अजीर्णाचे प्रकार .
आमं विदग्धं विष्टब्धं कफपित्तानिलौस्त्रिभि : ।
अजीर्णं केचिदिच्छन्ति चतुर्थं रसशेषत : ॥१॥
अजीर्णं पञ्चमं केचिन्निर्दोषं दिनपाकि च ॥
वदन्ति षष्ठं चाजीर्णं प्राकृतं प्रतिवासरम् ॥२॥
वात , पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या प्रकोपापासून विष्टब्धाजीर्ण ( अन्न कोंडून राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ), विदग्धाजीर्ण ( करपटलेले अजीर्ण ), व आमाजीर्ण ( अपक्व अन्न राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ) या क्रमाने होणारे तीन व रसशेषाजीर्ण ( खाल्लेल्या अन्नाचा रसांश फाजील शिल्लक राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ) एक , मिळून अजीर्णाचे मुख्य चार प्रकार आहेत . याशिवाय कित्येक ( वैद्य ) निर्दोषाजीर्ण ( जे खाल्लेले अन्न पचवावयास एक अहोरात्र ( रात्र व दिवस ) लागते पण त्यांत पोट फुगणे वगैरे कोणताहि विकार होत नाही ते तितका वेळ असणारे अजीर्ण ) व प्राकृताजीर्ण ( रोज स्वाभाविक होणारे अजीर्ण ) असे त्याचे आणखी दोन प्रकार मानतात , मिळून अर्जीर्णाचे सहा प्रकार जाणावे .
अजीर्णाचीं कारणें
अत्यम्बुपानाद्विषमाशनाच्च
संधारणात्स्वप्नविपर्ययाच्च ॥
कालेऽपि सात्म्यं लघु चापि भुक्त -
मन्नं न पाकं भजते नास्य ॥३॥
ईर्ष्याभयक्रोधपरिप्लुतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन ॥
प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक् परिपाकमेति ॥४॥
वेळेवारीर न जेवल्याने , पाणी फारष्ययल्यामुळे , अवेळी घेतल्यामुळे व मलमूत्रा दिकांचा अवरोध वेल्यामुळे जरी जेवतांना हलके व सोसणारे अन्न खाल्ले असले तरी ते चांगले न पचून अजीर्ण होते , तसेच चिळस उत्पन्न करणार्या पदार्थमक्षणाने अजीर्ण होते . या शिवाय ज्या रोग्याच्या ठायी ईर्ध्या , भय , राग , लोभ हे मनोविकार असून तो शोक व दैन्य यांनी ग्रासलेला असतो , त्याने खाल्लया अन्नाचे चांगले पचन न होऊन अजीर्ण उत्पन्न होते .
आमाजीर्णाचीं लक्षणें .
तत्रामे गुरुतोत्क्लेद : शोथो गण्डाक्षिकूटग : ॥
उद्नारश्च यथाभुक्तमविदग्ध : प्रवर्तते ॥५॥
अंगाला जडपणा येणे , मळमळ सुटणे , गाल व डोळे यांच्या ठायी सूज येणे व खाल्लेल्या अन्नाच्या वासाचा करपट नसलेला ढेकर येणे ही लक्षणे ( कफप्रकोपामुळे होणार्या ) आमार्जार्णाची जाणावी .
विदग्धाजीर्णाचीं लक्षणें .
भ्रमतृण्मूर्च्छा : पित्ताच्च विविधा रुज : ॥
उद्नारश्च सधूमाम्ल : रवेदो दाहश्च जायते ॥६॥
पित्तजन्य विदग्धाजीर्णांत पित्तामुळे ( घशात जळजळणे व चुरचुरणे वगैरे ) होणारे अनेक विकार होऊन धुरकट व आंबट असा ढेकर येतो , अंगाचा दाह होतो व त्यास घाम सुटतो . त्याशिवाय चक्कर , मूर्च्छा आणि तहान ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .
विष्टब्धाजीर्णाची लक्षणें .
विष्टब्धे शूलमाध्मानं विविधा वातवेदना : ॥
मलवाताप्रवृत्तिश्च स्तम्भो मोहोऽङ्गपीडनम् ॥७॥
विष्टब्धाजीर्ण वातप्रकोपामुळे होत असल्याने त्यात ( टोचणे , फूट लागणे ) वगैरे अनेक वातजन्य वेदना होऊन पोट फुगणे , शूळ , मलावरोध तसेच अपानवायु न सरणे , अंग ताठल्यासारखे होणे , मोह व आंग दुखणे ही लक्षणे होतात .
रसशेषाजीर्ण ,
रसशेषेऽन्नविद्वेषो ह्नदयाशुद्धिगौरवे ॥
रसशेषाजीर्णांत अंग जड होणे , ह्रदयात मोकळेपणा न वाटणे व अन्नद्वेष ही लक्षणे होतात .
( निदोंषजीर्ण व प्राकृताजीर्ण हे अजीर्णाचे मुख्य प्रकार नसल्यामुळे आणि त्यापासून कोणताहि विकार होत नसल्यामुळे त्यांची लक्षणे येथे दिली नाहीत .)
अजीर्णापासून होणारे विकार ,
मूर्च्छा प्रलापोवमथु : प्रसेक : सदनं भ्रम : ॥८॥
उपद्रवा भवन्त्ये ते मरणं चाप्यजीर्णत : ॥
अनात्मवन्तं पशूवदभुञ्जन्ते येऽप्रमाणत : ॥९॥
तोंडास पाणी सुटणे व ओकारी येणे , तसेच मूर्च्छा , बडबड , ग्लनि व भोंवळ हे उपद्रव अजीर्णापासून मनुष्याचे ठायी उत्पन्न होतात ; इतकेच नाही . तर जर कधी अजीर्ण फार विकोपास गेले तर त्यापासून त्यास मरणदेखील प्राप्त होते , या सर्व उपद्रवाचे मूळ एक त्याने आपली जीभ स्वाधीन ठेवली नाही व पशूप्रमाणे अधाशीपणे वाटेल ते खाल्ले हेच होय .
अजीर्णमामं विष्टब्धं विदर्ग्धं च यदिरितम् ॥
विषूच्यलसकौ तस्माद्भवेच्चापि विलम्बिका ॥१०॥
वर सांगितलेल्या आम , विष्टब्ध व विदग्ध अजीर्णापासून विषूचिका ( मोडशी पटकी ), अलसक , व विलंबिका हे रोग उत्पन्न होतात .
विषूचिका कोणास होते ?
सूचीभिरिव गात्राणि तुदन् संतिष्ठतेऽनिल : ॥
यत्राजीर्णेन सावैद्यैर्विषूचीति निगद्यते ॥११॥
न तां परिमिताहारा लभन्ते विदितागमा : ॥
मूढास्तामजितात्मानो लभन्तेऽशनलोलुपा : ॥१२॥
जेव्हां अजीर्णात सुयांनी टोंचल्यासारखी शरीरांत वाय़ूची वेदना होते . तेव्हां तिला विषूचिका असे म्हणतात , आपला आहार बेताचा ठेवतात , शास्त्र कळते अशा मनुष्यास ती होत नाही , तर जे त्या शास्त्राच्या नियमांविषयी बेफिकीर व पराकाष्ठेचे खादाड असतात त्यासच होते .
विषूचिकेचीं लक्षणें .
मूर्च्छातिसारौ वमथु : पिपासा शूलभ्रमोद्वेष्टनंजृम्भदाहा : ॥
वैवर्ण्यकम्पो ह्रदये रुजश्च भवन्ति तस्यां शिरसश्च भेद : ॥१३॥
मूर्च्छा , अतिमार , भोंवळ , ओकारी , तहान सर्वांग शूल , भोंवळ व जांभया येणे , उरांत व डोक्यांत वेदना होणे , शोष पडणे , अंगांत कांपरे भरणे व शूल , उत्पन्न होणे , पायास पेटके येणे व अंगाचा दाह होणे व त्याचप्रमाणे अंगाचा वर्ण पालटणे ही विषूचिकेची लक्षणे होत . हिलाच पटकी म्हणतात .
अलस काचीं लक्षणें .
कुक्षिरानह्यतेऽत्यर्थं प्रताम्येत्परिकूजति ॥
विरूद्धो मारुतश्चैवं कुक्षावुपरि धावति ॥१४॥
वातवर्चोनिरोधश्च यस्यात्यर्थं भवेदपि ॥
तस्यालसकमाचष्टे तृष्णोद्नारौ तु यस्य च ॥१५॥
अलसकाचा विकार झाला असतां रोग्याचें पोट फार फुगते , त्यास मूर्च्छा येते व तो मोटयाने ओरडतो , तसेच त्याच्या अपानवाय़ूच्या अधोगतीचा ( गुदद्वाराकडे खाली जाणार्या मळाचा ) रोध होऊन तो पोटाच्या वरती उर्ध्व गति होतो ( म्हणजे गळ्याकडे जातो .) याशिवाय शोष पडणे , करपट ढेकर येणे , ही लक्षणे त्याचे ठायी उदभवतात .
विलंबिकेचीं लक्षणें .
दुष्टं च भुक्तं कफमारूताभ्यां प्रवर्तते नोर्ध्वमधश्च यस्याम् ॥
विलंबिकां तां भृशदुश्चिकित्स्यामाचक्षते शास्त्रविद : पुराणा : ॥१६॥
शास्त्रावेत्ते ह्या विकाराला विलंबिका म्हणतात , ती बरी होणे फारच कठिण आहे . जेव्हां कफ व वायु यांच्या प्रकोपाने रोग्याने खाल्लेले अन्न दूषित होऊन त्याची वरच्या किंवा खालच्या द्वारांनी मुळीच प्रवृत्ति होत नाही ( म्हणजे ढाळ किंवा ओकारी मुळीच होंत नाही ), व ते तसेच पुष्कळ वेळपर्यंत आमाशयांत राहते .
आमजन्य वेदना .
यत्रस्थमामं विरूजेत्तमेव देशं विशेषेण विकारजातै : ॥
दोषेण येनावततं शरीरं तल्लक्षणैरामसमुद्भवैश्च ॥१७॥
शरीरांत जे आम राहण्याचे स्थाना आहे त्या स्थानी आमापासून होणार्या ( आमवात वगैरे ) विकारामुळे व वात , कफ व पित्त या त्रिदोषांपैकी ज्या दोषाने शरीर व्यापले असेल त्याच्या स्वाभाविक लक्षणांमुळे ( म्हणजे वाताने टोचणी लागणे , कफाने अंग जड होणे व पित्ताने दाह होणे या प्रकारच्या लक्षणांमुळे ) रोग्यास वेदना होतात . कधी शरीराच्या इतर भागातहि त्यामुळे वेदना होत असतात .
य : श्यावदन्तौष्ठनखोऽल्पसंज्ञो वम्यर्दितोऽभ्यन्तरयातनेत्र : ॥
क्षामस्वर : सर्वविमुक्तसन्धिर्यायान्नर : सोऽपुनरागमाय ॥१८॥
विषूचिका किंवा अलसक झालेल्या रोग्यास वारंवार उलटया होत असून त्याचे दांत , ओठ व नखे काळी पडली , हातापायाचे सांधे ढिले पडले , शब्द व डोळे खोल गेले आणि स्मृति नष्ट होण्याच्या पंथाला लागली म्हणजे तो रोगी साध्य होणे दुरापास्त आहे असे जाणावे . विलंबिका तर आपल्या स्वरूपानेच असाध्य आहे , मग तिची असाध्य लक्षणे निराळी कशाला द्यायला पाहिजेत ?
अन्नपचन झाल्याचीं लक्षणें .
उद्नारशुद्धिरुत्साहो वेगोत्सर्गो यथोचित : ॥
लघुता क्षुत्पिपासा च जीर्णाहारस्य लक्षणम् ॥१९॥
उत्तम रीतीनें अन्न पचन झाले असता चांगला ढेकर येतो , उत्साह वाटतो , शरीरास हलकेपणा व भूक व तहान लागते आणि लघवीस व शौच्यास साफ होते .