पैशाचविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
शेवटला आठवा प्रकार ‘ पैशाचविवाह ’ हा होय, व तो सर्वथा निंद्य मानिला आहे. तथापि तो करण्याचा अधिकार ब्राह्मणाशिवाय इतर तिन्ही वर्णांस आहे. राक्षसविवाहात स्त्रीजातीची कबुली लागत नाही, तशी या विवाहातही लागत नाही. मात्र त्या विवाहात वराच्या बाजूने शौर्याचा व पराक्रमाचा तरी मोठा गुण होता, परंतु या विवाहात त्याच्या उलट नीचतेचा मात्र गुण आहे. कारण स्त्री निद्रित असली, किंवा मद्यादी प्राशनाने अगदी तर्र झाली असली, किंवा उन्मादवायू इत्यादी व्याधीमुळे ती शुद्धीवर नसली, तर अशा प्रसंगी पुरुषाने तिजशी बलात्काराने संभोग करावयाचा व त्यालाच विवाह झाला असे समजावयाचे, यापेक्षा अधिक नीचता ती दुसरी कोणती असणार ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP