त्रैवर्णिकांस अनुलोम पद्धतीचे विवाह करिता येत असत, त्यांचे पोटी शूद्र जातीच्या स्त्रीशी होणार्या विवाहाचा समावेश होतो. परंतु हा विवाह झाला असता होणारी पुत्रपौत्रादी संतती शूद्र होते. ब्राह्मणाने असा विवाह केला असता तो ब्राह्मणत्वातून च्युत होतो, म्हणजे देव, पितृगण व अतिथी यासंबंधाची कोणतीही कर्मे करण्याचा त्यास अधिकार राहात नाही, व तो स्वर्गप्राप्तीस आचवतो. वैश्य वर्णास हा विवाह करण्याचा अधिकार आहे. परंतु तो तसाच आपत्प्रसंग असेल तरच समजण्याचा आहे. वैश्यास वरच्या दोन्ही वर्णांच्या स्त्रिया वर्ज्य असल्याने त्याजवर ह्या विवाहाची पाळी येण्याचा संभव स्वाभाविकच विशेष असणार.
ब्राह्मण व क्षत्रिय या दोन्ही वर्णांच्या लोकांस वैश्यवर्णाच्या स्त्रीस वरण्याची सवड असल्याने त्यांनी शूद्र वर्णाच्या स्त्रीस वरण्याची सवड असल्याने त्यांनी शूद्र वर्णाच्या स्त्रीस वरू पाहणे हे केवळ निरुपाय असेल तरच क्षम्य मानिता येईल; परंतु अशा नाइलाजाच्या वेळीदेखील त्यांनी हे कर्म नच करावे. कारण या जातीच्या स्त्रीच्या मुखात मुख घालणे, अगर तिच्या मुखातून निघणार्या नि:श्वासाचे सेवन करणे, यांपासून उत्पन्न होणार्या पातकाचा निरास कोणत्याही प्रायश्चित्ताने होत नाही, व हे पातक विवाहकर्त्यास व त्याच्या पुढील संततीस चिकटून राहते, असे मनुस्मृती अ० ३, श्लोक १४ - १९ येथे सांगितले आहे. ग्रंथविस्तारभयास्तव ही वचने येथे उतरून घेतली नाहीत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP