गर्भाधानं पुंखवनं सीमंतोन्नयनं तथा ।
जातकं नामसंस्कारो निष्कमश्चान्नभोजनम् ॥१॥
चौलकर्मोपनयनं वेदव्रतचतुष्टयम् ।
केशांतः स्त्रानमुद्वाह : संस्कारा : षोडश स्मृताः ॥२॥
प्रथमं स्यान्महानाम्नी द्वितीयं च महाव्रतम् ।
तृतीयं स्यादुपनिषद गोदानं च ततः परम् ॥३॥
संस्कार सोळा आहेत . त्यांचीं नांवें --- १ गर्भांधान , २ पुंसवन , ३ सीमंतोन्नयन , ४ . जातकर्म , ५ नामकरण , ६ निष्कमण , ७ अन्नप्राशन , ८ चौल , ९ उपनयन , १० --- १३ वेदव्राचतुष्टय ४ , ( १० महानाम्नीव्रत , ११ महाव्रत , १२ उपनिषद्व्रत , १३ गोदान ), १४ केशान्त , १५ समावर्तन , १६ विवाह इत्यादि . प्रत्येक ब्राह्मणानें स्वशाखेचें वेदाध्ययन करून नंतर इतर तिन्ही वेदांचें अध्ययन करावें . हेंच मुख्य वेदव्रतचतुष्टय जाणावें . ऋक्शाखेंत केशांतालाच गोदान म्हणतात . केशान्त म्हणजे केशखंडन होय . तैत्तिरीय कृष्ण ययुर्वेद्यांचे १ प्राजापत्य , २ सौम्य , ३ आग्नेय , ४ वैश्वदेव असे चार संस्कार आहेत . त्यांस निष्कमण संस्कार नाहीं . आपल्या शाखेस सांगितलेले संस्कार तेवढेच ब्राह्मणांनीं करावे . इतर शाखांचे करूं नयेत . ऋग्वेद्यांस पुंसवनानंतर अनवलोभन संस्कार सांगितला आहे .