प्राचीन उदाहरणे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
शूद्रामारोप्य शय्यां तु पतितोत्रिर्बभूव ह ।
उतथ्य: पुत्रजननात्पतितत्वमवाप्तवान् ॥
पुत्रस्य पुत्रमासाद्य शौनक: शूद्रतां गत: ।
भृग्वादयोप्येवमेव पतितत्वमवाप्नुयु: ॥
ही वचने भविष्यपुराणात आली असून, त्यात शूद्र स्त्रीसमागमापासून होणारे परिणाम पायर्यापायर्यांनी दाखविले आहेत. ‘अत्रिऋषीने अशी स्त्री शय्यास्थानी घेतली यामुळे तो पतित झाला. उतथ्य नावाच्या ऋषीस शूद्रस्त्रीच्या पोटी पुत्रजनन झाल्यामुळे पातित्य आले. शौनकास पुत्राच्या पोटी पौत्र म्हणजे नातू झाल्यामुळे पतिति होण्याचा प्रसंग आला, व भृगू इत्यादी ऋषींवर अशीच पाळी येणार. ’ या वचनांत पातित्य तत्काळ येणे अगर पुत्रपौत्रादिकांच्या उत्पत्तिप्रसंगी म्हणजे कालान्तराने येणे हे दोन महत्त्वाचे परस्परविरोध दिसतात, त्यांचा तूर्त विचार करणे नको. या स्थळी सांगण्याची मुख्य गोष्ट ही की, त्रैवर्णिकांनी शूद्रसंबंध न करावे, या गोष्टीवर स्मृतिकारांचा मुख्य कटाक्ष आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP