जन्मराशीवरून घटित

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


विवाहे सर्वमांगल्ये यात्रादौ ग्रहगोचरे ।

जन्मराशे : प्रधानत्वं नामराशिं न चिंतयेत् ॥५४॥

जन्मभं जन्मधिष्ण्येन नामधिष्ण्येन नामभम् ।

व्यत्ययेन यदा योज्यं दंपत्योरशुभप्रदम् ॥५५॥

म्हणजे विवाहकालीं , इतर मंगलकार्यांत , यात्रादिप्रयाणसमयीं , मुहूर्त व चालू ग्रह हे जन्मराशीवरूनच पहावे . व्यावहारिक नांवाचा उपयोग करूं नये . किंवा जन्मनक्षत्राचें जन्मनक्षत्राशीं आणि नामनक्षत्राचें भामनक्षत्राशींच घटित पहावें . जन्मराशि व व्यावहारिक नामराशि यांचें घटित पाहूं नये . कारण तसें करणें शुभसूचक नाहीं ; असो . ही आठ प्रकारची मैत्री जमविण्यापूर्वीं वधूवरांस अनिष्ट मंगळ किंवा दुष्ट नक्षत्रांवर त्यांचा जन्म इत्यादि दोष आहेत कीं काय हें पुढें सांगितल्याप्रमाणें प्रथम पहावें .

जन्मपत्रिका नसतां शास्त्रार्थ .

अज्ञातजन्मभानां तु व्यावहारिकनामभात् ।

विचारयेदिदं सर्वं संकरः क्लेशदायक : ॥५६॥

ज्याचें जन्मनक्षत्र ठाऊक नसेल म्हणजे ज्याची पत्रिका नसेल त्याचें व्यावहारिक नांवावरून घटित जमवावें . परंतु एकाचें जन्मनक्षत्र आणि दुसर्‍याचें व्यावहारिक नांव असें मिश्र घटित पाहून विवाह जमविणें क्लेशदायक आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP