे कारण होय अशी मनुस्मृतीवरील कित्येक टीकाकारांनी सांगड घातली आहे. असो; ब्राह्मविवाहास कन्येचा पिता निर्लोभ असतो, तसा या विवाहात नसता व त्याचा हेतू देवतेपासून काही तरी फ़लप्राप्ती व्हावी असा असतो, यामुळे या विवाहाची योग्यता त्या विवाहाहून कमी मानण्यात येते. हा विवाहही फ़क्त ब्राह्मणासच उक्त आहे, इतरांस नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP