आसुरविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
येथपर्यंत वर्णिलेले प्रकार केवळ ब्राह्मणवर्णापुरतेच मानिले आहेत. यापुढील प्रकारांत इतर वर्णांच्या लोकांचीही उक्तता सांगितली आहे. पाचव्या विवाहप्रकारास ‘ आसुरविवाह ’ अशी संज्ञा असून तो विवाह चारी वर्णांच्या लोकांस करिता येतो. ब्राह्मणवर्गास व क्षत्रियांस या विवाहाची परवानगी आहे; तरी पण तो पहिल्या चार विवाहांप्रमाणे प्रशस्त मानिलेला नाही, यासाठी तो उभयतांनीही करू नये हे विशेष इष्ट आहे. या विवाहात वधू व तिची नातलग मंडळी यांस प्रत्येकी वराने यथाशक्ती द्रव्य द्यावे, व वधूशी स्वच्छंदाने विहार करावा, हे मुख्य तत्त्व आहे. स्वच्छंदाने विहार करणे याचेच नाव चैन; अर्थात या विवाहास उद्युक्त होणार्या वधूवरांचे लक्ष धर्माचरणाकडे असावयाचे नाही, व यामुळे या विवाहास गौणता येते हे निराळे सांगणे नको.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP