मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग ३५१ ते ३७१ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३५१ ते ३७१ Translation - भाषांतर ऐसें मी जाणतों गे सुंदरी । तरी येतों तुझिया उदरीं । माता शिणविली येरझारीं । नर-देहीं ॥३५१॥तुझिया कुळीं जन्मतों । कडेसी वो खेळतों । मुखें स्तनपान करितों । आनंदें करोनियां ॥३५२॥तुज ऐसी माता । केवि होय पतिव्रता । पूर्व सुकृतावांचोनि सर्वथा । प्राप्त नव्हे ॥३५३॥तूं माझी वो जननी । क्रष्टविली दुष्ट वचनीं । हें वचन ऐकोनि । तेच क्षणीं उठली रंभा ॥३५४॥मग निघाली तेथोनि । पावली इंद्रभुवनीं । राया इंद्रासी भेटोनि । बोलती जहाली ॥३५५॥ह्मणे जी इंद्रराया । गेली या ऋषिच्या ठायां । बहुतप्रकारें तया । बोलिलें म्यां ॥३५६॥तपें शब्दें प्रसवे कामधेनु । तृण चरे पंचाननु । पश्चिमेस उगवे भानु । जाण राया ॥३५७॥ऐसें जाण गा नृपति । कवणें समयीं होती । परि शुक देवाचिये चित्तीं । अविनाश ॥३५८॥ऋषि मुनि संन्यासी । मज देखोन ढळती तपासी । तैसी परी शुक-देवासी । नव्हे जाण ॥३५९॥तैसा तो नव्हेजी योगिराजा । मनीं भाष न धरी दुजा । म्यां गेलिया ज्या काजा । तें सिद्धि न पावलें ॥३६०॥शुक देव नमस्कार करूनि । अदृश्य झाला तेथूनि । देव अंतरीं विमानीं । पहात ठेले ॥३६१॥सुरवर करिती पुष्प वर्षाव । तपा न ढळे शुक देव । देवगणांचा संदेह । फिटला तेणें ॥३६२॥तप सुरवरांसि मानलें । शुकदेव अलक्ष्य जाहले । तेजीं तेज निमालें । निवडेचिना ॥३६३॥उतरला पैलपार । संसारींचा भव-सागर । दुस्तर आणि दुर्धर । लोका तरावया ॥३६४॥दोहों वा-तीचा दीपकू । प्रजळला एकरूपा । हरीहर स्वरूपू । एक झाले ॥३६५॥ऐसें शुकदेव चरित्र । ऐकतांचि पुण्य पवित्र । वर्णितां जाणा विचित्र । तिहीं लोकीं ॥३६६॥जे पढती नित्य नेमीं । ते होती मुक्तज्ञानी । तें फळ पावतां निर्वाणीं । झाला शुकदेव ॥३६७॥श्रोते जे ऐकती । तया होय फळ प्राप्ती । हरिहर चरित्र क्षितीं । पुण्य पावन ॥३६८॥विनवी विष्णुदास नामा । शुक देवें केली सीमा । चौर्यांशीं लक्ष योनीचे जन्मा । सार्थक केलें ॥३६९॥ऐसें शुकदेव चरित्र । अगाध आणि विचित्र । विष्णुदास नामा विन-वित । भक्तांप्रति ॥३७०॥मन्मथ संवत्सर पौष्य मासीं । सोम-वार अमावासेच्या दिवशीं । पूर्णता आली ग्रंथासी । श्रोते साव-काशीं परिसीजे ॥३७१॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP