मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग ५१ ते ७५ शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग ५१ ते ७५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ५१ ते ७५ Translation - भाषांतर मी खेळलों गोकुळीं । गोव-ळ्यांचे खेळीं मेळीं । प्रणिली भीमकरायाची बाळी । राज्य केलें द्बारकेचें ॥५१॥सोळा सहस्त्र अंत:पुरें । साठी सहस्त्र कन्याकुमरें । रथ गज सैन्य अपारें । गणीत नाहीं वैभवा ॥५२॥दैत्यांचें निर्दा-ळण केलें । इंद्रादि देव स्वस्थानीं बैसविले । एकछत्रीं राज्य केलें । राज्यीं स्थापिलें धर्मराया ॥५३॥या उपरी तूं राज्य करीं । निघें उदरा बाहेरी । सुख अपार संसारीं । ऋषि नंदना ॥५४॥कांहीं नको धरूं भय । लवकरी बोहरी ये । हें ऐकोनि शुकदेव राये । बो-लता जाहला ॥५५॥देवा तुह्मीं बोलिलें । म्यां बहुत जन्म भोगिले । आतां फार जजर्र जाहलें । देह माझें ॥५६॥आतां विनंति परि-येसीं । जगज्जीवन ह्लषिकेशी । सुख दु:ख तुजपाशीं । निवेदितों ॥५७॥मागें जन्म जन्मांतरीं । कष्ट भोगिले शरीरीं । तें दु:ख मुरारी । काय सांगों ॥५८॥येथूनि धरिसें परिकरू । नावेक सांगेन मनहरू । तेथें होतां ऋषिश्वरू । व्यासऋषि ॥५९॥तेही ग्रंथ केले अनेक । अठरा पर्व भारत देख । वेदादी पुराणें देख । वेदांत सुत्रें ॥६०॥प्रथम जन्म ब्राम्हण कुळीं । तेनें संध्यास्त्रान त्रिकाळीं । आतिथ्य कवणे काळीं । आथीचना ॥६१॥जेथें देवधर्म चुकलों । आधा मोहपरि गुंतलों । कर्म करों लागलों । अनेकांचें ॥६२॥दोघी स्त्रिया होत्या घरीं । त्यांतें सोडोनी परद्बार करी । मन माझें कवणे परी । स्थीर नोहे ॥६३॥प्रीति असे एकीवरी । दुसरी ते दूर धरी । वस्त्रें अलंकारीं भेद करीं । ऐसीपरी घडली ॥६४॥एकी आवडी जीवाहूनि । दुजेची गोष्ट नायकें कानीं । तिनें पतिसुख स्वप्रीं । देखिलें नाहीं ॥६५॥ते काय करील अबळा । माझी मति चंडाळा । सदा करि तीसीं कळ । सुख तिळ न जाणें ॥६६॥दिवस क्रमी ती ऐसिया रीति । रात्रीं रुतु नेदी तिजप्रति । तेणें उलथों पाहे क्षिती । तियेचे दु:खास्तव ॥६७॥मासाचे सोळा रुतु । तयातें चुकवी अवचितु । तरी बारा ब्रह्महत्या पडतु । पुरुषावरी ॥६८॥ऐशा हत्या नित्य बारा । जन्मावरि पडिल्या शारंगधरा । त्या पापाचे डोंगर । जाले देवा ॥६९॥ऐसिया पापास्तव देव । हीनयाति जन्मलों केशवा । पुनरपि जन्म माधवा । पावलों मी ॥७०॥शूद्रयाति मी जन्मलों । ऋषिकर्म आचरों लागलों । देवा तुज चुकलों । खळीं झाडितां ॥७१॥त्या पापास्तव श्रीपति । जन्म पावलों मातंग जाति । मातंगी जननी रमापति । झाली माझी ॥७१॥ते नगरीचा राजा । प्रतिपाळ करी माझा । तयाचे स्वामिकाजा । तेथें पुरुवनी । अनुसरलों ॥७३॥कवण एके अवसरीं । परचक्र आलें राज्यावरी । राजा निघाला बाहेरी । युद्धा-लागीम ॥७४॥तेथें म्यां सैन्य मारिलें । रायें मज वेतन केलें । वैरियातें निर्दाळिलें । अर्धपळ न होतां ॥७५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP