पुरुषविवाहकाल

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


पुरुषाचा विवाह अमक्याच वर्षीं करावा असा शास्त्राचा फारसा निर्बंध नाहीं . तरी वीस वर्षेंपर्यंत मुलाचें लग्न करूं नये असा शास्त्रकारांचा हेतु दिसतो . कारण आश्वलायनगृह्यसूत्रांत

अष्टमे वर्षें ब्राह्मणमुपनयेत् । आषोडशाद्राह्मणस्त्यानतीत : काल :’

म्हणजे ब्राह्मणांच्या उपनयनाचा मुख्य काल आठवें वर्ष व गौणकाल सोळा वर्षेंपर्यंत असतो , असें सांगितलें आहे . उपनयन झाल्यानंतर बारा वर्षें किंवा अध्ययन पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्य राखावें व नंतर इष्ट वाटल्यास गृहस्थाश्रम घ्यावा . असें मनुस्मृतींत तिसर्‍या अध्यांत आरंभींच दिलें आहे . शिवाय इतर स्मृतिग्रंथातून वराचें वय अठरापासून वीसपर्यंत असलें तरी चालेल असा उल्लेख आढळतो . यावरून पुरुषाचें लग्न लहानपणीं म्हणजे विद्यार्थीदशेंत करणें ही गोष्ट शास्त्रविरुद्ध नसली तरी शास्त्रोक्तही नाहीं , असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं . सांप्रत मुलाचें अल्पवयांत लग्न करणें इष्ट नाहीं , ही समजूत अनेक कारणांमुळें दिवसेंदिवस अधिक रूढ होऊन अमर्याद होत चालली आहे . विवाहसंबंधीं सध्यां जो कायदा झाला आहे , त्यांत सुद्धां लग्नसमयीं वराचें वय १८ व वधूचें वय १४ पेक्षां कमी नसावें असें आहे . ही वयाची मर्यादा सयुक्तिक दिसली , तरी धार्मिक बाबतींत कायद्याचें बंधन करणें हें श्रेयस्कर नसून बाधक आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP