संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
आरोचकनिदान

माधवनिदान - आरोचकनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


कारणें व प्रकार .

वातादिभि : शोकभयातिलोभ -

क्रोधैर्मनोघ्नाशनरूपगन्धै : ॥

अरोचका : स्यु :

अरोचक रोगाचे वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून निरनिराळे होणारे तीन , आणि शोक , भय , अतिलोभ व अतिराग या निरनिराळ्या चार मनोविकारांपासून आणि मनाला न आवडणारे पदार्थ खाणे , पाहणे किंवा हुंगणे ; या कारणांमुळे रोग्याच्या मनास किळस आली असता असे आठ प्रकार त्याच्या ठायी उद्भवतात .

वातारोचक .

परिह्रष्टदन्त :

कषायवक्त्रश्च मतोऽनिलेन ॥१॥

वातदोषामुळे होणार्‍या अरोचक रोगांत रोग्याचे दांत आंबतात , शिवशिवतात व तोंड तुरट होते .

पित्तारोचक .

कट्‌वम्लमुष्णं विरसं च पूति

पित्तेन विद्याल्लवणं च वक्त्रम्‌ ॥

पित्तजन्य अरोचकांत रोग्याचे तोंड तिखट , आंवट , बेचव , उष्ण व दुर्गंधयुक्त व खारट असे असते .

कफारोचक .

माधुर्यपैच्छिल्यगुरुत्वशैत्य -

विबद्धसम्बद्धयुतं कफेन ॥२॥

रोग्याचे तोंड बांधल्यासारखे ( काही खाता न येण्यासारखे ), जड , गार , खारट , मधुर व बुळबुळीत असे झाले असले म्हणजे त्यास कफारोचक रोग झाला आहे म्हणून समजावे .

त्रिदोषारोचक वगैरे .

अरोचके शोकभयातिलोभ -

क्रोधाद्यह्र्द्याऽशुचिगन्धजे स्यात्‌ ।

स्वाभाविकं चास्यमथारुचिश्च

त्रिदोषजे नैकरसं भवेत्तु ॥३॥

शोक , भय , अतिलोभ , अतिक्रोध आणि त्याचप्रमाणे मनाला किळस आणणारे पदार्थ , घाण वासाचे पदार्थ यापासून होणार्‍या अरोचकांत तोंड नेहमीप्रमाणे असते ( पण कोणत्याहि प्रकारची रुचि म्हणजे खाण्याची इच्छा त्याच्या ठायी उत्पन्न होत नाही .) त्रिदोषारोचक झाले असतां रोग्याचे तोंड अनेक रसांच्या रुचीचे होतें त्यास अन्नदेष झालेला असतो .

अरोचकांत रुचीखेरीज होणारीं . इतर लक्षणें .

ह्रच्छूलपीडनयुतं पवनेन पित्तात्‌

तृडदाहचोशबहुलं सकफप्रसेकम्‌ ॥

श्लेष्मात्मकं बहुरुजं बहुभिश्च विद्या -

द्वैगुण्यमोहजडताभिरथापरं च ॥४॥

वातामुळे झालेल्या अरोचकांत रोग्याच्या ह्रदयांत शूल व शरीराच्या इतर भागांत वेदना होतात व पित्तामुळे झालेल्या अरोचकांत त्याच्या ठायी दाह , तहान व चुरचुर हीं लक्षणे असतात . तसेच कफजन्य अरोचकांत रोग्याच्या तोंडातून कफयुक्त लाळ पडते आणि त्रिदोषजन्य अरोचक झाला म्हणजे त्याच्या सर्वांगाच्या ठायी पुष्कळ वेदना होतात ; याशिवाय दुसरे जे आगंतुक अरोचक कधी कधी उत्पन्न होतात त्यांत मन व्याकुळ होणे , मूर्च्छा येणे व अंग जड होणे या प्रकारची लक्षणे रोग्याच्या ठायी द्दष्टीस पडतात .

अरोचक .

प्रक्षिप्तं यन्मुखेनान्नं जन्तोर्न स्वदते मुहु : ॥

अरोचक : स विज्ञेयो भक्तद्रेषमत : शृणु ॥५॥

रोग्याने तोंडांत घातलेल्या अन्नाची कोणत्याही प्रकारची त्यास रुचि न लागणे , या प्रकारच्या होणार्‍या रोगास अरोचक म्हणावे .

भक्तद्वेष .

चिन्तयित्वा च मतसाद्दष्टवा श्रुत्वा च भोजनम्‌ ॥

द्वेषमायाति यज्जन्तोर्भक्तद्वेषा : स उच्चते ॥६॥

रोग्यास अन्नाचे स्मरण , श्रवण , दर्शन आणि वास यांच्यामुळे त्रास उत्पन्न झाला असतां त्यास भक्तदेष रोग झाला आहे असें समजावें .

भक्ताच्छंद .

कुपितस्य भयार्तस्य तथा भक्तनिरोधिन : ॥

यस्यान्ने न भवेच्छ्रद्धा भक्ताच्छन्दा : स उच्चते ॥७॥

राग , भय व अन्न न खाणे यामुळे रोग्याची अन्नावरची प्रीति नाहीशी होणे यास भक्ताच्छंद म्हणतात .

नान्नाभिनंदन ,

अभिलषितं यच्चान्नं दीयमानं न भक्षितुम्‌ ॥

शक्त : स्यात्तत्तु सद्वैद्यैर्मतं नान्नाभिनन्दम्‌ ॥८॥

रोग्यास आवडणारे अन्न दिले असताहि जर तो ते भक्षण करू शकत नसेल तर ते नान्नाभिनंदन होय .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP