मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग ३०१ ते ३२५ शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग ३०१ ते ३२५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३०१ ते ३२५ Translation - भाषांतर औट पाद भूमिका । दिधली ब्राह्मणा एका । सत्वा न ढळे देखा । म्हणोनि पृष्टी ओढली ॥३०१॥राज्यपद नको गे सुंदरी । तूं नेणसी आमुची थोरी । आह्मी जाण ब्रह्मचारी । सुखी असों ॥३०२॥तेंच राज्य अढळ असे । तंव रंभा ऐकोनि हांसे । ह्मणे लागलें पिसें । वांयांविण ॥३०३॥बरवें ठीक लेणें । नाना अलंकार भूषणें । यावरी शुक-देव ह्मणे । हे वानूम नको रंभे ॥३०४॥तूं नेणसी माझे अलंकार । किती लेणें अपार । शंख चक्र याहूनि थोर । काय असे ॥३०५॥शंगारिजे येणें शरिर । शंख चक्र आह्मांसि पवित्र । काय करसील लेणीं फार । तीं आह्मं पाषाण ॥३०६॥शृंगार मुद्रा जाण धन । शरीरीं भार होय जेणें । आह्मां त्यांसी काय कारण । सांग तूं अंगनें ॥३०७॥संपत्ति जोडावी ह्मणसी । तरी करीन तपाच्या रासी । ह्मणऊनियां सर्वांसी । मज चाड नाहीं ॥३०८॥तप धन कधींच न सरे । सवेंच करितां उदंड उरे । आह्मां हेंच धन पुरे । लक्ष कोटी ॥३०९॥एक मूर्ख असती । अनंत द्रव्य मिळविती । मग नेऊनियां पुरिती । भूमिमाजीं ॥३१०॥माझें माझें म्हणती मनीं । तेच करिती घोकणी । तेणें कारणें फजित होउनी । जोडिलें धन ॥३११॥पिता पुत्र भांडणें । स्त्रिये बाळकासी बोलणें । तें जाय क्षणामाजी जाण । हानि होतां ॥३१२॥या धनासाठीं कैसें करिती । इष्ट मित्रांसी दु:ख देती । विश्वास न मानिती । प्राणिमात्रांचा ॥३१३॥अग्नीपासोनि वांचे जरी ठेवा । तरी राज उपद्रव घडे देवा । नाहींतरी चोरापां-सूनि हानि व्हावा । ऐसें होय ॥३१४॥ऐसें भलत्यापरि जतन करितां । परि जाईगा निभ्रांता । दु:ख होई त्वरितां । पाहें गे तूं सुंदरी ॥३१५॥मग मनीं धरिती संताप । ह्मणती द्रव्य गेलें आपोआप । बहु जोडिलें पाप । तें मेळवितां ॥३१६॥मागें धर्म जरी करितों । अथवा आपंगासी देतों । अथवा अपत्यव-र्गासी वेंचितों । तरी बरें होतें ॥३१७॥ऐसी करितां चिंतनी । रात्रंदिवस घोकणी । म्हणोनी तपाची सांठवणी । कदांचि न सरे ॥३१८॥आतां तूं जाय गा येथुनी । आह्मी ब्राह्मण निष्ठुर ज्ञानी । मग बोलिली परतोनि । रंभा त्यासी ॥३१९॥अगा तूं शाहणा होसी । पाहें बा माझिया रूपासी । आलिये तुजपासीं । योगिराया ॥३२०॥केले बहुत सायास । आतां पाहे माझी वास । पुरवाधी माझी आस । तुंवा शुकदेवा ॥३२१॥तूं आहेसी शाहणा चतुर । पाहें माझें स्वरूप शृंगार । आतां होईं कृपासागर । ऋषि-नंदना ॥३२२॥तुंवा देख देखसी । देखण्या बहूत पाहसी । तरी मज ऐसी सरिसी । निधान न सांपडेल ॥३२३॥बरवें माझें ला-वण्य । देवीं पाठविलें सगुण । तुज जोडलें निधान । आपोआप ये ठायी ॥३२४॥अगा तुझे तपा आलें फळ । आतां तुज घालीन मी माळ । पाहे पाहा भरुनी डोळे । लावण्य रूप माझें ॥३२५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP