मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अष्टक| श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक अष्टक पहिलें दुसरे तिसरे चवथे पांचवे सहावें सातवे आठवें नववें दहावें अकरावें बारावें तेरावें चौदावें पंधरावें सोळावें अष्टक महाकालीचें रेणुकास्तव अंबाबाईचें तुकाबाईचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक अष्टक चिन्मयानंदाचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : ashtakpoemvishnudasअष्टककविताकाव्यपदमराठीविष्णुदास श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक Translation - भाषांतर ( वृत्त : वसंततिलका )श्रीपुण्य क्षेत्रस्थळ माहुर येंकवीरे ।तीर्थोदकीं दुरित पंक अनेकवीरे ॥श्रीरेणुके ! विमल दावि, पदारविंदें ।नारायणी जय जगज्जननी अनंदे ॥१॥आमंत्रितों तुज मि कुंकुम अक्षतांनीं ।ये माझिया ह्रदय - मंदिरिं - मोक्षदानी ॥माते तुझे विभव मंडप शोभिवंत ।देतात मान गरिबांप्रति - भाग्यवंत ॥२॥श्रीमूळपीठवसिनी जयश्री भवानी ।वर्णावि काय महिमा हिन मानवांनीं ॥आरंभिल्या प्रथम भाषण बालकानं ।दे माउली मुदित वारुनि बाल कान ॥३॥माझीहि माय जशि तूं अवघ्या दिनांची ।लाऊनि घेशि उगि - कां उपव्याधि ‘ ना ’ ची ॥देती सहस्त्रवदनादिक वेद ग्वाही ।देणार नाहिं स्वपुता - जननी दगा ही ॥४॥अंबे तुलाचि म्हणतात, दिनाचि आई ।सांभाळ वेद श्रुतिच्या वचनासि बाई ॥नाहीं मि दीन जननी अशि मात्र वाणी ।काढूनिया करुं नको करुणेसि वाणी ॥५॥जीवाचि जीवनकळा अइ रेणुका, तूं ।कापट्य कापुस नको अणु रेणु कातुं ॥निंदेसि पात्र करिसी मुळ कां कवीला ।मुंगे टपून असती गुळ - काकवीला ॥६॥आनंत नामिं गुणिलें, गुण गूणकांनीं ।मीही म्हणून करितों गुणगूण कानीं ॥झेंपे गरुड गगनीं निज आवसावें ।आम्हीं स्वपक्ष असतां उगि कां बसावें ॥७॥मोठयावरीच बहुधा अइनें रुसावें ।अंकीं लहान मुल घेउनिया बसावें ॥मोठें पहात बसतें दुर यद्यपी तें ।मांडीवरीच लघु बालक दुग्ध पीतें ॥८॥ते पोहणार बुडती थकतां उडाणी ।नौकेमधींच बसुनी तरती अडाणी ॥ज्ञानाभिमान धरुनी फसतो शहाणा ।अंबे तुझ्या सतत मीं वहातों वहाणा ॥९॥आसून ज्ञान खळग्यामधि कां पडावें ।मूर्खेंहि ग्रंथ इतुके तरि कां पढावे ॥मौनेंचि मीन गिळितो बगळा झर्यांत ।बोलोनि गोड पडतो शुक पिंजर्यांत ॥१०॥देणें रुकारचि पडे शरणांगतीला ।ठेवी स्वदास दगडापरि संगतीला ॥लावून पायरी करी चउकोनि टाकी ।खाऊनि तांबुल, वरीच थुकोनि टाकी ॥११॥हेवा नसे तिळभरी ध्रुव चांदणीचा ।श्रीरेणुके ! तरि करी तरु अंगणींचा ॥राहूं उभेचि न हसूंहि कुठें न हालूं ।डोलूं सदोदित परी तुजसी न बोलूं ॥१२॥किंवा सदैव आपुल्या बसवी समोर ।माते, करुन मजला शुक - हंस - मोर ॥किंवा पशूपरि तरी गृहिं माय पोस ।देहांतरीं सहज होइल पायपोस ॥१३॥नाहीं अशी बरि सदा किरकिर कानीं ।ऐकूं नयेचि करुणा किरकिर कानीं ॥श्रीमंतिणीस धरिली अळ लेकरांनीं ।दे माउली उचित जें घडलें करांनीं ॥१४॥देतान्नदान श्रमलीस विशाळपाणी ।सोडूनि सत्रिं बसलीस खुशालवाणी ॥हाका अशा मि जगतांमधिं मारुं कां न ।डाकाचि लक्षुमिगृहीं पडला रुका न ॥१५॥पाळूनि आधिं सदनांतरिं पांखराला ।नेऊनि माय ढकलूं नये आखराला ॥जाता न घेतिल अतां अपणांत जाती ।आधेमधेंचि तनुही कुपणांत जाती ॥१६॥कीं द्यावयासि बळि आणुनि बोकडाला ।या ठेविलेसि दृढ बांधुनि लांकडाला ॥अंबे अनाथ वृक व्याघ्र बळी न हो मीं ।तत्रापि ब्रह्मबिज हें तुं बळी न होमीं ॥१७॥बाई तुला कशि न ये किंव माणसाची ।जाताति प्राण निघुनी तुझि आण साची ॥मी दीनवाणि रडतां तुज सौख्य वाटे ।मारुं नकोचि दुखतील तुझे खवाटे ॥१८॥कां हो तुझें प्रगट नाम नये गुणाला ।याची असे निपट लाज तरी कुणाला ॥त्वां सोडिल्या सुपथ हा जननीपणाचा ।श्रीरेणुके ! खचितची मग मी कुणाचा ॥१९॥नामामृतासि दुसरें रस साधनांचें ।कां इच्छितेस ‘ गण ’ हें नवसा धनाचें ॥त्वां सोडिल्या सुपथ हा जननीपणाचा ।श्रीरेणुके ! खचितची मग मी कुणाचा ॥२०॥तूं शाहणी चतुर लक्षणि सदगुणाची ।जाणोनि सर्व अमुच्या मनिंच्या खुणाची ।त्वां सोडिल्या सुपथ हा जननीपणाचा ।श्रीरेणुके ! खचितची मग मी कुणाचा ॥२१॥माते स्वगर्भि नव्हतां नवमास लाहो ।त्वां दाविला स्तनरसें नव मासला हो ॥लागून गेलि सुरुची अधरास आई ।आतां तुझ्या धरिन कीं पदरास बाई ॥२२॥अंबे तुझे गुण कथामृत मी पितोची ।क्षोभे परंतु उर हा क्षय चेपितोची ॥होते अतीशय मला यमयातना ही ।आशा तुझी म्हणुन कीं, जिव जात नाहीं ॥२३॥हे काम क्रोध मदमत्सर लांडगे हो ।निष्ठूर फोडिति हडें खळ दांडगे हो ॥होते अतीशय मला यमयातना ही ।आशा तुझी म्हणुन कीं, जिव जात नाहीं ॥२४॥वीकल्पनाहि फिरवी जिव गर्गराची ।दुर्वासनाहि तनु चावित कर्कराची ।होते अतीशय मला यमयातना ही ।आशा तुझी म्हणुन कीं, जिव जात नाहीं ॥२५॥आली जरा झरझरा हलवीत मुंडी ।घालील ही अवदसा मृति - होमकुंडीं ॥होते अतीशय मला यमयातना ही ॥आशा तुझी म्हणुन कीं, जिव जात नाहीं ॥२६॥हे काळदूत कसतीच कसूनि पाशीं ।ते जेवला न म्हणती अथवा उपाशी ॥होते अतीशय मला यमयातना ही ।आशा तुझी म्हणुन कीं, जिव जात नाहीं ॥२७॥माते तुझ्याविण कसा मि जिवंत राहूं ।आहे जिवंतचि परी अजिवंत राहू ॥भगवत्कथामृत विषापरि गूण दावी ।वीचित्र दैवगतिही किति हो वदावी ॥२८॥ऐसाचि दूःसह सदा दुर वास राहो ।त्वां सांडिलें ह्मणुनिया दुर वासरा हो ॥सोडोनि लोभ पडली आइ ज्यास दावी ।त्याची जगीं दुरदशा किति हो वदावी ॥२९॥तो सार्वभौम नृपश्रेष्ठचि पुंडलीक ।आसोत अन्य असतीलचि मांडलिक ॥मातेसि पाठ हरिलाहि न मूख दावीमातेचि त्यासि ममता किती हो वदावी ॥३०॥शापेचि पर्तलि दया सतिचीं पतीला ।संताप शांतक दिला उपशाप तीला ॥झाली शिळा मुखकळा परिहास्य दावी ।श्रीराघवीं प्रिति तिची कितिहो वदावी ॥३१॥पार्थासि कामिनि - निशा उठली कुभद्रा ।तो कामतात बदली बनली सुभद्रा ॥मुद्रा हिरोनि मग त्या सखयासि दावी ।भक्ताचि प्रीति हरिला किति हो वदावी ॥३२॥अंकीं शिरें स्वरिपुनीं जरि स्थापियेलींत्यानें धरोनि कशि चरचर कापियेलीं ॥सद्धर्मताचि मधुकैटभिं थोर दावीनिष्ठूरता हरिचि ही कितिहो वदावी ॥३३॥येकानें माय वधिली निजशस्त्रहातें ।बा दुसर्यानें वधिलाचि अशस्त्रघातें ॥मातापित्यासि तिसरा प्रतिबंध दावी ।त्रैमूर्तिचीहि महिमा कितिहो वदावी ॥३४॥जी ऊठवी विरथ बालक थापटोनी ।तोडी रथीं त्रिकुट तालकथा पटोनी ॥जी विश्वरुप पट त्या रण रंगिं दावी ।भगवदगीतेचि महिमा कितिहो वदावी ॥३५॥टाकूनि कल्पलतिका गृहिं शिंदळीच्या ।कां रे वनांत फिरतोसि तुं शिंदळीच्या ॥कां रे, असा तरि मना पडलासि दावी ।मूर्खा तुझी मुढदशा कितिहो वदावी ॥३६॥पीतांबरी तटणि येत जटांबरीच्या ।श्रीमंत दोघि बहिणीच बरोबरीच्या ॥सिंहस्थ पर्वणिच भेटिस यावयासी ।जाती स्मरुन जन पावन व्हावयासी ॥३७॥भगवदगीता हि ह्रदयांतरिं सांठवावी ।भगवदगीतेचि जननी मनिं आठवावी ॥पार्थासि कृष्ण गुढ हा जयलाभ दावी ।भगवदगितेची महिमा किति हो वदावी ॥३८॥अंबे तुझेंचि स्वपुतें शिर कापलेलें ।किंचीत मात्र न दिसेचि संतापलेलें ॥जे कां आनंदमय, वैभव भाव दावी ।पुत्रावरी तुझि प्रिती कितिहो वदावी ॥३९॥टाकूनियां तुं ह्रदयस्थित माउलीला ।कां पाहतोसि जगतांतिल माउलीला ॥कां रे असा तरि मना पडलासि दावीं ।मूर्खा तुझी मुढदशा कितिहो वदावी ॥४०॥श्रीरेणुका नमन गायन स्नान संध्या ।म्यां सोडिल्या जपतपादिक कर्मचिंध्या ॥म्यां कांस खास धरिली स्वपितांबराची ।श्रीनारदापरिस मी रडका बराची ॥४१॥तूं येक काम करितां करिसी अनंत ।तूं दोन काम करितां करिसी अनर्थ ॥तूं येक नाम जप टाकुनि सर्व धर्म ।तारील नामचि तुला श्रुतिसारवर्म ॥४२॥कां धांवतोसि तुं तिच्या उगि पाठिमागें ।ये आपुल्याचि सदनीं फिर पाठिमागें ॥नानाकृतीं न गवसे बहु चंचलाची ।नामेंचि साउलि धरी निज अंचळाची ॥४३॥दुःखाचि झाडि तुटतां तुटतां तुटेल ।सौख्याचि वाडि जुटतां जुटतां जुडेल ॥हा बोध शांत व तिचा, अवघा बराची ।होतो परी प्रसुतिचा जिव घाबराची ॥४४॥येथून प्रार्थुन तुला नमितों शुभांगे ।येथेंचि ये तुं अळशावरि माय गंगे ॥तेथें न येचि तरि कां ह्मणतों असा मी ।श्रीरेणुकेचि परस्वाधिन मी असामी ॥४५॥श्रीविठ्ठलासि म्हणती जननी विठाई ।कीं यावयासि करुणाघन शीघ्र ठाईं ॥वाटेल वाइट विटेलचि चोखटाई ।काढील माय अमुची म्हणतां खटाई ॥४६॥पुत्रासि आणि जनकासि सदा अबोला ।ऐशासि काय तरि ठेउनि स्नेह बोला ! ॥सारंगपाणि हरि, तो स्मर पंचबाणीं ।दोघे विनाश करिताति प्रपंचबाणीं ॥४७॥श्रीक्षीरसिंधु परि त्याहि रमा - पित्याला ।संगोपितां कधिं नयेचि अमा पित्याला ॥तूं माउली मुळपिठाचि भली पिठाई ।कां गूळ धुंडुं त्यजुनी अयती मिठाई ॥४८॥येथेंचि माझि धनलक्षुमि मोक्ष काशी ।कां तोडुं जोडुं अपरोक्ष परोक्ष काशी ॥क्षेत्रज्ञ क्षेत्र क्षर अक्षर सारसाक्षी ।श्रीरेणुका जननि सुंदर सारसाक्षी ॥४९॥नाहीं दया अलि बया तुजसारखीला ।येईल काय सखये दुसर्या सखीला ॥द्वारीं तुझ्याचि मरणें निरधार केला ।जाणार नाहिं तुज सोडुनि द्वारकेला ॥५०॥धात्या तुला निजसुता परि लोक सारे ।शत्रूपरी मिच तरी गमलों कसा रे ॥आइ लेंकराचि ममता कशि तोडितोसी ।पापाचि जोडि अजुनी किती जोडितोसी ॥५१॥ शत्रू मला छळिति तूं नसतीस जेव्हां ।येतां गृहीं मग तुला दिसती न तेव्हां ॥जातांचि तूं मग पुन्हां जुपती कबाडीं ।माझी समग्र तुजला दिसते लबाडी ॥५२॥जाऊं नको गरुडपक्षिणि माय कोठें ।हे काळ - व्याळ, खळ धुंडिति कोटि कोठें ॥ठेवीत जाइ सहसा अपुल्या सवेंची ।लागेल स्वर्ग उडणें मजहीं सवेची ॥५३॥म्यांही समर्पिली तुला गुणयुक्त कंठीं ।देणें पडेल मजलाहि सुवर्ण कंठीं ॥घेणें प्रशस्त न गमे अनुमानिकाला ।त्वां भेटि अंति करणें अवघ्या निकाला ॥५४॥देऊं नको क्षिर पुरी वट कोरडेची ।ठेवूनि लोभ करि भाषण कोरडेंचि ॥या पायिं बाई रड हा खूटतो रड्यांचा ।ऐकून घोष घन कंकण तोरड्याचा ॥५५॥लावण्यश्री प्रगटली गृहिं राजसा हो ।दे कोंदणीं जंव समग्र हिरा जसा हो ॥जो होय इंद्र भजतां पदपंकजासी ।तो येतसे न भजतां पद रंक जासी ॥५६॥नेत्राश्रुचें दिनमुखें अवरोनि पाणी ।अंबे विनंति करितों पसरुनि पाणी ॥दे कीर्तनामृत सदा रस याचकां हो ।माझ्याचि पात्रिं करतीस प्रपंच कांहो ॥५७॥माझ्याहि मान्य करणें अइ गायनाला ।गंगोदकीं मिसळल्या तयिं काय नाला ॥कार्यात कारण असें अवलंबनाचें ।बिंबाचि सोय धरुनि प्रतिबिंब नाचे ॥५८॥दैवें दिलें धरुनिया दरवेशिणीला ।झालों अखंड अह्मि सादर वेसणीला ॥सूत्रीं इच्या गवसलों मूढ माकडें हो ।खांद्यावरीं शिरिं बसूं अथवा कडे हो ॥५९॥आतां न बोलूं तरि अक्षरही चकार ।आल्या पुढेंचि भवबंधन मोचकार ॥सूज्ञांसि गोष्टि करणें बहुशा कशाला ।सूर्यापुढें मिरविणें शतशा मशाला ॥६०॥तोंडींच नामरस अमृतवल्लि पोटीं ।जीच्या फळोफळिं अनंत ब्रह्मांडकोटीं ॥साक्षात मूळपिठ - वासिनि रेणुका ही ।कांक्षा नकाचि नर हो मनिं आणुं कांहीं ॥६१॥हे बोबडे परि उणे गमती न बोल ।आईच दाटुनि म्हणे गमती न बोल ॥कौतूक मानि मुखिं लाउनी अंगुलीला ।जी वर्णवीच अरुणापरि पंगुलीला ॥६२॥केली स्तुती जननि आजि यथामतीनं ।दे भेट माय क्षण लोचन थामती न ॥त्या द्रौपदीचि, विदुराचि कणीच भाजी ।घे ही सुपारि भरडी चिकणीच माझी ॥६३॥झाला अनंद शुभ - मंगल पाडव्याला ।आनंदिचा सकळ जंगल पाड व्याला ॥आली वसंततिलका लतिका मोहोरा ।आई त्वरीत इकडे फिरवी मोहोरा ॥६४॥संभावना पुजन भोजन दक्षिणाही ।सूवर्ण - पत्र - फल - पुष्प, प्रदक्षिणाही ॥श्रीरेणुकेप्रति समर्पुनि विष्णुदास ।जोडोनि हात प्रितिच्या धुपवी उदास ॥६५॥ N/A References : N/A Last Updated : September 05, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP