मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग १७६ ते २०० शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग १७६ ते २०० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १७६ ते २०० Translation - भाषांतर बाहु दंड सरळा । बरवी शोभे मेखळा । कांसे कासिला पिंवळा । पीतांबर ॥१७६॥आंगीं सुवास कस्तुरीची उटी । मुक्तमाळा रुळे कांठीं । टिळा केशराचा लल्लाटीं । तये रंभेचे ॥१७७॥हातीं रत्नजडीत कंकणें । गळां नव-रत्नांचीं भूषणें । व्यंकट दृष्टि पाहणें । अळूमाळ ॥१७८॥कानीं तानीवडे जडीत । सांखळ्या नाग भिरवत । भोंवर्या शोभिवंत । हिरे जडिले ॥१७९॥माथां मोतियांची जाळी । दोहींकडे शोभे हसळी । तेज झळके गंडस्थळीं । मिरवे रंभा ॥१८०॥सुवर्ण कनकाची झारी । हातीं मिरवे सुंदरी । परम चतुर मनोहरी । काम-रूपा ॥१८१॥नाकीं जडित मुक्ताफळ । तेज मिरवे सुढाळ । मुखीं शोभे तांबूल । तेर गुणांचा ॥१८२॥दंतपंक्ति तेज देखा । त्यांची चंद्रसारखी शुभ्रता । हिरे जडिले मुखा । रंभेचिया ॥ १८३॥अति सुंदर पुष्प जाती । चंपकें बकुलें शेवंती । तयावरी मिरवे सोनकेतकी । आणिक मोगरी ॥१८४॥करीं चंदनाची उटी । अंगीं कंचुकी गोमटी । तयावरी मिरवे पत्रवेटी । चंपकाचे पानांची ॥१८५॥चरणीं वांक्या तोडरू । अंदुवाचा गजरू । अंगीं तारुण्याचा भरू । अनुपम्य ॥१८६॥चाले डोले हस्तिनी गति । विद्युल्लतेप्रमाणें नेत्र लवती । तयांसी देखोनी गिरजापति । भूलों शके ॥१८७॥ऐसी ते महा खेंचरी । निघाली झडकरी । सिंधुवनामाझारीं । प्रवेशली ॥१८८॥तये वनीं वृक्ष खजुरी पोफळी । फणस महाळुंगी नारळी । आणि द्राक्ष मंडप स्थळोस्थळीं । डुल्लताती ॥१८९॥गगनचुंबित ताड । आम्रवृक्ष जांभळी उदंड । केळी जांभ अंजिर रगड । बागशाई ॥१९०॥मालती आणि शेवंती । पाडाळा जाई अनंत जाती । तया वनीं केतकी शोभती । आणिक बहु पुष्पलता ॥१९१॥तया वनीं जाळीं । रंभा वृक्ष न्याहाळी । आणि सिंह शार्दूल तये स्थळीं । गर्जना करिती ॥१९२॥तेथें गाइ ह्मैशींचे थवे । तृणें भक्षिती बरवें । अवघ्यांशीं शुकदेवें । ज्ञान उपदेशिलें ॥१९३॥पशुपक्षी होऊनि एकरूप । उदक पिती सांडुनी विकल्प । परम तयातें सुख । क्रीडा करितां ॥१९४॥मूषक मांजरें एकेठायीं । नकुळा सर्पा वैर नाहीं । अवघियांचे ठायीं । हरीचें प्रेम ॥१९५॥ऐसी ते वनस्थळीं । रंभा दृष्टि न्याहाळी । मग पावली जवळी । शुकदेवाश्रमीं ॥१९६॥डावें घालून शुक आसनास । पूर्वद्वारीं करी प्रवेश । सन्मुख देखे योगि-राजास । ती रंभा ॥१९७॥लक्ष लविलेंसें ऊर्ध्व दृष्टी । स्वयंभ असे कासोटी । सर्वांगीं शोभे उटी । यज्ञ विभूतीची ॥१९८॥तंव लावण्य खेंचरी । आपुले मनीं विचार करी । नेत्र हा उघडील जरी । तरी मी थोर दैवाची ॥१९९॥आनंदें घातली कास । गायन आ-रंभीं सुरस । सप्तस्वर केदारास । आळवी रंभा ॥२००॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP