मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग २२६ ते २५० शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग २२६ ते २५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २२६ ते २५० Translation - भाषांतर नाना परीचीं लोणचीं । लिंबें आंवळे मिरची । आणि कढी ताकाची । जेवीं रुचिकरें ॥२२६॥पुरीया फेणीया तेलवडें । खाजी गुरोळ्या मांडे । देईन रुचिकर सांडगे । मेथकुटें रायतीं ॥२२७॥उत्तम खांडवी साजिरी । मृदुपणें अंतर बाहेरी । घालेनि दूध साखरी । अटवीन अमृता परीच ॥२२८॥सरवळे बोटवे कानवले । थिजले घृतीं तळिले । माझे हातीं मिळविलें । तुजकारणें सकु-मारा ॥२२९॥आंब्याचे रस पिंवळे । परमामृताचे घेतले । मधु मिश्रित वाढिले । इच्छा पूर्ण होईल ॥२३०॥ऐसी आरोगणा पाविजे । मग स्वस्थानीं बैसिजे । कर्पूरसहित विडा घेइजे । मनोहर ॥२३१॥नाना परीची वळवटी । मुखों वोंटीं पडेल मिठी । नाना पत्रशाखा सु-भटी । ताटाकाठीं वाढीन ॥२३२॥आलें सुरण बेळें । भोंकर आणि मायमुळें । दृष्टि देखिल्या जिव्हाळें । अरोगणीं समयीं ॥२३३॥काकडें आणि करंदें । वर भोंकरें आनंदें । जेवितां वाढीव विनोदें । योगीया तुज ॥२३४॥आंबे निंबुवांचीं लोणचीं । राईतीं नाना परी-चीं तुमचे जिव्हे रुची । ग्रासोग्रासीं ॥२३५॥पापड आणि मिरं-गुडे । जेवितां रुचि वाढे । आणिक कोल्हाळ वडे । ऐसी जेवण परी ॥२३६॥ऐसीं अरोगण कीजे । कर्पूरविडा लवंगीं भक्षिजे । कर्पूरासहित विडा घेईजे । मनोहर ॥२३७॥माजघरा डोल्हारा बां-धिला । वरी चांदवा लविला । वर क्षीरोदक आथुरिला । जरि - तारी ॥२३८॥तेथें सुखें निद्रा करीं । सेवा करिती चतुर्विध नारी । मजहुनी सुंदरी । लावण्यवतिका ॥२३९॥अंगनांसवें वसंता आतु । खेळ खेळें समस्तु । सकळ नारी सवें हेतु । पूर्ण करीं स्वानंदें ॥२४०॥परिमळा नाहीं मिती । आह्मां घरीं सर्व संपत्ती । ऐसें सुख योगिया-प्रती । नाहीं त्रिजगतीं जाणिजे ॥२४१॥आतां सांडी मनींची भ्रांती । तप करोनी काय प्राप्ती । संसार भोगी संपत्ती । यासारिखें सुख नाहीं ॥२४२॥कोण तपाचा सौरसु । कवणें तुज दिधला उप-देशु । जे लविती राखेसू । ते भूत पिशाच्च जाणावे ।२४३॥क-वण तुज भेटला गुरु । त्याचे वचनीं हरविसी संसारु । तो माझे चित्तीं आहे शत्रु । बहुत जन्मींचा ॥२४४॥तूं नेणसी बुद्धी । तुझी भांबावली शुद्धी । ठाकीत आली अवधी । दैवगतीची ॥२४५॥तुज ज्ञान नाहीं धडपुढें । कां हिंडतोसी वनझाडें । तुझें मी फेडीन सर्व सांकडें । क्षणामाजी ॥२४६॥नेणसी तुज पडिली भूलिभ्रम । आतां सांडीं वनाश्रम । बरा करीं घराश्रम । भोगीं निजसुखवृत्ती ॥२४७॥ऐसें तप कोण करी । जो सदाचा भिकारी । मायबाप नाहीं संसारीं । तो आदरीत ये भिक्षा ॥२४८॥ऐसा जो एकटा एकला । शीत उष्ण पर्जन्यांत बैसला । तयांचिया बोला । लागूं नको ॥२४९॥माझें वचन ऐक आतां । मी सांगतें हिता । मज रंभेतुल्य वनिता । आ-नायासें जोडते ॥२५०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP