संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
शोथरोगनिदान

माधवनिदान - शोथरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


व्रणशोथ रोगाचे प्रकार .

एवदेशोत्थित : शोथो व्रणानां पूर्वलक्षणम्‌ ॥

षडविध : स्थात्‌ पृथक सर्वरक्तागन्तुनिमित्तज : ॥१॥

शोथा : षडेते विज्ञेया : प्रागुक्तै : शोधलक्षणै : ॥

विशेष : कथ्यते चैयां पकापक्वादिनिश्वये ॥२॥

शरीराच्या कोणस्थाहि भागावर एके ठिकाणी सूज आली असता तेथे व्रण होणार म्हणून समजावे . अशा प्रकारे उत्पन्न होणन्या या व्रणशोप रोगाचे बातजन्य व आगंतुक असे सहा प्रकार असूस , त्यांची सर्व लक्षणे पूर्वीं सांगितलेल्या शोयरोगाच्या अहा प्रकाराप्रमाणेव असतात म्हणून ती येथे देण्याचे कारण नाही . मात्र त्यांच्या पकादि अवस्थांच्या निश्चमाविषयी जो विशेष द्दष्टीस पड्तो तेवद्राच या ठिकाणी सांगतो .

व्रणपाकाचीं अथवा पव्कव्रणाचीं लक्षणें .

विषमं पच्यते वातात्‌ पित्तोत्थश्चाचिरश्चिरम्‌ ॥

कफज पित्तवच्छोफो रक्तागस्तुसमुद्भव : ॥३॥

वेदनोपशम : शोथो लोहितोऽल्पो न चोश्चत : ॥

प्रादुर्भावो वलीनां च तोदू : कण्डर्मुदुर्मुदु : ॥४॥

उपद्रवाणां प्रशमो निम्नता स्फुटगं त्ववाम्‌ ॥

वस्ताविवाम्बुसञ्चार : स्थाच्छोथेऽङगुलिपीडिते ॥५॥

पूयस्थ पीडयस्येक्रमन्तमन्तेच पीडिते ॥

भक्ताकाङक्षा भवेच्चैव शोथानां पव्कलक्षणम्‌ ॥६॥

वातजन्य व्रणशोयाचा पाक विषम असतो , म्हणजे तो काही ठिकाणी पिकत नाही ; पित्तजन्य व्रणशोय फार लवकर पिकतो ; कफजन्य असतो तो पिकण्यास उशीर लागतो व रक्तजन्य व्रणशोथ फार लवकर पिकतो ; कलजयन असतो तो पिपण्यास उशीर लागतो व रक्तजन्य , आणि आगंतुक्त ( व्रणशोय ) पव्क होण्याचा प्रकार पित्ताप्रमाण्च असतो . तो ( व्रणशोय ) एकदा पिकला म्हणजे ठणका कमी पडतो . सूब तांबडी होऊन उंच राहात नाही खाली बसते . तिला सुरकुत्या पडतात , खळगा असतो व तिला बोठाने दाबली असता बस्तीतले पाणी जसे इकडे तिकड होते , त्याचप्रमाणे तिजमधला पूं इकडे तिकडे होतो . सुईने टोअल्याप्रमाणे येवणी लागते . वारंवार कंड सुटते . ही सूज पिकल्याची लक्षणे होत .

अपक व्रणशोथाचीं लक्षणें .

मन्दोष्मताऽल्पशोथत्वं काठिन्यं त्वकूसवर्णता ॥

मन्दवेदनता चैव शोधानामामलक्षणम्‌ ॥७॥

व्रणशोध अपक असता सूज थोडी असून तिच्या ठिकाणी कठिणपणा असतो व तसेच तिचा वर्ग रोग्याच्या स्वचेच्याच वर्णाप्रमाणे असून तिचा स्पर्श हातास थोडा उष्ण लागतो ; शिवाय या स्थितीत ठणकाही कमी असतो .

व्रणशोथ रोगाचीं पच्यमान लक्षणें .

दह्यते दहनेनैव क्षारणेव च पच्यते ॥

पिपीलिकागणेनेव दश्यते छिद्यते तथा ॥८॥

भिद्यते चैव शस्त्रेण दण्डेनेव च ताडयते ॥

पीडयते पाणिनेवान्त : सूचीभिरिव तुद्यते ॥९॥

सोषाचोषो विवर्ण : स्यादङ्गुल्येवावपाटयते ॥

आसने शयने स्थाने शान्तिं वृश्चिकविद्धवत्‌ ॥१०॥

नगच्छेदातत : शोथोभवेदाधमात बस्तिवत्‌ ॥

ज्वरस्तृष्णाऽरुचिश्चैव पच्यमानस्य लक्षणम्‌ ॥११॥

व्रणशोथरोगांत व्रण पिकत असता जी लक्षणे होतात ती व्रणास विस्तवाने भाजल्याप्रमाणे आग होणे , क्षार लावल्याप्रमाणे चुणचुण असणे , त्याच्या ठिकाणी मुंग्या डसल्याप्रमाणे अथवा सुईने टोचल्याप्रमाणे वेदना उद्भवणे , तसेच त्याचे दोन भाग केल्याप्रमाणे अथवा त्यास शस्वाने फाडल्याप्रमाणे , काठीने मारल्याप्रमाणे , हाताने दावल्याप्रमाणे व बोटाने फाडल्याप्रमाणे पीडा होणे आणि त्याच्या अंतर्यांमी दाह व आग असणे याप्रमाणे असून शिवाय सुजेचा रंग बदलतो व फुगलेल्या बस्तीप्रमाणे तिला ताण पडतो , रोग्यास विंचू डसल्याप्रमाणे त्या ( व्रणशोथाच्या ) जागी वेदना होत असतात व त्या उठल्याने , बसल्याने व निजल्यानेही कमी होत नाहींत ; अंगात ताप भरतो . तोंडाची रूचि जाते व तहान लागते . ह्यांना पच्यमान लक्षणे म्हणतात .

नर्तेऽनिलादुङ्न विना च पित्तं पाक : कफं चापि विना न पूय : ॥

तस्माद्धि सर्वे परिपाककाले पचन्ति शोथास्त्रिभिरेवदोषै : ॥१२॥

ठणका बायूवाचून लागत नाही , दाह पित्तावाचून होत नाही व पू कफावाचून उद्भवत नाही ; यास्तव सर्व प्रकारच्या ब्रणशोथात पिकते वेळी तिन्ही दोषांचे प्राचल्य असते .

कक्षं समासाद्य यथैव वन्हिर्वाय्वीरित : संदहति प्रसह्य ॥

तथैव पूयोप्यविनि : सृतो हि मांसं शिरा : स्नायु च खादतीह ॥१३॥

वर सांगितल्या प्रकाराने व्रशांत उत्पन्न होत असलेला पू ताबडतोब काढून टाकाबा : तो न काढता जर तसाच राहू दिला तर वार्‍याचे साह्य मिळालेल्या अग्नि जसा गावताच्या गंजीला जाळून खाक करतो तसा रोग्याच्या व्रणात राहिलेला पू त्याचे मांस , शिरा व स्नायु खाऊन त्यांचा नाश करतो .

आमं विदह्यमानं च सम्यक पव्कं च लक्षणै : ॥

जानीयात्स भवेद्वैद्य : शेषास्तस्करवृत्तय : ॥१४॥

यश्छिन्नत्याममज्ञानाद्यश्च पव्कमुपेक्षते ॥

श्वपचाविध मन्तव्यौ तावनिश्चितकारिणौ ॥१५॥

या व्रणशोथ रोगातील व्रणाच्या आम , पच्यमान व पव्क या तिन्ही अवस्थांतील ( वर सांगितलेली ) सर्वे लक्षणे ज्यास बरोबर समजतात तोच खरा वैद्य होय : बाकीचे वैद्य नुसते रोगाचे पैसे उपठणारे चोर वृत्तीचे असतात . आणकी सूज अपव्क असता फोडणारा व पक्क झाली असता न फोडणारा ह दोघे तर वैद्यरूपी चांडाळ समजावे .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP