संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
भग्नरोगनिदान

माधवनिदान - भग्नरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


भग्नरोगाचें निदान .

भग्नं समासाद्‌द्विविधं वदन्ति काण्डे च सन्धौ च हि तत्र सन्धौ

उत्पिष्टविश्लिष्टविवर्तितं च तिर्यक्‌ च विक्षिप्तमधश्च षोढा ॥

भग्नरोग दोन प्रकारचा आहे . कांडभंग आणि संधिभंग , संधिभंगाचे सहा प्रकार आहेत ते - उत्पिष्ट संधिभंग्न , विवर्तित संधिभंग्न , तिर्यक संधिभग्न , विक्षिप्त संधिंभग्न व अध : क्षिस संधिभग्न याप्रमाणे जाणावे ,

संधिभग्नाचीं सामान्य लक्षणें .

प्रसारणाकुञ्चनवर्तनोग्रा रुक्‌स्पर्शविद्वेषणमेतदुक्तम्‌ ॥

सामान्यत : सन्धिगतस्य लिङ्गम्‌ ---

सांधा पसरताना , अकुंचित करताना अथवा स्थिर ठेवला असतानाही फार दुखणे व त्यास स्पर्श असहा होणे या प्रकारची संधिभग्नाची सामान्य लक्षणे होत . विशेष प्रकार असे की ---

उत्पिष्टसन्धे : श्वयथु : समन्तात्‌ ॥२॥

विशेषतो रात्रिभबा रुजा च विश्लिष्टजे तौ च रुजा च नित्यम्‌ ॥

विवर्तिते पार्श्वरुजश्च तीव्रा : तिर्यग्गते तीव्ररुजो भवन्ति ॥३॥

क्षिप्तेऽतिशूलं विषमत्वमस्थ्नो : क्षिप्ते त्वधो रुग्विघटश्च सन्धे : ॥

उत्पिष्ट संधिभग्नात सांध्याच्या ठिकणी भोवताली सूज येते व रात्रीच्या वेळी पुष्कळ वेदना होतात . विश्लिष्ट संधिभग्नांत ( उत्पिष्टांतील सूज कायम असून ) सर्वकाळ अत्यंत वेदना चालू असतात . ( शिवाय सांधा शिथिल होतो व अस्यि सरून मध्ये खळगा पड्तो ); विवर्तित संधिभग्नांत ( सांध्याचे दोन्ही बाजूंच्या अस्थीमध्ये अतितीव्र वेदना होते ), तिर्यग्गत संधिभग्नात ( सांध्याच्या दोहाबाजूच्या दोन अस्थींपैकी एक ( अस्थी ) वांकडा होऊन आपले स्थान सोडतो व त्या ठिकाणी ) तीव्र वेदना उद्‌भवतात ; विक्षिप्त अथवा ऊर्ध्वक्षिप्त संधिभग्नांत भयंकर वेदना होतच असून अस्थि ( एकाच्या अथवा दोघांच्या क्रियेमुळे ) परस्परांपासून दूर सरकतात आणि अध : क्षिप्त अधिभग्नात वेदना , संध्यांचा बिघाड हे प्रकार होऊन ( ऊर्धक्षिप्त संधिभग्नात सांगितल्याप्रमाणे ) अस्थिही परस्परांपासून दूर होतात . ( विशेष इतकाच की ते किंचित्‌ खालीवर होतात .)

आतां यापुढे कांडभग्न रोगाची लक्षणे सांगतो ---

कांडभग्नाचे प्रकार .

काण्डे त्वत : कर्कतकाश्वकर्णविचूर्णितं पिच्चितमस्थिच्छल्लिका ॥४॥

काण्डेषु भग्नं त्वतिपातितं च मज्जागतं च स्फुटिंत वक्रम्‌ ॥

छिन्नं द्विधा द्वादशधाऽपि काण्डे ---

कांडभग्न रोगाचे प्रकार बारा आहेत ते - पहिला कर्कटक ( यांत रोग्याचे भग्न झालेले हाड दोन्ही बाजूस दबलेले असून मध्ये वर आलेले असते ); दुसरा अश्वकर्ण भग्न झालेले - चुरलेले - हाड स्पर्शाने अथवा शब्दाने कळते ); चवथा पिच्चित ( यांत हाड पिचलेले व पुष्कळ सूज आलेले असते ); पांचवा अस्थिछल्लिका ( यांतील भग्न झालेल्या हाडाचा काही भाग दुसर्‍या भागाशी गुंतलेला असतो व तो भाग निराळा झालेला स्पष्ट दिसतो ); सहावा कांडभग्न ( यात हाडाची नळी मोडलेली असते ); सातवा अतिपात ( यांत भग्न झालेले सर्व हाड मज्जेत शिरते व मज्जा बाहेर पडते ); नववा स्कुटित ( यांत हाडाचे पुष्कळ तुकडे झालेले असतात ); दहावा वक ( यांतील भग्न हाड वांकडे होते ); आणि अकरावा व बारावा ( हे दोन्ही प्रकार ) छिन्न या एकाच नावाने जाणावे ( पैकीं पहिल्या छिन्न प्रकारात भग्न झालेल्या हाडाचे अनेक बारीक बारीक तुकडे झालेले असतात व दुसर्‍या छिन्न पकारांत भग्न हाडाची एक बाजू चांगली शाबून असून दुसर्‍या बाजूचे तुकडे होतात .)

कांडभग्नाचीं सामान्य लक्षणें .

स्नस्ताङ्गता शोयरुजातिवृद्धि : ॥५॥

सम्पीडयमाने भवतीहशब्द : स्पर्शासहं स्पन्दनतोदशूला : ॥

सर्वास्ववस्थासु न र्शमलाभो भग्नस्य काण्डे खलु चिन्हमेतत्‌ ॥

कांडभग्न १ रोगाची सामान्य लक्षणे - अंग गळणे , सूज येणे , ती वाढणे , फार ठणका लागणे , हाड भग्न झालेल्या ठिकाणी चेपले असता शब्द होणे व त्यास हाताचा स्पर्श सहन न होणे , कापरे सुटणे , शूल उद्भव्रणे , व सुई टोचल्यासारखी वेदना होणे व कोणत्याही स्थितीत रोग्यास बरे न वाटणे या प्रकारची असतात .

भग्नंतु काण्डे बहुधा प्रयाति समासतो नामभिरेव तुल्यम्‌ ॥६॥

वर सांगितलेल्या कांडभग्न रोगाच्या बारा प्रकाराशिवाय कधी कधी निराळे असे अनेक प्रकार द्दष्टीस पडतात ; त्यास त्यांच्या आकृतीवरून व ठिकाणावरून योग्य असतील ती नावे वैद्यांनी द्यावी .

तरुणास्थीनि नम्यन्ते भिद्यन्ते नलकानि च ॥

कपालानि विभज्यन्ते स्फुटन्ति रूचकानि च ॥७॥

कांडभग्नर रोगात निरनिराळे अस्थि निरनिराळया प्रकाराने भग्न होतात ; ते असे की , तरुणास्थि ( नाक , कान , डोळे वगैरे यांची लवचिक हाडे ) दबतात , नलिकास्थि ( नळया ) चिरतात , कपालास्थि ( कुल्लयांची वगैरे हाडे ) फुटून तुकडे होतात आणि रुचकास्थीचे ( दाताचे वगैरे ) कपरे पडतात , ( वलयास्थीवेहि कपरे पडतात .)

अल्पाशिनोऽनात्मवतो जन्तोर्वातात्मकस्य च ॥

उपद्रवैर्वा जुष्टस्य भग्नं कृच्छ्रेण सिध्यति ॥८॥

कांडभग्न रोगाचीं साध्यासाध्य लक्षणें .

सम्यक सोन्धतमप्यस्थि दुनिंक्षेपनिबन्धनात्‌ ॥

सङक्षोभाद्वपि यद्नच्छोद्विक्रियां तच्च वर्जयेत्‌ ॥९॥

भिन्नं कपालं कटयां तु सन्धिमुंक्त तथा च्युतम्‌ ॥

जघनं प्रतिपिष्टं च वर्जयेत्तु विचक्षण : ॥१०॥

असंश्लिष्टकपालं च ललाटे च्रूर्णितं च येत्‌ ॥

भग्नं स्तनान्तरे पृष्ठे शङेख मूर्न्घि च वर्जयेत्‌ ॥११॥

कांडभग्न रोग झालेला पुरुष थोडे अन्न खाणारा , इंद्रिये स्वाधीन न ठेवणारा ( कुपथ्य करणारा ), वात प्रकृतीच व ज्वर वगैरे उपद्रवानी युक्त असा असला तर त्याचे भग्न झालेले हाड साध्य होण्यास महान्‌ कष्ट पडतात : त्सेच भग्न झालेले अस्थि चांगले जोडले गेल्यावर जर चांगले बांधले व ठेवले गेले नाहीत ; अथवा त्यास ढका लागला तर ते विकोपास जाऊन असाध्य होतात . कंबरेचे वगैरे फुटलेले कपालास्थि , सांध्यापासून सुटलेले अथवा अगदीच निखळलेले अस्थि अणि चूर्ण झालेले जघनास्थि हे चिकित्सा करण्यास वर्ज्य जाणावे ; आणि त्याप्रमाणेंच कपालस्थीचे तुकडे होऊन ते जुळता येण्याजोगे नसले अथवा स्तन , पाठ , शंख व मस्तक याचे अस्थि भग्न झाले तर ते असाध्य म्हणून सोडून द्यावे .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP