आपत्प्रसंगी विवाहांची वर्णश: व्यवस्था
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्मृतिकारांनी हे आठ प्रकारचे विवाह सांगितले खरे, तथापि लोकव्यवहारांत त्यांचा उपयोग कितपत होत असेल हे सांगवत नाही. विशेष आपत्तीच्या प्रसंगी यात काही फ़रकही होऊ शकत. ब्राह्मणवर्गास राक्षस व पैशाच हे विवाह सर्वस्था वर्ज्य असून बाकीचे विवाह करिता येतात, तथापि साधेल तोपावेतो त्याने उत्तम प्रकारची विवाहपद्धती स्वीकारावी, व ती न साधेल तर पुढे दर्शविल्याप्रमाणे उतरत्या क्रमाचे विवाह करावे, असा नियम सांगण्यात आला आहे. हा क्रम ( १ ) ब्राह्म, ( २ ) दैव, ( ३ ) प्राजापत्य, ( ४ ) आर्ष, ( ५ ) गांधर्व, व ( ६ ) आसुर असा होता. क्वचित आपत्प्रसंगी ब्राह्मणासच जर क्षत्रियवृतीने वागण्याची पाळी आली, तर त्याने राक्षसविवाह केला असताही चालू शके. क्षत्रियादी त्रयीसही त्याचप्रमाणे प्राजापत्यविवाहाची पाळी येई. वैश्य आणि शूद्र यांना राक्षसविवाह वर्ज्य असताही त्यांना अडचणीच्या वेळी तो करावा लागे. पैशाचविवाह हा समाजात सर्व प्रकारे निंद्य असल्याने कसलाही आपत्प्रसंग असला तरी तो कोणी करू नये असाच सामान्य कटाक्ष असे. क्षत्रियादी तीन वर्णांनीदेखील आसुरविवाह करू नये असे मनू सांगतो; परंतु हा निर्बंध कितपत पाळण्यात येत असेल याविषयी संशय आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP