सप्रवरांचीं गोत्रें

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


भारद्वाजाश्च गार्ग्याः कपिकुलमिलिता जामदग्न्याश्च वत्सा :

बाभ्रव्या : कौशिका : स्यु : प्रवरसमयुता विष्णुवृद्धा नितुंदा : ।

वासिष्ठा : कौंडिणेया : पुनरपि मिलिता : काश्यपा : शांडिलेया :

ज्ञेया विद्वद्भिरेते परिणयसमये वर्जनीया : प्रयत्नात् ॥३७॥

स्वगोत्रोत्पन्न कन्येशीं विवाह होत नाहीं हें वर सांगितलेंच आहे . परंतु ज्या गोत्रांचा परस्पर शरीरसंबंध होत नाहीं अशीं कांहीं गोत्रें आहेत ; कारण , त्यांचे प्रवर , सारखे असतात . म्हणून तसा संबंध घडल्यास तो दोषार्ह असून त्यास सप्रवर म्हणतात . तीं गोत्रें कोणती हें त्यांच्या प्रवरांसह सांगतों .

पुढें जीं कोष्टकें दिलीं आहेत , त्या प्रत्येकांत असलेल्या गोत्रांचा परस्परांशीं विवाहसंबंध होत नाहीं असें समजावें . गोत्रभूत जो पुरुष त्याच्या बाप , आजा पणजा हेच प्रवर होत . वृक्षाला फांटे फुटून जशा निरनिराळ्या शाखा होतात . तसे ज्यांच्यापासून वंशाचे अनेक पोटभेद उत्पन्न होतात असे जेऋषि प्रवर होत . म्हणून वधूवरांचें एक गोत्र असतां जसा विवाह होत नाहीं , त्याप्रमाणेंच दोघांचे समान प्रवर असतील तरीही विवाह करूं नये . कारण ‘ असमानप्रवरैर्विवाह :’ असें वचन आहे . इतकेंच नव्हे तर ---

एक एव ऋषिर्यावत्प्रवरेष्वनुवर्तते ।

तावत्समानगोत्रत्वं विवाहप्रतिबंधकम् ॥३८॥

जेथपर्यंत प्रवरांमध्यें एकाच ऋषीचें नांव उच्चारिलें जात आहे , तेथपर्यंत तें एक गोत्रच आहे असें समजावें . आणि त्यांमध्यें परस्पर विवाहसंबंध करूं नये . याला एक अपवाद असा आहे कीं , भृगुगण आणि अंगिरोगण यांच्यामध्यें पांच प्रवरांत तीन प्रवर जर सारखे असतील , किंवा तीन प्रवरांत दोन प्रवर जर सारखे असतील , तरच भृगुगण व अंगिरोगण यांच्यांत विवाह करूं नये . अन्यत्र करावा . इतर कोणत्याही गोत्रांत मात्र एक ऋषि जरी जरी समान असेल , तरी देखील तो विवाहाला प्रतिबंधक आहे . मुख्य मुख्य गोत्रांचे प्रवर कोष्टकानुक्रम १ मध्यें व परस्परांशीं न जमणारीं कांही गोत्रें कोष्टकानुक्रम २ यांमध्यें खालीं देतों .

कोष्टक १ .

गोत्रें - भारद्वाज .

प्रवर - आंगिरसबाईस्पत्यभारद्वाजेति .

गोत्रें - गार्ग्य .

प्रवर - आंगिरसशैन्यगार्ग्येति .

गोत्रें - कपि .

प्रवर - आंगिरसामहीयवौरुक्षयसेति .

गोत्रें - जामदग्न्य वत्स .

प्रवर - भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति .

गोत्रें - बाभ्रव्य .

प्रवर - वैश्वामित्रदेवरातौदलेति .

गोत्रें - कौशिक .

प्रवर - वैश्वामित्राघमर्षणकौशिकेति .

गोत्रें - विष्णुवर्धन . नित्युंदन

प्रवर - आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति .

गोत्रें - वासिष्ठ .

प्रवर - वासिष्ठेंद्रप्रमदाभरद्वस्विति .

गोत्रें - कौंडिण्य .

प्रवर - वासिष्ठमैत्रावरुणकौंडिण्येति .

गोत्रें - काश्यप .

प्रवर - काश्यपावत्सारासितेति किंवा काश्यपावत्सारनैध्रुवेति .

गोत्रें - शांडिल्य

प्रवर - शांडिलासितदैवलेति .

गोत्रें - अत्रि .

प्रवर - आत्रेयार्चनानसश्यावाश्वेति . ( अत्रिगोत्राचें कोणत्याही अन्य गोत्राशीं जमतें म्हणून " अत्रीची सर्वत्र मैत्री " अशी म्हण आहे . )

वरील कोष्टकांत जीं गोत्रें लिहिलीं नाहींत आणि प्रवर सारखे असल्यामुळें ज्या गोत्राचें परस्परांशीं पटत नाहीं , तीं गोत्रें पुढील कोष्टकांत दिलीं आहेत . याशिवायही आणखी अनेक गोत्रें आहेत , त्या सर्वांचा समावेश स्थलसंकोचास्तव येथें केला नाहीं . त्याविषयीं सिंध्वादि ग्रंथांत पहावें .

कोष्टक २ .

आंगिरस

कुत्स

मुद्गल

उपमन्यु

कौंडिण्य

वासिष्ठ

१०

काश्यप

नैध्रुव

डिल्य

११

कौशिक

त्रयोदशपार्थिव

लोहिताक्ष

वैश्वामित्र

शालाक्ष

१२

गार्ग्य

भारद्वाज

१३

गौतम

द्वादशपार्थिव

१४

जामदग्न्य

भार्गव

वत्स

१५

बादरायण

सर्वांशीं पटतें

१६

वैन्य

सर्व गोत्रांशीं पटतें

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP