मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग २७६ ते ३०० शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग २७६ ते ३०० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २७६ ते ३०० Translation - भाषांतर मग ते ह्मणेरे बुद्धिहीना । महा मूर्खा पुरुषत्वहीना । स्त्रीसुख सोडोनी वनामरणां । इच्छिलें त्वां ॥२७६॥मिथ्या तूं जन्मलासी । वांयां येथें कष्टसी । तारुण्य व्यर्थ दवडिसी । स्त्रीभोगाविणें ॥२७७॥भोगिजे द्वादश वरुषांची नारी । षोडश वर्षांची सुंदरी । गौर वर्णाचे परिकरी । सुगंध युवती ॥२७८॥एकाहूनि एक साजिर्या । चंद्रवदनी गोजिर्या । माझि-याहूनि सकुमार्या । मृगनयनी ॥२७९॥बोले जाणती बरवें । सेवा करिती मनोभावें । जयांचा माज दृष्टि भाव्वे । पद्मिणी ऐशा ॥२८०॥शुकें इतकें ऐकिलें । मग प्रतिउत्तर बोलिलें । तें ऐका तुह्मीं वहिलें । योगि जन ॥२८१॥शुक ह्मणे सत्य सत्य । आह्मी एक पत्नी वृ-तस्थ । रंभे दुजें बोलसी व्यर्थ । सत्रावी भोगितो सुंदरी ॥२८२॥नारी सत्रावी भोगिजे । हें सुख गुरुवचनीं लहिजे । तियेसंगें पाविजे । मोक्ष सायुज्यता ॥२८३॥तिचे प्रसंगीं घर । चुकूनि सं-सार येरझार । ते नारी सुंदर मनोहर । पुरोन उरली ॥२८४॥येरी तुह्मी नाशिवंत शरीरीं । दुर्गंधी मळमूत्र अघोरी । शरीरीं काम लक्ष त्यवरी । ते सुंदरी नावडे ॥२८५॥तव रंभा ह्मणे अवधारीं । तुज कष्ट सदा संसारीं । सुख नेणसी तिळभरी । योगिया तूं ॥२८६॥कष्ट भोगी अष्टमा सिद्धी । आमच्या वरीं नवविधी । हे कां नावडे तुज बुद्धी । ओढवली असे ॥२८७॥सुख राज्य संपत्ति । चारी पदार्थ असती । धर्मकाम कर्म राज्य प्राप्ती । यज्ञ भोगदान ॥२८८॥गाई ब्राह्मणांचें पाळन । लोकांचें सांभाळण । ये जा ह्मणती देशुगुण ऐसें न सांडीं मी सांगतें ॥२८९॥उपकार करिसी लोकां । ओ-ळखी पडेल मंडळिका । राजासारिखे सुखा । नसे जाणा ॥२९०॥सकळ धर्म जोडिसी । राया इंद्रातें मानसी । सर्व सुखभोगा लाभ तुजसी । मी नाचेन गायनीं ॥२९१॥मग शुक ह्मणे चतुरी । तूं बोलसी वैखरी । नावडे मज अंतरीं । राज्यांतीं सुख नाहीम ॥२९२॥राज्यपद करितां । पाप होतसे निभ्रांता । महा दोष पावतां । वेळु न लगे ॥२९३॥राज्य करूनि नरक प्राप्ती । ऐसा कोण करूनि तरला क्षिती । सुकृतांच्या राशी नासती । राज्य करूनि जाण पां ॥२९४॥राज्य करितां सरे धर्म । राज्य करी घडे अधर्म । राज्य करोनि पाविजे श्रम । निभ्रांत जाणा ॥२९५॥अगे सुकृत जोडावें नानापरी । तें हारवी राज्यांतरीं । तें तूम नेणसी गे सुंदरी । बुद्धिहीने ॥२९६॥म्हणोनि धर्मासी जतन करावें । सर्वसुख पदार्थ त्यजावे । हरिचरण सेवावे । जन्मोजन्मीं ॥२९७॥जाण हरिश्चंद्ररायें आपण । राज्य दिधलें ब्राह्मणां । मुक्तपद निर्वाण । धरिलें निरंतरीं ॥२९८॥पाहे पां राज्याभीतरी । राज्य पृथ्वीचें करी । तें तुजवांचोनि सुंदरी । नेणे कांहीं ॥२९९॥राज्यें नव्हे चिरंजीवित्व जाणा । ऐसे आलें माझिया मना । यास्तव सांडूनियां वना । निघता झालों ॥३००॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP