संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
उदावर्तनिदान

माधवनिदान - उदावर्तनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


उदावर्ताचे प्रकार .

वातविण्मूत्रजृम्भाश्रुक्षवोद्नारवमीन्द्रिय - ॥

क्षुतृष्णोच्छवासतिद्राणां धृत्योदावर्तसम्भव : ॥१॥

मल , मूत्र , अपानवायु , जांभई , डोळयातील अश्रु , शिंक , ढेकर , वांती , शुक्र , क्षुधा , तृषा , उच्छवास आणि निद्रा या तेरा शारीरिक धर्माच्या वेगाचा अवरोध केला असता निरनिराळे तेरा प्रकारचे उदावर्त होतात . ( या सर्व प्रकारास वायूच कारण आहे हे त्याच्या पुढे दिलेल्या लक्षणांवरून कळेल .)

मलावरोधजन्य उदावर्त .

आटोपशूलो परिकर्तिका च सङ्ग पुरविषस्य तथोर्ध्ववात : ॥

पुरीषमास्यादथवानिरेति पुरीषवेगेऽभिहते नरस्थ ॥२॥

मलावरोगजन्य उदावर्त मलाचा वेग कोंडल्याने होतो ; त्यात गुदद्वारात कातरल्यासारखी पीडा , मलावष्टंभ , गुडगुड शब्द , शूल , उर्ध्ववाय़ूचे ढेकर अथवा ( कधी कधी ) मुखावाटे मलप्रवृत्ति ही लक्षणे असतात .

मूत्रावरोधजन्य उदावर्त .

बस्तिमेहनयो : शूलं मूत्रकृच्छ्रं शिरोरूजा ॥

विनामो वङ्क्षणानाह : स्थालिङगं मूत्रनिग्रहे ॥३॥

मूत्राच्या वेगाचा अवरोध केला असता होणार्‍या उदावर्तात मूत्राशय व शिश्र यामध्ये वेदना होणे व उन्हाळी लागणे , जांगाडे जखडणे , इंद्रिय वेदनेमुळे विकल होणे व मस्तकशूल उठणे ही लक्षणे उत्पन्न होतात .

अपानवायुरोधजन्य उदावर्त .

वातमूत्रपुरीषाणां सङ्गाध्मानक्लपोरुज : ॥

जठरे वातजाश्चान्ये रोगास्युर्वातनिग्रहात्‌ ॥४॥

अपानवायु कोंडल्याने जो उदावर्त होतो त्याची लक्षणे :--- मळ , मूत्र व वायु बंद होणे आणि पोट फुगणे व त्यात वातजन्य वेदना होणे , तसेच ग्लानि येणे व आणखी शूलादि अन्य वात रोग उद्भवणे ही जाणावी .

जृंभावरोधजन्य उदावर्त .

मन्यागलस्तम्भशिरोविकारा जृम्भोपघातात्पवनात्मकास्यु : ॥

तथाक्षिनासावदनामयाश्च भवन्ति तीव्रा : सहकर्णरोगै : ॥५॥

मानेच्या शिरा व गळा ताठणे , मस्तकात वायूच्या वेदना होणे तसेच नेत्र , नाक , मुख व कर्ण या इंद्रियांच्या ठायी रोग उद्भवणे हे प्रकार जांभईचा रोध केल्याने होणार्‍या उदावर्तात होतात .

आंसवावरोधजन्य उदावर्त

आनन्दजं वाप्यथशोकजं वा नेत्रोदकं प्राप्तममुञ्चतो हि ॥

शिरोगुरूत्वं नयनामयाश्च भवन्ति तीव्र : सहपीनसेन ॥६॥

आनंद किंवा दु : ख यापासून आलेल्या डोळयातील आसवांस आतल्या आत जिरविल्याने जो उदावर्त होतो त्यात रोग्याचे मस्तक जड होते व त्यास भयंकर नेत्ररोग व पडसे ही जडतात .

शिंकावरोधजन्य उदावर्त

मन्यास्तम्भशिर : शूलमर्दितार्धावभेदकौ ॥

इद्रियाणां च दौर्बल्यं क्षवथो : स्याद्धिधारणात्‌ ॥७॥

जो उदावर्त शिंकेचा अवरोध केल्याने होतो त्याची लक्षणे - मान ताठणे , डोके दुखणे , अर्धशिषी उद्भवणे ( अधें डोके दुखणे ) अर्दित रोग व सर्व इंद्रिये दुर्बल होणे ही होत .

उद्नारावरोधजन्य उदावर्त

कण्ठास्यपूर्णत्वमतीव तोद : कूजश्च वायोरथवाऽप्रवृत्ति : ॥

उद्नारवेगेऽभिहते भवन्ति घोरा विकारा : पवनप्रसूता : ॥८॥

ढेकरांचा वेग आवरून घरला असता वातजन्य भयंकर विकार ( उचकी वगैरे व तोंड आणि गळा भरल्याप्रमाणे होणे , व त्यात सूं सूं आवाज होणे , अंगात येचल्याप्रमाणे अत्यंत पीडा होणे व उच्छ्रवास घेता न येणे हे प्रकार करणारा उत्पन्न उदावर्त होतो .

चांतिनिरोधजन्य उदावर्त

कण्डूकोठारुचिव्यङ्गशोफपाण्डवामयज्वरा : ॥

कुष्ठह्रल्लासवीसर्पाच्छर्दिनिग्रहजा गदा : ॥९॥

वांतीचा वेग बंद केल्याने उदावर्त झाला असता अंगाला कंड सुटते , गांधी येतात , तोंड बेचव होते व त्यावर काळसर डाग पडतात आणि विसर्प , पांडुरोग , ज्वर , कुष्ठ , सूज आणि मळमळ हे रोग उद्भवतात .

शुक्रवरोधजन्य उदावर्त

मूत्राशये वै गुदमुष्कयोश्च शोथो रुजामूत्रविनिग्रहश्च ॥

शुक्राश्मरी तत्स्नमर्ण भवेच्च ते ते विकराभिहते च शुक्र ॥१०॥

स्त्रीसंगकाली शुक्रस्राव न होऊ दिला अथवा अन्य प्रक्वाराने त्याच्या वेगाचा अवरोध केला तर भयंकर उदावर्त उत्पन्न होतो व त्यात गुद व वृषणास सूज येणे , कळ लागणे , मूत्र बंद होणे , शुक्र जन्यखडा उद्भवणे , व शुक्रस्राव होणे असे अनेक प्रकार मूत्राशयात उत्पन्न होतात .

तन्द्राङ्गर्दावरुचि : श्रमश्च क्षुधाभिघातात्कृशता च द्दष्टे ॥

भूक मारल्याने होणार्‍या उदावर्तात अंग मोडून येणे , तोंड बेचव होणे तंद्रा , श्रम व द्दष्टिमांद्य हे प्रकार असतात .

कण्ठास्यशोष : श्रवणावरोधस्तृष्णाभिघाताद्धृदयव्यथा वै ॥११॥

तहान मारली तर ह्रदयात वेदना होते , घशाला व तोंडाला कोरड पडणे व कानांनी ऐकू न येणे हे विकार उत्पन्न करणारा उदावर्त होतो .

श्रान्तस्यनिश्वासविनिग्रहेण ह्रद्रोगमोहावथवापि गुल्म : ॥

दमलेल्या मनुष्याच्या श्वासाचा अवरोध केला तर उदावर्त होतो व त्यात गुल्म अथवा मूर्च्छा आणि ह्रद्रोग हे उत्पन्न होतात .

जृम्भाङ्गमर्दाक्षिशिरोनिजाडयं निद्राभिघातादथवापि तन्द्रा ॥१२॥

झोपमोड झाल्यानेही उदावर्त होतो व त्यात रोग्यास तंद्रा लागते ; जांभया येतात , अंग मोडते व मस्तक आणि डोळे यास जडत्व येते .

वेगावरोधजन्य उदावर्ताशिवाय होणारे उदावर्त

वायु : कोष्ठानुगोरुक्षकषायकटुतिक्तकै : ॥

भोजनै कुपित : सद्य उदावर्त करोति च ॥१३॥

वातमूत्रपुरीषाश्रुकफमेदोवाहानि वै ॥

स्नोतांस्युदावर्तयति पुरीषं चातिवर्तयेत्‌ ॥१४॥

ततो ह्रद्वस्तिशूलार्तो ह्रल्लासारतिपीडित : ॥

वातमूत्रपुरीषाणि कृज्छ्रेण लभते नरा : ॥१५॥

श्वासकासप्रतिश्यायदाहमोहतृषाज्वरान्‌ ॥

वमिहिक्काशिरोरोगमन : श्रवणविभ्रमान्‌ ॥१६॥

बहूनन्यांश्च लभते विकारान्वातगोपजान ॥

वर सांगितलेल्या ( श्वासादिकांच्या अवरोधामुळे होणार्‍या ) उदावर्ताशिवाय रूक्ष , तरट , तिखट व कडवट अशा अग्नाच्या सेवनामुळे प्रकोप पावलेला वायु रोग्याच्या ठायी तत्काल उदावर्त उत्पन्न करतो व वायु , मल , मूत्र , अश्र , कफ व मेदोवाहक नाडयास व्यापतो आणि मळ शोषून टाकतो मग असे झाले असता त्या रोग्याच्या हृदयात व वस्तीत वेदना होऊन तो बेजार होतो , तोंडास मळमळ सुटते , अस्वस्थपणा वाटतो व मल , मूत्र आणि अपानवायु यांची प्रवृत्ती मोठया कष्टाने होते . याशिवाय अशा प्रकारच्या उदावर्तात श्वास , खोकका , पडसे , दाह , मूर्च्छ , तहान , ओकारी , उचकी , कमी ऐकू येणे , मन भमिष्ट होणे , शिरोरोग ज्वर येणे हे दुसरेही पुष्कळ वातविकार झालेले द्दष्टीत्पत्तीस येतात .

उदावर्ताचीं असाध्य लक्षणें .

तृष्णार्दितं परिक्लिष्टं क्षीणं शूलैरुपदुतम्‌ ॥

शकृद्वमन्तं मतिमानुदावर्तिनमुत्सृजेत ॥

जो उदावर्त झालेला रोगी क्षीण झालेला , क्लेश व वेदना यांनी व्याकुळ होत असलेला , पाण्याचा शोष पडलेला व तोंडावाटे मल ओकणारा असा असेल त्याची चिकित्सा करू नये .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP