संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
उपदंशरोगनिदान

माधवनिदान - उपदंशरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


उपदंशरोगनिदान

उपदंश रोगाचीं कारणें .

हस्ताभिवातान्नखदन्तपातादधावनाद्रत्यतिसेवनाद्वा ॥

योनिप्रदोषाश्च भवन्ति शिश्ने पञ्चोपदंशा विविधापचारै : ॥

हाताचा अमिधात , अथवा नख व दात यांच्या योगाने जखम झाल्यामुळे , अत्यंत स्त्रीसंग केल्यामुळे अथवा ( स्त्रीसंग केल्यानंतर ) शिश्न न धुतल्यामुळें ; तसेच ( लांब व राठ केस व रोग वगैरे ,) स्त्रीच्या गोनिदोषामुळे रोग्याच्या शिश्नाच्या ठायी उपदेश ( गर्मी ) रोग होत असतो . याचे पुढे सांगितल्याप्रमाणे पाच प्रकार आहेत .

वातोपदंशाचीं लक्षणें .

सतोदभेद : स्फुरणै : सकृष्णै :

स्फोटैर्ब्यवस्येत्‌ पवनोपदंशम्‌ ॥

पहिला प्रकार वातोपदंश :--- पात शिश्न स्कुरण पावते व त्यावर काळे फोड ( चट्टे ) उठतात , त्यात सुयांनी टोचल्यासारखी वेदना होते व ते चरतात .

पित्तोपदंश .

पीतैर्खडुक्लेदयुतै : सदाहै : पित्तण ---

दुसर प्रकार पित्तोपदंश :--- यात शिश्नावर उठणारे फोड पिवळे असून त्यांतून सारखे पाणी वाहते व त्याची आग होते .

रक्तोपदंदा

रक्तात्पिशितावभासै : ॥२॥

तिसरा प्रकार रक्तोपदंश :--- यात रक्तदोषामुळे शिश्नावर मांसासारखे तांबडे फोड येतात ,

कफोपदंश

सकण्डुरै : शोथयुतैर्महद्भि : शुक्लैर्घनस्नावयुतै : कफेन ॥३॥

चवया प्रकार कफोपदंश :--- यात शिश्नावर पांढर व मोठे असे फोड येऊन त्यांच्या ठिकाणी कंड , सूज व पूयस्राव हे तीन प्रकार द्दष्टीस पडतात .

सन्निपातोपदंश

नानाविधस्नावरुजोपपन्नमसाध्यमाहुस्त्रिमलोपदंशम्‌ ॥

पांचवा प्रकार सन्निपातोपदंश :--- यात शिश्नावर उद्भवणांर्‍या फोडांस अनेक प्रकारच्या वेदना असतात व त्यांतून अनेक प्रकारचे स्राव होतात . तो असाध्य होय .

उपदशाचीं साध्यासाध्य लक्षणें .

सञ्जातमात्रे न करोति मूढ : क्रियां नरो यो विषये प्रसक्त : ॥४॥

कालेन शोथ : कृमिदाहपाकैर्विशीर्णशिश्नो म्रियते स तेन ॥

विशीर्णमांसं कृमिभि : प्रजग्धं मुष्कावशेषं परिवर्यजेत्त ॥५॥

उपदंशरोग झाला असतां जर रोग्याने मूर्खपणामुळे त्यावर उपचार न करता स्त्रीसंग केला तर कांही कालाने त्याचे शिश्च सुजून त्यांत किडे पडतात व दाह होतो व ते पिकते व त्या योगाने ते गळून त्यापायीच त्याचा मृत्यु घडतो . ( उपदंश रोगात जोपर्यंत शिश्नाचे मांस झडलेले नसते व त्यांत कृमि पडून त्यांनी ते खाऊन टाकलेले नसते तोपर्यंत तो वैद्यास साध्य होणाचा संभव आहे .) हा रोग होऊन एकदा शिश्नाचे मांस पडून गेले व कृमि पडून त्यांनी ते सर्व खाऊन टाकून वृषणमात्र अविशिष्ट राहिले म्हणजे वैद्याने रोगी हातात येण्याची आशा न धरीता स्यास सोडून द्यावे .

अङ्कुरैरिव सडयातैरुपर्युपरि संस्थितै : ॥

क्रमेण जायते वर्तिस्ताम्रचूडशिखोपमा ॥६॥

लिंगार्शाचीं लक्षणें .

कोशस्याभ्यन्तरे सन्धौ सर्वसन्धिगतापि वा ॥

कुलित्थाकृतय : केचित्‌ केचित्पद्मदलोपमा : ॥७॥

मेढ्र्सन्धौ नृणां केचित्‌ केचित्सर्वाश्रया : स्मृता : ॥

रुजादाहार्तिबहुलास्तृष्णामोहसमन्विता : ॥८॥

स्त्रीणां पुंसां च जायन्तेहयुपदंशा : सुदारुणा : ॥

लिङ्गवर्तिरितिख्याता लिङ्गार्श इति चापरे ॥

सर्वदना पिच्छिला च दुश्चिकित्स्या त्रिदोषजा ॥९॥

या उपदंशरोगाच्या शेवटी माधवाचार्य लिंगार्शरोग अथवा ज्यास कोणी वैद्य लिंगवर्ति रोग असेही म्हणतात , त्याची लक्षणे सांगतात तीं :--- या रोगांत शिश्नावर कोंबडयाच्या शेंडीप्रमाणे मांसाचे मोड एकावर एक उगवतात , त्यापैकी काहीचे आकार कुळिथासारखे व कांहीचे कमळाच्या पानासारखे असून हे मोड शिश्चाच्या कोशाच्या आंत , मण्यावर अथवा त्याच्या सांध्यावर अथवा सर्व शिश्नावर उद्भवत असतात . यांच्या ठिकाणी वेदना , चिकटपणा , दाह , टोचणी तहान , मोह हे प्रकार अत्यंत होतात व त्यामुळे त्रास व समाधान ही लक्षणे रोग्याच्या ठिकाणी द्दष्टीस पडतात . हा लिंगार्शरोग पुरुष व स्त्रिया या दोवांसही होतो व तो बुळबुळीत स्राव व वेदनायुक्त असा त्रिदोषजन्य असल्यामुळे बहुतकरून अत्यंत दु : साध्य असा असतो .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP