मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग २६ ते ५० शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग २६ ते ५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २६ ते ५० Translation - भाषांतर बोलों जाणें बरवें । सेवा करी मनोभावें । सुळजा सती नांवें । जगीं विख्यात ॥२६॥ते पतिव्रता सुंदरी । व्यास ऋषीची स्त्री । ते झाली गरोदरी । शुक माता ॥२७॥प्रसूत न होय अवधारा । जहालीं वरुषें बारा । शुकदेव कुमार । ज्ञानी असे ॥२८॥ऐसी ते गरोदरी । थोर व्यथा होतसे उदरीं । काय कवणीये परी । आथिचना ॥२९॥कष्ट देखतां तियेचे । लोक ह्मणती हिचा जीव न वाचे । आह्मां देखतं बहुतांचे । जीव गेले ॥३०॥ऐसें पुत्रवल्या नारी बोलती । करुणावचनें भाकिती । आणि वांझा करिती । हास्य तियेचें ॥३१॥एक ह्मनती वो निसुंगे सुंदर्रे । काय करावी कन्या कुमरें । सर्व इच्छा भ्रतार भोगी पुरे। मरण आदरें तुज आलें ॥३२॥एवढी जोडिली जोडी । सासूसासरा वृद्ध बापुडीं । त्यांसी आभाची आवडी । पडसी तूं ॥३३॥वृद्ध जाहला ऋषिश्वर । परी त्यासी पुत्राचा शोक फार । हा गर्भ दुर्धर । कवणें निस्तारावा ॥३४॥ऐसें बोलती नरनारी । सुळजेतें व्यथा होतसे भारी । आ-कांत होतो ऋषीच्या मंदिरीं । ते समयीं परियेसा ॥३५॥ज्ञानी ह्मणती पाचारा अनंत । तो सांगेल याचा वृत्तांत । मग ऋषि मना-माजी विचारित । यग स्मरे अनंता ॥३६॥व्यास ह्लदयीं चिंतिता झाला । श्रीहरि त्वरित पावला । मग पुसता झाला । श्रीकृष्ण व्या-साप्रति ॥३७॥श्रीकृष्णाचें आगमन । उत्साव झाला सर्वजना । झालें देवदर्शन । विघ्रें दारुण नासती ॥३८॥श्रीहरि व्यासगृहासी आले । साधुसंतां मानवलें । मग बैसो घातलें । आंथरीय ॥३९॥ऋषि ह्मणती श्रीहरि । द्बादश वर्षें जाहलीं पुरीं । प्रसूत न होय स्त्री । काय तें उदरीं कळेना ॥४०॥मग देव ह्मणती ऐका । आड धरा जमनिका । विचारूनि गर्भ बाळका । काय आवांका तयाचा ॥४१॥श्रीकृष्ण वचन पडतां कानीं । वाचा झाली गर्भालागुनी । मग करसंपुष्ट गर्भ जोडोनि । विनविता जाहला ॥४२॥म्हणे देवा- धिदेवा दंडवत । देव चिरंजीव म्हणत । बारे शिणलासी बहुत । गर्भवासी ॥४३॥बाळा आतां रिघें बाहेरी । माता शिणली भारी । सुखें असें संसारीं । क्रिडा करी तूं ॥४४॥मातेची सेवा किजे । पितृवचन पाळिजे । पावलासी सहजें । मनुष्य देहो ॥४५॥अद्यापि तरी ज्ञान धरीं । आपणातें उद्धरीं । किती दिवस अघोरीं । क्रमिसी बाळा ॥४६॥सांडीं हें अघोरपण । बाळा भोगी सुख संपन्न । जन्मा येऊनि सुख जाण । आणिक नाहीं ॥४७॥मज बाळपणीं गोरस खातां । खेळवी यशोदा माता । नंदाचें सुख सांगतां । आ-नंद मज वाटे ॥४८॥आणि मातेचेनि हातें । षड्रसी तृप्ति होय मातें । खेलवी मज सांगातें । पाळण्यांत निजवी ॥४९॥यावरी तारुण्य आलें जिवीं । गोपी गोवळ्यांमाजी खेळवी । माता दधि-भात देववी । आपुलेनि हातें ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP