मूर्च्छेचीं कारणें व संप्राप्ति .
क्षीणस्य बहुदोषस्य विरुद्धाहारसेविन :
वेगाघातादभीघाताद्धीनसत्त्वस्य वा पुन : ॥१॥
करणायत नषेउग्राबाहोष्वाभ्यन्तरेषु च ॥
निविशन्ते यदा दोषास्तदा मूर्च्छन्ति मानवा : ॥२॥
संज्ञावहासु नाडीषु पिहितास्वनिलादिभि : ॥
तमोऽभ्युपौति सहसा सुखदु खव्यपोहकृत् ॥३॥
सुखदु : खव्यपोहाश्च नर : पतति काष्ठवत् ॥
मोहो मूर्च्छेति तामाहु : षडविधा सा प्रकीर्तिता ॥४॥
शरीरांत पुष्कळ दोष सांचलेला , विरुद्ध आहार सेवन करणारा व क्षीण व हीनसत्व पुरुषाने मलमूत्रादिकांच्या वेगाचा अवरोध केला असतां , अथवा त्यावर ( मर्मस्थानी ) शस्त्र प्रहार झाला असतां वातादि दोष प्रकोप पावून त्याच्या बाहेरील व आतील इंद्रिय स ह व मनोवह नाडयांमधून शिरून त्यास आच्छादितात व मूर्च्छा आणतात कारण शरीरात संज्ञावाहक ज्या नाडया आहेत त्यांचा एकदा वातादि दोषांनी रोध केला म्हणजे सुखदु : खांचे ज्ञान नष्ट करणारा असा तमो गुण एकाएकी त्याच्या ठायी उत्पन्न होऊन तो काष्ठवत् अचेतन पडतो , याच प्रकारच्या रोगास मूर्च्छा अथवा मोह म्हणतात . ही मुर्च्छा सहा प्रकारची आहे ,
वातादिभि : शोणितेन मद्येन च विषेण च ॥
षदस्वप्येतासु पित्तं तु प्रभुत्वेनावतिष्ठते ॥५॥
मूर्च्छारोगाचे वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून पृथक् पृथक होणारे तीन , रक्तापासून एक , विषापासून एक व मद्यापासून एक मिळून सहा प्रकार असतात व या सर्व प्रकारांत पित्ताचे प्राधान्य असते .
मूर्च्छेचें पूर्वरूपं .
ह्रत्पीडा जृभ्भणं ग्लानि : संज्ञादौर्बल्यमेव चा ॥
सर्वासां पूर्वरूपाणि यथास्वं ता विभावयेत् ॥६॥
रोग्याच्या ह्रदयांत वेदना , जांभया , ग्लनि व भ्रांति अशा प्रकारची पूर्वरूपे त्याच्या ठायी उत्पन्न होतात ती त्या त्या दोषानुरुष जाणावी .
वातन्जय मूर्च्छेचीं लक्षणें .
नीलं वा यदि वा कृष्णमाकाशमथवाऽरुणम् ॥
पश्यंस्तम : प्रविशति शीघ्रं च प्रतिबुध्यते ॥७॥
वेपथुश्चाङ्गमर्दश्च प्रपीडा ह्रदयस्य च ॥
कार्श्यं श्यावारूणा छाया मूर्च्छाये वातसम्भवे ॥८॥
वातप्रकोपामुळे रोग्यास आलेल्या मूर्च्छेत तो आपल्यासमोर निळा , काळा अथवा तांबडा रंग पाहातो , व अचेतन पडतो . शिवाय अंग कांपणे व मोडून येणे , ह्रदयात दुखणे आणि शरीर काळे , सांवळे किंवा तांबडे व कृश होणे ही लक्षणे त्याच्या ठायी द्दष्टीस पडतात . या मूर्च्छेतून तो लौकरच शुद्धीवर येतो .
पित्तजन्य मुर्च्छेचीं लक्षणें .
रक्तं हरितवर्णं वा वियत्पीतमथापि वा ॥
पश्यंस्तम : प्रविशति सस्वेदश्च प्रबुध्यते ॥९॥
सपिपास : ससन्तापो रक्तपीताकुलेक्षण : ॥
सम्भिन्नवर्चा : पीताभी मूर्च्छाये पित्तसम्भवे ॥१०॥
पित्तप्रकोपामुळे येणार्या मूच्छेंत रोगी आपल्या डोळयाभोवतालची पोकळी लाल , हिरवी अथवा पिवळी पाहतो व मूर्च्छा पावतो ; शिवाय तहान लागणे , सर्वांगाचा संताप होणे , मळ पातळ होणे . डोळे तांबूस , पिवळे होणे व शरीर पिवळे होणे ही लक्षणे त्याच्या ठायी दृष्टी स पडतात . या मूच्छेंतून सावध होतेवेळी त्यास घाम येतो .
कफजन्य मू्र्च्छेचीं लक्षणें .
मेघसंकाशमाकाशमावृतं वा तमोधनै : ॥
पश्यंरतम : प्रविशति चिराच्च प्रतिबुध्यते ॥११॥
गुरुभि : प्रावृतैरङ्गैर्यथैवार्द्रेण चर्मणा ॥
सप्रसेक : सहल्लासो मूर्च्छाये कफसम्भवे ॥१२॥
कफप्रकोपामुळे येणार्या मूर्च्छात रोगी आपल्या डोळ्याभोवतालची पोकळी मेघासारखी अथवा अंधार आणि मेघ यांनी व्यापलेली अशी पाहात असतां मूर्च्छा पावतो ; त्यास अंगावर जड पांघरूण अथवा ओले कातडे घातले आहेसे वाटते : शिवाय त्याच्या तोंडास पाणी सु टू न वांती होईलसे त्याला वाटते . अशा प्रकारच्या मूच्छेंतून तो फार वेळाने शुद्धीवर येतो .
सन्निपातजन्य मूर्च्छेचीं लक्षणें .
सर्वाकृति : सन्निपातादपस्मार इवापर : ॥
स जन्तुं पातयत्याशु विना बीभत्साचेष्टितै : ॥१३॥
सन्निपातजन्य मूर्च्छा म्हणजे दुसरा अपस्मार रोगच होय . मात्र रोग्याने दांत चावणे , त्याच्या तोंडास फेस येणे वगैरे त्याची वेडीवाकडी लक्षणे तिच्यांत नसतात : बाकी तिन्ही दोषांची सर्व लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होऊन तो एकदाम मूर्च्छित होतो .
रक्तजन्य मूर्च्छेचीं कारणें .
पृथिव्यापस्तमोरूपं रक्तगन्धस्तदन्वय : ॥
तस्माद्रक्तस्य गन्धेन मूर्च्छान्ति भुवि मानवा : ॥१४॥
द्रव्य : वभाव इत्येके द्दष्टवा यदभिमुह्यति ॥
पृथ्वी आणि जल ही दोन्ही त्मोगुणामय ( म्हणजे अज्ञान , जडत्व वगैरे उत्पन्न करणारी ) आहेत ; आणि रक्ताचा गंध हा पृथ्वी व जलमय आहे म्हणून रक्ताच्या गंधामुळे लोक मूर्च्छा पावतात . रक्ताचा गंध न येता नुसते रक्तच पाहून त्यास मूर्च्छा येणे हा प्रकार त्या द्रव्याचा स्वभाव आहे असे कित्येक वैद्याचे मत आहे .
विषजन्य व मद्यजन्य मूर्च्छा .
गुणास्तीव्रतरत्वे न स्थितास्तु विषमद्ययो : ॥
त एव तस्मात्ताभ्यां तु मोहौ स्यातां यथेरितौ ॥१५॥
एकाच प्रकारचे तीव्र गुण मद्य व विष यांमध्ये असल्यामुळे त्यांच्या सेवनाने खाली सांगितलेल्या द्वि विध मूर्च्छां उत्पन्न होतात .
रक्त , मद्य व विष यांपासून येणार्या मूर्च्छेचीं लक्षणें .
स्तब्धाङ्गद्दष्टिस्त्वसृजा मूढोच्छवासश्च मूर्छिंत : ॥
मद्येन विलपन् शेते नष्टविभ्रान्तमानस : ॥१६॥
गात्राणि विक्षपन भूमौ जरां यावन्न याति तत् ॥
वेपथु : स्वप्नतृष्णा : स्युस्तमश्च विषमूर्च्छिते ॥१७॥
वेष्टितव्यं तीव्रतरं यथास्वं विषलक्षणै : ॥
रक्तजन्य मूर्च्छा आलेल्या रोग्याचा श्वास चांगला खुला चालत नाही व त्या मूर्च्छेमुळे त्याचे अंग व डोळे ताठतात . मद्य प्याल्याने ज्यास मूर्च्छा वेते तो मद्याचीनशा उतरेपर्यंत जमिनीवर हातपाय आपटीत असतो व शिवाय बडबड , निद्रा , स्मृतिनाश व भ्रांति ही लक्षणे त्याच्या ठायी असतात . विषसेवनाने जी मूर्च्छा येते तिजमध्ये ( कंद , मूल वगैरे ) ज्या प्रकारचे विष असते त्याची सर्व लक्षणे विष भक्षण करणाराच्या ठायी उत्पन्न होतात व त्याशिवाय त्यास अंधारांत पडल्यासारखें वाटतें , झोप येते , तहान लागते व त्याच्या अंगांत कांपरे भरते .
मूर्च्छा पित्ततंम : प्राया रज : पित्तानिलाद्भ्रम : ॥
तमोवातकफात्तंद्रा निद्रा श्लेष्मतमोभवा ॥१९॥
मूर्च्छा , भ्रम , तंद्रा , निद्रा , या व चारी प्रकारांत अचेतनपणा वगैरे कांही कांही लक्षणे सारखी दिसतात , तरी त्यांतील भेद पुढे लिहिल्याप्रमाणे जाणावा --- मूर्च्छेत पित्त व तमोगुण याचे प्राधान्य असते ; भ्रम हा पित्त , वायु व रजोगुण यांनी युक्त असतो . वात , कफ व तमोगुण , यांपासून तंद्रा उत्पन्न होते आणि कफ व तमोगुण , यामुळे निद्रा लागते .
तंद्रेचीं लक्षणें .
इन्द्रियार्थेष्वसम्प्राप्तिर्गौरवं जृम्भणं क्लम ; ॥
निर्द्रातस्येव यरयैते तस्य तन्द्रां विनिर्दिशेत् ॥२०॥
तंद्रा लागलेल्या पुरुषाची सर्व इंद्रिये आपापले विषय घेण्यास असमर्थ असून शिवाय सुस्ती , जडत्व , जांभया व ग्लानि ही निद्रा आलेल्या मनुष्याची लक्ष्णे त्याच्या ठायी द्दष्टीस पडतात .
संन्यासाचीं लक्षणें .
वाग्देहमनसां चेष्टा आक्षिप्यातिबलामला : ॥
संनस्पन्त्यबलं जन्तुं प्राणायतनमाश्रिता : ॥२१॥
स ना संन्याससन्यस्त : काष्टीभूतो मृतोपम : ॥
प्राणैर्विमुच्यते शीघ्रं मुक्त्वा सद्य फलां क्रियाम् ॥२२॥
दोषेषु मदमूर्च्छाद्या गतवेगेषु देहिनाम् ॥
स्वयमेवोपशाम्यन्ति संन्यासो नौषधैर्विना ॥२३॥
वातादिक दोष अत्यंत प्रबळ होऊन वाणी , देह आणि मन यांच्या व्यापारांचा रोध करून बलक्षय झालेल्या रोग्याच्या ह्रदयात रहातात व त्यास मूर्च्छा आणतात . हाच संन्यास रोग होय . याने मनुष्य काष्ठवत् मेल्यासारखा पडतो व तत्काळ सुया टोचणे , डागणे वगैरे कांही क्रिया केल्या तर शुद्धीवर येतो ; नाही तर मरण पावतो . मदमूर्च्छादि रोग व संन्यास यांत फरक इतकाच आहे की , दोषांचा वेग नाहीसा झाला म्हणजे ते आपोआप शांत होतात व संन्यास हा औषधावाचून शांत होत नाही .