संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
शुकदोषनिदान

माधवनिदान - शुकदोषनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


शूकदोषनिदान

शूकजन्य रोगाचीं कारणें

अक्रमाच्छेफसो वृद्धिं योऽभिवाञ्छति मूढधी : ॥

व्याधयस्तस्य जायस्ते दश चाष्टौ च शूक्रजा : ॥१॥

मूर्ख लोकांकडून अयोग्य पद्धवीतने आपले शिश्र मोठे होण्याच्या इच्छेने जेव्हा त्यावर विषारी जंतूंचा व औषवादिकांचा लेप वगैरे प्रयोग केले जातात तेव्हा त्याला पुढे सांगितल्याप्रमाणे अठरा प्रकारचे शूलजन्य रोग होतात .

सर्षपिका ,

गौरसर्षपसंस्थाना शूकदुर्भुग्नहेतुका ॥

पिटिकाश्लेष्मवाताभ्यां ज्ञेया सर्वपिका तु सा ॥२॥

पहिला प्रकार :---- हा रोग्याने आपल्या शिश्नावर दूषित जलजंतूंचा लेप केला असतां त्यामुळे वात व कफ ए दोष प्रकुपित होऊन त्यावर पांढर्‍या मोहरीएवडी जी पुळी उद्भवते ती होय . हिला सर्षपिका म्हणतात , वरच्या श्लोकात कोठे ‘ दुर्भग हेतुका ’ असाहि पाठ आढळतो तेव्हा त्याचा अर्थ दूषित योनीच्या दोषामुळे ( वातकफ प्रकोप होऊन ) उद्भवणारी असा करावा .

अष्ठीलिका .

कठिना विषमैर्भुग्नैर्वायुनाऽष्ठीलिका भवेत् ‌ ॥

दुसरा प्रकार :--- हा अप्रशस्त ( म्हणजे काही दिवस कमी व काही दिवस जास्त अथवा कधी करणे कधी न करणे ) अशा शूकांच्या लेपाने कुपित झालेल्या वातदोषामुळे शिश्नावर अठोळीसारखी जी कठीण पुळी उत्पन्न होते ती होय . हिला अष्ठीलिका अशी संज्ञा आहे .

ग्रथित . शूकैर्यत्पूरितं शश्वद ग्रथितं नाम तत्कफात् ‌ ॥३॥

तिसरा प्रकार :--- हा शिश्वावर निरंतर शूकांचा ( विषारी जलजंतुंवा ) लेप केल्यामुळे त्यावर ज्या अनेक गांठी उठतात तो होय , यास ग्रथित असे म्हणतात .

कुंभिका . कुम्भिका रक्तपित्तोत्था जाम्बवातास्थिनिभाऽशुभा ॥

चवथा प्रकार :--- हा शिश्नावर केलेल्या शूवलेपनाने दूषित झालेला रक्तपित्तामुळे त्यावर जांभळाच्या वीसारखी जी काळी पुळी उदभवते तो होय . हिला कुंभिका असे म्हणावे .

अलजी .

तुल्यजां त्वलजीं विद्याद्यथाप्रोक्तां विचक्षण : ॥४॥

पाचवा प्रकार :--- हा शिश्नावर शूकलेपनाने मागे प्रमेह रोगात सांगितलेल्या अज्लंपीटिकेप्रमाणे ( तांबडया व काळया फोडांनी व्याप्त झालेली व तिच्याच दुसर्‍या सर्व लक्षणांनी युक्त असलेली अशी ) जी पुळी होते ती होय . हिलाहि अलजीच म्हणतात .

मृदित ,

मृदितं पीडितं यच्च संरब्धं वातकोपत : ॥

सहावा प्रकार :---- हा शिश्नावर शूकलेपनाने पीडा झाली असता रोग्याने त्याचे ( शिश्नाचे ) मर्दन केल्यामुळे अथवा ते दाबल्यामुळे वातप्रकोप होऊन उद्भवतो तो होय . यास मृदित असे नाव देतात .

संमूढपिटिका .

पाणिभ्यां भृशसम्मूढे सम्मूढपिटिका भवेत् ‌ ॥५॥

शूक दोषाच्या सातव्या प्रकारास संमूढपिटिका असे म्हणतात . ही शिश्नावर शूकलेप केल्यावर रोग्याने ते हातांनी पुष्कळ चोळिले असतां जी तोंड नसलेली पुळी उत्पन्न होते ती होय .

अधिमंथ .

दीर्घाबव्हयश्च पडका र्दार्यन्ते मध्यतस्तु या : ॥

सोऽधिमन्थ : कफासृग्भ्यां वेदनारामहर्षकृत् ‌ ॥६॥

शूक दोषाच्या आठव्या प्रकारास अधिमंथ असे नाव दिले जाते . हा शिश्नावर शूकलेप केल्याने दूषित झालेल्या कफरक्तपासून उद्भवतो व यात लांबट व मध्ये फुटलेल्या अशा अनेक पुळया रोग्याच्या शिश्नावर उद्भवून त्यापासून होणार्‍या वेदनेमुळे त्याच्या अंगावर काटा येतो .

पुष्करिका .

पित्तशोणितसम्भूता पिटिका पिटिकाचिता ॥

पद्मकर्णिकसंस्थाना ज्ञेया पुष्करिका च सा ॥७॥

शूकदोषाच्या नवव्या प्रकारास पुष्करिका अशी संज्ञा आहे . ही रोग्याने शिश्नाप्रर शूकलेप केल्यामुळे दूषित झालेल्या पित्तरक्तापासून उद्भवते व ती उद्भवण्याचा वकार असा द्दष्टीस पडतो की , एका पुळीमध्ये उत्पन्न होऊन तिच्या भोवती लहान लहान अशा अनेक दुसर्‍या पुळया उद्‌भवतात व ती पुष्करिके ( कमळाच्या वाटीर प्रमाणे दिसते .

स्पर्शहानि .

स्पर्शहानिं तु जनयेच्छोणितं शूकदूषितम् ‌ ॥

शूकदोषाच्या दहाव्या प्रकारास स्पर्शहानि असे नाव आहे . यात शिश्नावर केलेल्या शुकलेपनाने रक्त दूषित होऊन ते त्याच्या ( शिश्नाच्या ) त्वचेचे स्पर्शज्ञान नष्ट करते .

उत्तमा .

मुद्नमाषोपमा रक्त रक्तपित्तोद्भवा तु या ॥८॥

व्याधिरेषोत्तमा नाम शूकाजीर्णानेमित्तत : ॥

शुकदोषाच्या अकराच्या पकारास उत्तमा म्हणून म्हटले आहे . हा शिश्नावन वारंवार शूकलेपन फार केल्याने रक्त व पित्त दूषित होऊन त्यावर आकाराने मूग व उडीद यासारख्या ज्या तांबडया पुळया उद्‌भवतात त्यावरून जाणावा .

शतपे नक .

छिद्रैरणुमुखैर्लिङ्गं चितं यस्य समन्तत : ॥९॥

वातशोणितजो व्याधिर्विज्ञेय : शतपोनक : ॥

शूकदोषाचा बारावा प्रकार शतपोनक या नावाने वैद्यशास्त्रात प्रसिद्ध आहे ’ तो रोग्याने शिश्नावर शूकलेपन केले असता त्यामुळे दूषित झालेल्या वातरक्तापासू उद्‌भवतो व त्यांत शिश्नावर अनेक बारीक बारीक छिदे पडतात .

त्वक्‌पाक् ‌.

वातपित्तकृतोयस्तु त्वक्‌पाको ज्वरदाहवान् ‌ ॥१०॥

शिश्नावर केलेल्या शूकलेपनाने वात व पित्त दुषित होऊन त्याची त्वचा पिक्णे हा शूकदोषाचा तेरावा प्रकार होय . यास त्वक्‌पाक म्हणतात . यात ज्वर व दाह असतो

शोणितार्बुद .

कृष्णै : स्फोटै : सरक्ताभि : पिटिकाभिर्निपीडितम् ‌ ॥

यस्प वास्तुरूजश्चोग्रा ज्ञेयं तच्छोणितार्बूदम् ‌ ॥११॥

रोग्याच्या शिश्नावर शूकलेपनामुळे काळे फोड व त्यांभोवती तांबडया पुळया उद्‌भवणे व फोड फुटून पड्लेल्या वणाच्या जागी अत्यंत ठणका लागणे हा शूकदोषाचा शोणितार्बुद नामक चवदावा प्रकार आहे . ( यात रक्ताचा दोष असतो .)

मांसार्बुद .

मांसदोषेण जानीयादर्बुद मांससम्भवम् ‌ ॥

शिश्नावर केलेल्या शूकलेपनाने मांस दूषित झाले असता शूकदोषाचा पंधरावा प्रकार मांसार्बुद उद‌भवणे ते उदभवते .

मांसपाक .

शीर्यन्ते यस्य मांसानि यस्य सर्वाश्च वेदना : ॥१२॥

विद्यात्तमांसपाकं तु सर्वदोषकृतं भिषक् ‌ ॥

शूकदोषचा मांसपाक हा सोळावा प्रकार आहे . ( व हा त्रिदोषजन्य असतो ) यात शिश्नावर शूकलेप केला असता ते सडून गळून पडते व दुसर्‍याहि सर्वदोशज अनेक प्रकारच्या वेदना होत असतात .

विद्रधि .

विद्रधिं सन्निपातेन यथोक्तमिति निर्दिशेत् ‌ ॥१३॥

शिश्नावर केलेल्या शूकलेपाने जो ( शुकदोषाचा सतराव्या प्रकाराचा ) विद्रधि उद्भवतो त्याची सर्व लक्षणे ( मागे विद्रधिरोगनिदानात सांगितलेल्या अनेक प्रकारचे वर्ण , वेदना व स्राव इत्यादि ) सान्निपातिक विद्रधीप्रमाणे असतात .

तिलकालक .

कृष्णानि चित्राण्यथवा शूकानि स विषाणि वा ॥

पातितानि पचन्त्याशु मेढ्रं निरवशेषत : ॥१४॥

कालानि भूत्वा मांसानि शीर्यन्ते यस्य देहिन : ॥

सन्निपात्समुत्थांस्तु तान् ‌ विद्यात्तिलकालकान् ‌ ॥१५॥

शिश्नावर काळ्या अथवा चित्रविचित्र वर्णाच्या अशा विषारी शूकाच्या लेपनामुळे तत्काळ सर्व शिश्न पिकणे व त्याचे सर्व मांस तिळाप्रमाणे काळे पडून झडले जाणे या त्रिदोषोत्पन्न रोगास तिलकालक असे नाव असून हा शूकदोषाचा अठरावा अथवा शेवटचा प्रकार होय़ .

शूकदोषाचीं साध्यासाध्या लक्षणें .

तत्र मांसार्बुदं यच्च मांसपाकश्च य : स्मृत : ॥

विद्रधिश्व न सिध्यन्ति ये च स्युस्तिलकालका : ॥१६॥

वर सांगितलेल्या शूकदोषांच्या अठरा प्रकारापैकी मांसार्बुद , मांसपाक , विद्रवि व तिलकालक हे चार त्रिदोषजन्य असल्यामुळे असाध्य व बाकीचे चौदा साध्य जाणावे

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP