मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग ३२६ ते ३५० शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग ३२६ ते ३५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३२६ ते ३५० Translation - भाषांतर रूप स्वरूप सुंदरी । शहाणी आहे सकुमारी । मजहूनि सेजे ऐजी नारी । आणिक नाहीं ॥३२६॥काय वानूं आपआपणा । तूं तरी चतुरांचा राणा । ऋतुसमयींच्या खुणा । जाणसी तूं ॥३२७॥अथवा नेणसी तरी सांगेन । मज असे कोक शास्त्राचें ज्ञान । अनुसरलिया मन । तुज ज्ञान होईल ॥३२८॥सोडोनिजां लाज । करितां ध्यान सहज । तप हें काय भोज । जोडलें तुज ॥३२९॥जया राग नाहीं मनीं । तया बोलती महाज्ञानी । जेणें काम क्रोध झणीं । जिंकिला असे ॥३३०॥मदन तोंडघसीं रिघाला । काळ मरणें जिंतला । तो वेळु न लागतां पातला । स्वर्ग भुवनासी ॥३३१॥देव पाहों लागले गगनीं । अमर दाटले विमानीं । बोलों आरंभिलें मग वचनीं । योगिरायें ॥३३२॥तूं भली वो शहाणी । ह्मणत होतीसी योगिनी । न डचकसी अझुनी । मना-मजी ॥३३३॥किती वाणिसी आपआपणा । बोलसी ऋतुस-मईंच्या खुणा । ऐसें अपूर्व दारुणा । देखिलें असे ॥३३४॥नव-द्वारीं निरंतर । सदा दुर्गंधी अपार । वोखटें हें कलेवर । वानूं नको रंभे ॥३३५॥बाहेर बरवें शृंगारिजे । आणि वस्त्रें अलंकार लेइजे । दृष्टीं पाहतां देखिजे । नर्क कोटि ॥३३६॥शरीर मु-ळमूत्राचा मेळा । अस्तिचर्माचा गुंडाळा । मग तयासी नांवाथिला । पिंड ऐसा ॥३३७॥कृमि कीटकांचें घर । सकळ दुर्गंधी अपार । ऐसें हें असे शरीर । नाशिवंत ॥३३८॥घडीभरी न करितां क्षाळण । तरी दुर्गंधीचा कल्होळ जाण । ह्मणोनि केलें परिमळ स्नान । शुद्धतेलागीं ॥३३९॥झणीं तूं मुख वाखा-णिसी । तंव तें वाहात असे श्लेश्मासी । ऐसें विचारितां मानसीं । पाहें पां रंभे ॥३४०॥शुकदेव ह्मणे वो सुंदरी । अमृत कैसें तंव अधरीं । विषय लहरीचे महापुरीं । बुडालीसे कामिनी ॥३४१॥डोळे म्हणसी अति रसाळ । हें तों आहे पापाचें मूळ । ह्मणऊनियां काजळ । लेईंलें असें ॥३४२॥तयाचें काळेपण न विटे । कुंकुम नाहीं हो कधीं फिटे । अंकित करोनि विटे । वानूं नको तूं रंभे ॥३४३॥योगी संन्यासी निंदिजे । तें बरवें नाहीम जाणिजे । ह्मणून तुझें मुख लाजें । काळें झालें ॥३४४॥तपाचें बरबें-पण । आह्मां नाही कारण । ह्मणोनि कामबाण । वानूं नको रंभे ॥३४५॥मग या वचनावरी । रंभा स्वदेह विदारी । नखें घालूनि उदरीं । चिरिती झाली ॥३४६॥तेव्हां शुक ह्मणे तिजप्रती । तूं शीण व्यर्थ करिसी । कारण नाहीं मजसी । तुझिया उदराचें ॥३४७॥पाहें पाहा ऋषिराया । कैसी माझी निर्मळ काया । अ-व्हेर केलासी वांयां । न विचारितां ॥३४८॥पाहें पां उदराभीतरीं । परिमळ नानापरी । जवादि अंबर कस्तुरी । आणि अगर चंदन । ॥३४९॥ऐसी गा मी रंभा पवित्र । सुगंधाचें भांडार । देवऋषि मुनेश्वर । करिती आस माझी ॥३५०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP